ऊस तोडणी यंत्र खरेदी अनुदान योजना 2024 अर्ज सुरू, असा करा ऑनलाईन अर्ज | Sugarcane Harvester Subsidy Scheme 2024

शेतकरी बांधवांनो राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस तोडणी करत असताना येणाऱ्या अडचणीला मात करण्यासाठी राज्य शासनाच्या मार्फत शेतकरी बांधवांना ऊस तोडणी च्या यंत्रावर अनुदान देण्यात येत आहे. ऊस तोडणी यंत्राची किंमत अतिशय महाग असल्यामुळे स्वतः शेतकरी ही यंत्रविना अनुदानाशिवाय खरेदी करू शकत नाही त्यामुळे राज्य शासन शेतकऱ्यांना हे यंत्र खरेदी करण्यासाठी या Sugarcane Harvester Subsidy Scheme अंतर्गत ऑनलाईन अर्ज मागवून अनुदानित करीत आहे.

 

ऊस तोडणी यंत्र योजना 2024: Sugarcane Harvester Subsidy 2024:

शेतकरी बांधवांना आपल्या महाराष्ट्र राज्य मध्ये देशांमध्ये होणाऱ्या एकूण ऊस उत्पादनाच्या जास्तीत जास्त हिस्सा राज्यांमध्ये पिकवले जाते. आपल्या राज्यातील अशी अनेक जिल्हे आहेत जे स्पेशल ऊस उत्पादक शेतकऱ्यांची जिल्हे म्हणून ओळखले जाते. त्यामुळे ऊस तोडणी करत असताना शेतकऱ्यांना ती सहज करता यावी दिवसेंदिवस मजुरांची संख्या कमी होत असल्यामुळे तसेच साखर कारखान्यांना ऊस तोडणीची समस्या निर्माण होत असल्यामुळे राज्य शासन ऊस तोडणी अनुदान योजना 2024 अंतर्गत अनुदान वाटप करत आहे.

 

ऊस तोडणी यंत्र या योजनेअंतर्गत मिळणार अनुदान?

राज्य शासनाच्या मार्फत ऊस तोडणी खरेदी यंत्रावर अनुदान हे राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या अंतर्गत देण्यात येत आहे. योजनेचा अर्ज महाडीबीटीच्या पोर्टल वरून करता येतो.

 

अनुदान किती मिळते?

अंतर्गत ऊस तोडणी यंत्राच्या खरेदी किंमतीच्या 40% किंवा जास्तीत जास्त 35 लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे अनुदान मिळते. योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र शासन कृषी विभाग करत आहे.

 

 

ऊस तोडणी यंत्र खरेदी योजना अर्ज कसा करायचा? How to apply for Sugarcane Harvester Subsidy Scheme

या योजनेअंतर्गत संबंधित शेतकरी बांधवांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. शेतकरी बांधवांनी सर्वात प्रथम महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर नोंदणी करून घ्यावी त्यानंतर राष्ट्रीय कृषी विकास योजना या घटकांमध्ये तुम्हाला ऊस तोडणी यंत्र याकरिता करावयाचा अर्ज दिसेल त्यावर क्लिक करून ऑनलाईन अर्ज सादर करता येतो. अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी लिंक खाली दिलेली आहे.

 

 

अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ/वेबसाइट, महाडीबीटी शेतकरी पोर्टल अर्ज येथे करा

 

महाडीबीटी पोर्टल वर जाऊन अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करू शकतात.

Leave a Comment