महत्वाची बातमी, देशात वन रेशन कार्ड योजना सुरू, आता भारताच्या कोणत्याही भागातून घेता येणार रेशन धान्य | One Nation One Ration

मित्रांनो केंद्र शासनाने संपूर्ण देशभरामध्ये वन नेशन वन रेशन कार्ड योजना यापूर्वी सुद्धा सुरू केलेली होती परंतु त्याची अंमलबजावणी अद्याप सुरू झालेली नव्हती. परंतु आता शासनाने महत्त्वाचे असणारी ही वन नेशन वन रेशन योजना संपूर्ण देशभरामध्ये लागू केलेली आहे. त्यामुळे आता आपल्याला देशाच्या कोणत्याही ठिकाणी राहून रेशन धान्य मिळवता येणार आहे.

 

नेमकं काय आहे योजना?

वन नेशन वन रेशन ही योजना केंद्र शासनाचे महत्त्वकांशी योजना असून योजनेच्या अंतर्गत आता देशातील कोणत्याही रेशन कार्ड धारकांना देशातील कोणत्याही रेशन धान्य दुकानांमधून त्यांची राशन धान्य मिळवता येणार आहे. यापूर्वी आपल्याला रेशन धान्य केवळ आपल्या स्वतःच्या राज्यांमध्येच मिळवता येत होती परंतु आता देशातील कोणत्याही भागातून तुम्ही रेशन धान्य मिळवू शकता.

 

 

या नागरिकांना होणार फायदा:

देशातील जे नागरिक कामानिमित्त स्थलांतरित होता या राज्यातून त्या राज्यामध्ये कामाकरिता जातात अशा नागरिकांना त्या राज्यामध्ये सुद्धा आता रेशन धान्य मिळवता येणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अशा नागरिकांना फायदा होणार आहे.

 

केंद्र शासनाच्या ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने या संदर्भात अधिकृत माहिती ट्विट करून दिलेली आहे. योजना देशातील 36 राज्य आणि सर्व केंद्रशासित प्रदेशाच्या कक्षेत राबविण्यात येत आहे. या योजनेमुळे देशभरातील 80 कोटी एन एफ एस ए वापर करताना कोणत्याही राज्यातील fps दुकानांमधून रेशन खरेदी करता येणार आहे.

Leave a Comment