आता पशुपालकांना होणार किसान क्रेडिट कार्ड चे वितरण | Kisan Credit Cards to Livestock Farmers

आपल्या राज्यातील तसेच देशातील केंद्र तसेच राज्य सरकारे नेहमीं देशातील नागरिकांसाठी, शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवित असतात. या पैकी शेतकरी बांधवांसाठी राबविण्यात येणारी एक महत्वपूर्ण योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड योजना होय.  किसान क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून शेतकरी बांधवांना कर्ज देण्यात येत असते. Kisan Credit Cards (KCC) to Livestock Farmers

 

आता पशुपालकांना होणार किसान क्रेडिट कार्ड चे वितरण | Kisan Credit Cards to Livestock Farmers,Kisan Credit Cards (KCC) to Livestock Farmers

 

आता आपल्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील पशुपालकांना किसान क्रेडिट कार्ड चे वितरण करण्यात येणार आहेत. पशू पालकांना किसान क्रेडिट कार्ड वितरित करण्यासाठी एक विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा अग्रणी बँकेच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत हे पशू पालकांना किसान क्रेडिट कार्ड चे वितरण करण्यात येणार आहेत.

 

हे नक्की वाचा:- शेळी, मेंढी, गाई म्हशी व कुकुट पालन अनुदान योजना

pashu KCC या राबविण्यात येत असणाऱ्या मोहिमे अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पशुपालन करणाऱ्या पशुपालकांनी लाभ घ्यावा असे आव्हान जिल्ह्यातील पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या मार्फत करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व पशुपालकांनी या योजने अंतर्गत लाभ घ्यावा.

 

किसान क्रेडिट कार्ड योजना अंतर्गत कोणत्या पशू पालकांना लाभ मिळणार? :-

या मोहिमेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पशुपालन करणाऱ्या पशुपालकांना जसे की,  दुग्ध व्यावसायिक, शेळीपालक अथवा कुक्कुट पालन करणारे पशुपालक ज्यांच्याकडे किसान क्रेडिट कार्ड नाही, अशा पशुपालकांना किसान क्रेडिट कार्ड चे वितरण करण्यात येणार आहेत.

 हे नक्की वाचा:- कुसुम सोलर पंप योजना २०२२ सुरू कसा करायचा ऑनलाईन अर्ज

नंदुरबार जिल्ह्यातील एकूण  7 हजार 702 इतक्या पशुपालन करणाऱ्या पशुपालकांना किसान क्रेडिट कार्ड(Pashu KCC) अंतर्गत लाभ मिळवून देण्यात येणार आहे.Pashu Kisan credit card

 

 

जर कोणत्याही पशुपालन करणाऱ्या पशुपालकांकडे शेत जमीन असेल तर अशा पशुपालकांना देण्यात येत असणाऱ्या किसान क्रेडिट कार्डची पतमर्यादा ही वाढवून सुद्धा देण्यात येणार आहेत. आणि या पशू पालकांना देण्यात येत असणाऱ्या किसान क्रेडिट अंतर्गत व्याज सवलत ही 3 लक्ष पर्यंतच्या कर्जासाठी राहणार आहेत.

 

हे नक्की वाचा:- राष्ट्रीय पशुधन विकास योजना सुरू (पशू पालकांसाठी योजना)

 

पशुपालकांना देण्यात येणार असणाऱ्या या किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत(Pashu Kisan Credit Cards) देण्यात येत असलेली व्याज सवलत ही  2 टक्के इतकी राहणार आहेत, जर पशुपालक घेतलेल्या कर्जाची वेळेत  परतफेड करत असेल तर त्या पशुपालकाना अतिरिक्त व्याज सवलतीचा लाभ हा देण्यात येणार आहे.

 

 

Pashu Kisan credit card अंतर्गत मिळणारे लाभ:-

या जिल्ह्यातील पशुपालकांना किसान क्रेडिट कार्ड देण्या मागचा उद्देश हा त्या पशू पालकांना खेळते भांडवल उपलब्ध करून देणे हा आहे.

 

त्यामुळे पशुपालकांना देण्यात येणाऱ्या या किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत खालील प्रमाणे खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यात येत आहे.

 

पशू पालकांना एका गायी साठी रुपये 12 हजार  इतके भांडवल तर पशू पालकांना एका म्हशीसाठी 14 हजार रुपये इतके भांडवल तसेच पशू पालकांना शेळी गट करिता म्हणजेच १० शेळी आणि एक बोकुड  करीता 12 हजार 500 रुपये ते 20 हजार रुपये पर्यंत भांडवल उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

तसेच जे पशू पालक कुक्कुट पालन करतात अशा पशुपालकांना 100 ब्रॉयलर कुक्कुट पक्षी करीता 8 हजार रुपये इतके भांडवल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

तसेच गावठी पक्षांकरीता 5 हजार पर्यंत भांडवल उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 

 

 

वरील प्रमाणे पशू पालन करणाऱ्या पशू पालकांना खेळते भांडवल हे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. उपलब्ध करून दिलेले भांडवल हे पशू पालक जनावरांचे पशुखाद्य खरेदी करण्यासाठी तसेच पशू साथ औषध उपचार तसेच पशु चा विमा आणि इत्यादी बाबींसाठी खर्च करू शकतात.

हे सुध्दा वाचा:- नावीन्यपूर्ण योजना कागदपत्रे अपलोड

यामुळे जिल्ह्यातील पशुपालकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम होता येणार आहेत, या योजने अंतर्गत जिल्ह्यातील सर्वच पशुपालकांनी लवकरात लवकर अर्ज करावा, व या योजने अंतर्गत लाभ घ्यावा.

 

Leave a Comment