रासायनिक खतांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घट! जाणून घ्या रासायनिक खतांचे नवीन दर | Fertilizer rates

शेतकरी मित्रांनो रासायनिक खतांच्या किमतीमध्ये बदल करण्यात आलेला आहे. आपण आपल्या शेतामध्ये रासायनिक खतांचा वापर करत असतो. परंतु गेल्या वर्षी रासायनिक खतांच्या किमतीमध्ये केंद्र शासनाने मोठ्या प्रमाणात वाढ केलेली होती. परंतु त्यानंतर शेतकऱ्यांनी खतांच्या किमती कमी करण्याची मागणी केलेली असताना आता केंद्र शासनाने पुन्हा एकदा खतांच्या किमती नव्याने जाहीर करून किमतीमध्ये घट केलेली आहे. रासायनिक खतांचे नवीन दर काय आहे, रासायनिक खतांच्या किमती किती रुपयांनी कमी झालेले आहेत तसेच कोणत्या कंपन्यांनी रासायनिक Fertilizer rates Decrease केलेले आहे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या लेखात जाणून घेऊया.

 

मित्रांनो आपल्या भारत देशात रासायनिक खत पुरवणाऱ्या अनेक सरकारी व प्रायव्हेट कंपनी आहेत. ज्यांच्या मार्फत आपण रासायनिक खते खरेदी करतो व आपल्या शेतामध्ये त्याचा वापर करतो. दिवसेंदिवस शेतीवर होणारा खर्च वाढत आहे, परंतु शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झालेली नसून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला हवा असलेला बाजार भाव सुद्धा वेळेवर पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे हे तोट्याचे होत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा झाल्यास शासन खतांच्या तसेच औषधांच्या किमती करून शेतकऱ्यांवरील होणारा अतिरिक्त भार कमी करू शकतात.

 

रासायनिक खतांच्या किमती पुन्हा एकदा कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळालेला आहे. Rasayanik Khatache Bhav जास्त असल्यास शेतकऱ्यांना शेती करणे पुरणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता शासन खतांवर शेतकऱ्यांना सबसिडी प्रदान करत असते. या पोस्टमध्ये आपण खतांच्या किमती पाहणार आहोत परंतु त्या किमती अनुदान वजा न करता आहेत. म्हणजेच खतांच्या मूळ किमती आपण पाहणार आहोत त्या खतावर शासनाच्या माध्यमातून अनुदान देण्यात येत असते. शासनाच्या माध्यमातून खतांच्या किमतीवर देण्यात येणारे अनुदान हे खतांच्या नुसार असते.

 

रासायनिक खतांचे बाजार भाव जाहीर

देशातील शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी शासन विविध प्रकारचे योजना राबवत असते तसेच शेतकऱ्यांकरिता बजेटमध्ये आर्थिक तरतूद करून त्यांच्याकरिता वेळोवेळी सवलती देण्यात येत असते. त्यामुळे शासन वेळोवेळी महागाई मध्ये वाढ होत असताना सुद्धा खतांच्या किमती नियंत्रित आणण्यासाठी अतिरिक्त निधी खर्च करून शेतकऱ्यांना दिलासा देत असते.

जर प्रायव्हेट कंपन्यांनी खतांच्या किमती वाढवल्या तर शासन त्यांना खतांच्या किमती कमी करण्याचा सल्ला देते तसेच किमती वाढल्या तर अनुदानाची रक्कम वाढवते जेणेकरून शेतकऱ्यांना पूर्वी ज्या रेटमध्ये खत मिळत होते त्याच रेट मध्ये मिळेल. त्यामुळे आता नव्याने जाहीर झालेल्या रासायनिक खतांच्या किमती आपण खाली जाणून घेणार आहोत.

देशातील कोणतेही शेतकऱ्यांना रासायनिक खते खरेदी करत असताना त्या खतांच्या शासनाच्या मार्फत जाहीर झालेल्या ओरिजनल किमती किती आहे या माहीत असल्या पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्यांची कोणत्याही परिस्थितीत फसवणूक होणार नाही व शेतकरी ज्या दरामध्ये खत उपलब्ध आहे त्या घरांमध्ये विकत घेऊ शकतील. शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा योग्य दर माहीत असल्यास शेतकऱ्यांना ते खरेदी करत असताना कोणत्याही प्रकारची अडचण जाणार नाही.

 

अखेर शेतकऱ्यांना 15000 रुपये बोनस वितरणाचा शासन निर्णय जाहीर; लगेच पहा अधिकृत निर्णय, कुणाला मिळेल लाभ

रासायनिक खतांच्या नवीन किमती

Rasayanik Khatache Bhav आम्ही तुम्हाला खाली दिलेल्या आहेत. परंतु या किमती मध्ये अनुदानाची रक्कम समाविष्ट नाही. या खतांच्या मूळ किमती आहेत. म्हणजेच वरील किमतीमध्ये शेतकऱ्यांना शासनामार्फत असणाऱ्या अनुदानाची रक्कम वजा करून उर्वरित रकमेने खतांची विक्री करण्यात येते.

शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणारे खत म्हणजे युरिया होय. या युरिया चा 45 किलोच्या बॅगीचा दर हा 2450 रुपये आहे. तसेच एनपीके या खताचा प्रति बॅग 50 किलोचा दर 3291 रुपये आहे. तसेच एमओपीचा दर हा 50 किलो प्रति बॅग प्रमाणे 2654 रुपये इतका आहे. डीएपी चा प्रतिबॅक 50 किलोचा दर हा 4073 रुपये इतका आहे.

 

जमीन नावावर करा फक्त 100 रुपयात; या पद्धतीने करता येते केवळ शंभर रुपयांत जमीन नावावर; खात्रीशीर पद्धत, जाणुन घ्या संपूर्ण माहिती

 

अशाप्रकारे नवीन सुधारित रासायनिक खतांच्या किमती आहेत. या किमती अनुदानाशिवाय आहेत. म्हणजेच या किमतीवर शासनाने जाहीर केलेले अनुदानाची रक्कम वजा करून उर्वरित रकमेने शेतकऱ्यांना या रासायनिक खतांची विक्री करण्यात येते.

तुमच्या ग्रामपंचायत मध्ये किती योजना आल्या! त्याकरिता किती पैसा मंजूर झाला! हे माहीत करा कर्मचारी तुम्हाला घाबरतील!

केंद्र शासनाच्या मार्फत प्रत्येक रासायनिक खतांवर अनुदान देण्यात येत असून प्रत्येक राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दर तुम्हाला आढळू शकतात.

Leave a Comment