वनरक्षक भरती नवीन वेळापत्रक जाहीर; आत्ताच डाऊनलोड करा | Vanrakshak bharti New Time Table

 

मित्रांनो महाराष्ट्र राज्यात वन विभागाच्या वतीने वनरक्षक भरती राबविण्यात येत आहे. वनरक्षक भरती चे नवीन वेळापत्रक हे जाहीर करण्यात आलेले असून जे उमेदवार वनरक्षक भरतीची तयारी करत होती किंवा वनरक्षक भरती अंतर्गत त्यांना अर्ज करून महाराष्ट्र राज्यातील वनरक्षक भरती अंतर्गत नोकरी मिळवायचे आहे, अशा उमेदवारांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अशी बातमी प्राप्त झालेली आहे. त्यामुळे आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला Vanrakshak Bharti 2023 चे नवीन वेळापत्रक तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. तर चला जाणून घेऊया Vanrakshak bharti Time Table संदर्भात संपूर्ण माहिती.

 

वनरक्षक भरती नवीन वेळापत्रक जाहीर; आत्ताच डाऊनलोड करा | Vanrakshak bharti New Time Table
वनरक्षक भरती नवीन वेळापत्रक जाहीर; आत्ताच डाऊनलोड करा | Vanrakshak bharti New Time Table

 

 

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले गट क संवर्गातील सर्व पदे ही सरळ सेवेच्या माध्यमातून आयबीपीएस किंवा टीसीएस या कंपनीद्वारे भरण्याचा निर्णय घेतला होता. वन विभाग भरतीच्या पूर्वीच्या वेळापत्रकानुसार भरतीची जाहिरात 20 डिसेंबर पर्यंत येणार होती, तसेच वन विभागाची पपरीक्षा ही 10 ते 20 जानेवारीपर्यंत होणार होती. तसेच या परीक्षेचा अंतिम निकाल पूर्वीच्या वेळापत्रकानुसार 30 जानेवारीला लागणार होता. परंतु आता यामध्ये बदल करण्यात आलेला असून नवीन सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता Vanrakshak Bharti 2023 Maharashtra चे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलेली असून वनरक्षक भरती 2023 याच वेळापत्रकानुसार राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने लवकरच गट क, गट ड आणि गट ब- अराजपत्रित या संवर्गातील सर्व पदे सरळ सेवा परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणार आहे.

महत्वाचं अपडेट: तलाठी भरती 2023 संदर्भात नवीन शासन निर्णय जाहीर. या तारखेला होणार पेपर

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने Vanrakshak Bharti 2023 ही लवकरच राबविण्यात येत असून या वनरक्षक भरती 2023 महाराष्ट्र ची अधिकृत जाहिरात 15 जानेवारी च्या आत जाहीर करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यात वन विभागाची अनेक पदे रिक्त असून या Van Vibhag Bharti Maharashtra अंतर्गत लवकरच वनरक्षकाची मेगा भरती राबविण्यात येत आहे. राज्यात असे अनेक उमेदवार आहेत जे राज्याच्या वन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या वनरक्षक या पदाकरिता अर्ज करू इच्छित आहे. वनरक्षक भरती करिता पात्र असलेल्या उमेदवारांना आता भरती प्रक्रियेची जास्त वाट पाहण्याची गरज नसून 15 जानेवारी या तारखेपर्यंत जाहिरात निघणार असून भरतीची परीक्षा फेब्रुवारी महिन्यात आयोजित करण्यात येईल. आता आपण वनरक्षक भरतीचा टाईम टेबल विस्तृतपणे जाणून घेऊया.

 

वनरक्षक भरती 2023 वेळापत्रक Vanrakshak Bharti 2023 Time Table

आपल्या महाराष्ट्र राज्यात वन विभागाच्या वतीने वनरक्षक भरती प्रक्रिया खालील प्रमाणे वेळापत्रकानुसार (vanrakshak bharti new time table) राबविण्यात येत आहे.

1. भरतीची जाहिरात प्रसिद्ध करणे 15 जानेवारी 2023 पर्यंत

2. वनरक्षक भरती अंतर्गत उमेदवारांकडून अर्ज स्वीकारणे 31 जानेवारी 2023 पर्यंत

3. वन विभागाची वनरक्षक भरतीची ऑनलाईन परीक्षा 01 फेब्रुवारी 2023 ते 20 फेब्रुवारी 2023 या कालावधी दरम्यान आयोजित करण्यात येईल.

4. या परीक्षेचा ऑनलाईन निकाल 25 फेब्रुवारी 2023 पर्यंत जाहीर करण्यात येईल.

5. 15 एप्रिल 2023 पर्यंत आवश्यक पदांची चाचणी करण्यात येईल.

6. वन विभाग भरती अंतर्गत अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 30 एप्रिल 2023 पर्यंत नियुक्तीचे आदेश देण्यात येईल.

 

 

जाणून घ्या वनरक्षक भरती चा अभ्यासक्रम तसेच जिल्हानिहाय रिक्त जागा 

वन विभाग भरती महाराष्ट्र Van Vibhag Bharti

मित्रांनो महाराष्ट्र राज्यात वरील वेळापत्रकानुसार वन विभाग भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून Van Rakshak Bharti Maharashtra सरळ सेवेच्या माध्यमातून टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच tcs या कंपनीच्या माध्यमातून राबविण्यात मान्यता देण्याची कार्यवाही सुरू झालेली आहे. वनविभाग भरतीच्या पूर्वीच्या वेळापत्रकानुसार परीक्षांचे आयोजन करणे शक्य नसल्यामुळे पूर्वीचा कार्यक्रम रद्द करण्यात आलेला असून वरील प्रमाणे नवीन वेळापत्रकानुसार ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

 

वन विभाग भरती संदर्भातील वनरक्षक पदाची ही माहिती तुम्हाला नक्कीच महत्त्वपूर्ण वाटत असेल. ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अशा माहितीकरिता या वेबसाईटवर भेट देत राहा.

Leave a Comment