मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्याची मंत्रिमंडळाची बैठक काल मुंबई येथे पार पडली होती. या महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या हितार्थ अनेक निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यापैकी सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये बोनस वितरण करण्याचा निर्णय झालेला आहे. कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे बोनस मिळणार तसेच कोणते पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही Shetkari Bonas Yojana Maharashtra अंतर्गत बोनस मिळणार या संदर्भात विस्तृत माहिती आपण जाणून घेऊया.
मित्रांनो राज्यात जून ते ऑक्टोबर 2022 मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आणि प्रचंड पूर आले होते, त्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या विविध शेती पिकांचे नुकसान झालेले होते. मित्रांनो त्याकरिता राज्य शासनाने अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी देखील जाहीर केलेला आहे.
15 हजार बोनस ची घोषणा कधी झाली?
परंतु राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा निधी अजून पर्यंत मिळालेल्या नसल्यामुळे दान उत्पादक शेतकऱ्यांकडून बोनस जाहीर करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आलेली होती. तसेच नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा विरोधी पक्षाच्या वतीने सरकारला धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी कोणते निर्णय घेणार असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 15000 Bonas देण्याची घोषणा केली होती.
फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार 15000 बोनस; येथे जाणून घ्या तुम्हाला मिळणार का
पंधरा हजार बोनस वितरणाचा निर्णय कधी घेतला?
मित्रांनो काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 15000 बोनस देण्याचा महत्त्वपूर्ण असा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. मित्रांनो राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना झालेले नुकसान भरून काढता यावी याकरिता त्यांना दिलासा म्हणून तीन हेक्टर पर्यंत बोनस देण्यात येणार आहे.
फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार 15000 बोनस; येथे जाणून घ्या तुम्हाला मिळणार का
अखेर शेतकऱ्यांना बोनस वितरणाचा शासन निर्णय जाहीर:
मित्रांनो अनेक दिवसांपासून 15 हजार बोनस शेतकऱ्यांना कधी मिळणार याची वाट शेतकरी पाहत होते. परंतु पंधरा हजार बोनस वितरणाची घोषणा होऊन अनेक दिवस झाले होते, परंतु त्या संदर्भात कोणत्याही प्रकारचा अधिकृत शासन निर्णय जाहीर झालेला नव्हता. परंतु आता महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या 15000 बोनस योजनेचा अधिकृत शासन निर्णय जाहीर केलेला आहे.
15 हजार बोनस कोणत्या जिल्ह्यातील व कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार?
मित्रांनो पंधरा हजार बोनस हा राज्यातील सर्व जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे. मित्रांनो राज्यातील अनेक धान उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना हा बोनस राज्य सरकार त्यांच्या खात्यात वितरित करणार आहे.