वनरक्षक भरती 2022 माहिती; परीक्षेचे वेळापत्रक, अभ्यासक्रम, रिक्त जागा | Van Vibhag Bharti 2022 Maharashtra

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये वन विभाग भरती 2022 राबविण्यात येणार असून वन विभाग भरती 2022 करिता आवश्यक पात्रता तसेच लागणारी आवश्यक कागदपत्रे व वन विभाग भरती परीक्षेचे वेळापत्रक तसेच या भरती अंतर्गत भरण्यात येणाऱ्या एकूण रिक्त जागा या Van Vibhag Bharti 2022 Maharashtra संदर्भात विस्तृत माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

 

वनरक्षक भरती 2022 माहिती; परीक्षेचे वेळापत्रक, अभ्यासक्रम, रिक्त जागा | Van Vibhag Bharti 2022 Maharashtra
वनरक्षक भरती 2022 माहिती; परीक्षेचे वेळापत्रक, अभ्यासक्रम, रिक्त जागा | Van Vibhag Bharti 2022 Maharashtra

 

 

आपल्या महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र शासनाच्या वतीने वन विभाग भरती आयोजित करण्यात येणार असून या संबंधात संपूर्ण प्रक्रिया सुरू झालेली आहे. वन विभाग भरती संदर्भात शासन निर्णय सुद्धा प्रकाशित करण्यात आलेला असून लवकरच भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्यामुळे जे उमेदवार वन विभाग भरती (Van Vibhag Bharti 2022 Maharashtra)अंतर्गत नोकरी करू इच्छित आहेत त्यांनी लवकरात लवकर अभ्यासाला लागायचे आहे. त्यामुळे आजच्या या पोस्टमध्ये वन विभाग भरती संदर्भात विस्तृत माहिती जाणून घेऊया.

 

Van Vibhag Bharti Maharashtra ही आपल्या राज्यात येणाऱ्या दोन महिन्यांमध्ये सुरू होणार असून याकरिता पात्रता तसेच या भरतीचा अभ्यासक्रम आपल्याला माहीत होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे एकूण रिक्त जागा माहीत असल्यास आपण त्याप्रमाणे अभ्यास करू शकतो.

 

वन विभाग भरती अभ्यासक्रम :-

मित्रांनो वन विभाग भरती(Van Vibhag Bharti Maharashtra) अंतर्गत 120 मार्काची परीक्षा घेण्यात येईल त्यामध्ये चार विषय असतील. तसेच शारीरिक परीक्षा 80 मार्गाची असणार आहे. एकूण 200 गुणांची परीक्षा आहे त्यामध्ये सामान्य ज्ञान या विषयाला 30 गुण असतील तर मराठी विषयाला 30 गुण तसेच इंग्लिश विषयाला 30 गुण आणि बौद्धिक चाचणीला 30 गुण असतील. अशी 120 मार्गाची लेखी परीक्षा व 80 मार्गाची शारीरिक परीक्षा असणार आहे.

 

👉💥3826 पदांसाठी तलाठी भरती 2023 सुरू; नवीन GR आला Talathi Bharti 2023💥

 

वनरक्षक भरती महत्वपूर्ण सूचना Van Vibhag Bharati :-

वनरक्षक भरती अंतर्गत घेण्यात येणारी परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने असणार आहे उमेदवारांना परीक्षा दरम्यान लेखी परीक्षेकरिता 90 मिनिटे वेळ देण्यात येईल. वन विभाग भरती परीक्षेची अंमलबजावणी ही आयबीपीएस किंवा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या दोन पैकी एका कंपनीद्वारे करण्यात येईल. तसेच वनरक्षक भरती 2022 महाराष्ट्र अंतर्गत परीक्षेमध्ये सुद्धा 0.25 प्रमाणे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. म्हणजे तुमचे चार प्रश्न चुकीचे ठरल्यास तुमचा एक मार्क कमी होणार आहे.

 

महत्वाचं अपडेट:- पोलीस भरती मैदानी चाचणी तारीख जाहीर 

वन विभाग भरती महाराष्ट्र वेळापत्रक Van Vibhag Bharati Maharashtra

खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार महाराष्ट्रात वन विभाग भरती प्रक्रिया(Van Vibhag Bharati) राबविण्यात येणार आहे, वन विभाग भरती वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.

 

1. वन विभाग भरती जाहिरात- 20 डिसेंबर 2022 पर्यंत येईल

2. वन विभाग भरती अर्ज 31 डिसेंबर 2022 पर्यंत स्वीकारण्यात येईल.

3. वन विभाग भरतीची ऑनलाईन परीक्षा ही 10 जानेवारी 2023 ते 20 जानेवारी 2023 पर्यंत आयोजित करण्यात येईल.

4. वन विभाग भरती चा परीक्षेचा निकाल हा 30 जानेवारी 2023 पर्यंत लावण्यात येईल

5. वन विभाग भरतीची शारीरिक चाचणी 10 फेब्रुवारी 2023 ते 20 फेब्रुवारी 2023 पर्यंत आयोजित करण्यात येईल.

6. वन विभाग भरती ची अंतिम यादी 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत लागेल

7. वन विभाग भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नियुक्तीपत्र देण्यात येईल

वनरक्षक भरती 2022 माहिती; परीक्षेचे वेळापत्रक, अभ्यासक्रम, रिक्त जागा | Van Vibhag Bharti 2022 Maharashtra

सर्व भरती विषयक अपडेट मिळवण्यासाठी इथे क्लिक करून आमच्या what’s app ग्रुप वर जॉइन व्हा. 

 

अशाप्रकारे वन विभाग भरती चा महाराष्ट्राचा हा संभाव्य टाईम टेबल आहे. वरील दिलेल्या टाईम टेबल मध्ये थोडेफार बदल होऊ शकतात.

 

वन विभाग भरती वेतन किती असेल? Van Rakshak Bharati

वन विभाग भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 20 हजार ते 25 हजार रुपये पर्यंत वेतन देण्यात येत असते.

 

हे नक्की:- जिल्हा परिषद भरती प्रक्रिया सुरू; असा करा ऑनलाईन अर्ज 

वन विभाग भरती महाराष्ट्र वयोमर्यादा?

वन विभाग भरती महाराष्ट्र(Van Vibhag Bharati Maharashtra) अंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय हे अर्ज करण्याच्या तारखेपासून कमीत कमी 18 वर्षे पूर्ण तसेच जास्तीत जास्त 28 वर्ष असे राहू शकते. जात प्रवर्गानुसार काही सूट देण्यात येत असते तसेच यामध्ये जाहिरात निघाल्यानंतर थोडाफार बदल होऊ शकतो.

1 thought on “वनरक्षक भरती 2022 माहिती; परीक्षेचे वेळापत्रक, अभ्यासक्रम, रिक्त जागा | Van Vibhag Bharti 2022 Maharashtra”

Leave a Comment