सायबर क्राईम ऑनलाईन कंप्लेंट कशी करायची? | Cyber Crime Online Complaint Process

 

मित्रांनो आता मोबाईल चा इंटरनेट चा डिजिटल साधनांचा वापर हा खूप जास्त वाढलेला आहे. आता प्रत्येक जण ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करत आहे, बँकेची कामे, ऑफिस ची कामे, इतर अनेक कामे ही आता आपण ऑनलाईन पद्धतीने करणे जास्त पसंद करत आहोत, ऑनलाईन पद्धतीने सर्व गोष्टी केल्यामुळे आपली कामे सहजरित्या होत आहेत, परंतु ऑनलाईन आता ऑनलाईन फ्रॉड सुद्धा वाढलेले आहेत. तुम्ही बऱ्याच वेळा ऐकले असेल की, एकाध्याच्या बँकेतील पैसे ऑनलाईन पद्धतीने फ्रॉड करून चोरले जाते, हल्ली फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत तर कुणाची वैयक्तिक माहिती ही सार्वजनिक करण्यात येते, तर एकाध्या व्यक्तीसोबत अनेक प्रकारचे ऑनलाईन फ्रॉड करण्यात येत आहेत. त्यामुळे जर तुमच्या सोबत ही फ्रॉड झाला असल्यास आपण सायबर क्राईम ऑनलाईन कंप्लेंट करू शकतो. आजच्या या पोस्ट मध्ये आपण ऑनलाईन फ्रॉड झाल्यास सायबर क्राइमची ऑनलाइन तक्रार कशी नोंदवायची या विषयी विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत. Cyber Crime online Complaint Information Marathi, Cyber Crime online Complaint In Marathi

सायबर क्राईम ऑनलाईन कंप्लेंट कशी करायची? | Cyber Crime Online Complaint Process
सायबर क्राईम ऑनलाईन कंप्लेंट कशी करायची? | Cyber Crime Online Complaint Process

 

सायबर क्राईम माहिती मराठी Cyber Crime Information Marathi

सायबर क्राईम म्हणजे ऑनलाईन पद्धतीने गुन्हा करणे होय. एखाद्याची लपून खासगी माहिती घेणे किंवा चोरणे आणि त्या चुकीच्या पद्धतीने वापरणे म्हणजे सायबर क्राइम  होय. Cyber Crime

आता आपल्याला सायबर क्राइमविरोधात ऑनलाइन तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध आहेत, त्यामुळे आपल्याला Cyber Crime online Complaint कशी करायची? हे माहीत असणे गरजेचे आहे. त्याच प्रमाणे online fraud पासून होण्यापासून कसे सावध रहावे, हे सुद्धा माहिती असणे आवश्यक आहे. कारण की Cyber Crime च्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. Cyber Crime online Complaint Process

 

सायबर क्राईम ऑनलाईन कंप्लेंट कशी करायची? How to Do Cyber Crime Complaint Online

जर तुमच्या सोबत ऑनलाईन पद्धतीने सायबर क्राईम(cyber crime complaint information Marathi) होत असेल किंवा झाला असेल तर आपण लवकरात लवकर सायबर क्राईम ऑनलाईन कंप्लेंट(Cyber Crime online Complaint) करुन होणारे नुकसान टाळू शकतो.

सायबर क्राईम ऑनलाईन कंप्लेंट करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.

1. सर्वप्रथम तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरमध्ये कोणतेही ब्राउझर ओपन करून घ्या. जसे की, गुगल क्रोम ब्राउझर किंवा दुसरे कोणतेही तुम्ही हे वापरत असाल ते.
2. आता तुम्हाला त्या ब्राउझर मध्ये खाली दिलेली सायबर क्राईम ऑनलाईन तक्रार करण्याची वेबसाईट ही ओपन करायची आहे.
Cyber Crime Compliant Website –  www.cybercrime.gov.in

3. वरील वेबसाईट ओपन केल्या नंतर आता आपल्या समोर एक नवीन dashbord हा ओपन झालेला आहे. आता स्क्रोल डाऊन करा आणि FIle a Complaint हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करून घ्या.
4. आता तुम्हाला वेगवेळ्या प्रकारच्या सायबर क्राईम संबंधित कंप्लेंट दिसत असेल त्या पैकी तुमच्या तक्रार ज्या प्रकारची आहे, ते निवडून घ्या.
5. आता तुम्हाला आपले महाराष्ट्र राज्य निवडणूक घ्यायचे आहे, त्यानंतर तुमचा चालू मोबाईल नंबर व मोबाईल नंबर वर आलेला otp टाकून लॉगिन करून घ्यायचे आहे.
6. आता तुम्हाला तुमची समस्या प्रविष्ट करयची आहे, तुमच्या तक्रारीचा तपशील टाकायचा आहे. नंतर नेक्स्ट या पर्याय वर क्लिक करा.
7. आता तुम्हाला तुमचा ईमेल आयडी आणि फोटो सबमिट करायचा आहे, त्यानंतर तुमच्या तक्रारीची पडताळणी केली जाते.
8. पडताळणी झाल्या नंतर कन्फर्म या पर्याय वर क्लिक करा. आणि तक्रार सबमिट करा. आता तक्रार सबमिट झाल्या नंतर तुम्ही केलेल्या cyber crime complaint ची प्रत तुम्हाला pdf या फॉरमॅट मध्ये डाउनलोड करता येते.
9. तसेच आपण केलेल्या तक्रारीला आपण ट्रॅक करू शकतो, आपल्या तक्रारीचे स्टेटस चेक करू शकतो.

हे नक्की वाचा:- डिमॅट अकाउंट काय आहे? ते कसे ओपन करायचे?

सायबर क्राईम होण्यापासून कसे सुरक्षित राहायचे? How to stay safe from cybercrime?

खालील गोष्टी लक्षात ठेऊन त्या पाळून आपण सायबर क्राईम पासून आपला बचाव करू शकतो. cyber crime in marathi, Cyber crime Mahiti Marathi

1. कोणतेही मोबाईल ॲप्लिकेशन हे कोणत्याही लिंक वरून डाऊनलोड न करता ते ऑफिसर वेबसाईटवरून किंवा प्लेस्टोरवरूनच डाऊनलोड करावे.
2. कोणत्याही ऑनलाईन योजनेत किंवा पैसे. जिंकून देणाऱ्या योजने च्या लोभात पडू नका.
3. अनोळखी व्यक्ती ने पाठविलेल्या कोणत्याही लिंक वर क्लिक करू नये.
4. कोणत्याही वेबसाईट वर आपली वैयक्तिक माहिती प्रविष्ट करू नका.
5. ऑनलाईन खरेदी फक्त विश्वसनीय वेबसाईट वरूनच करा.
6. आपल्या बँकेची माहिती जसे की, atm किंवा डेबिट कार्ड नंबर, cvv, otp, acc number आणि ifsc code कुणालाही सांगू नका आणि कोणत्याही अनोळखी वेबसाईट वर ही माहिती देऊ नका.

हे नक्की वाचा:- ई बँकिंग म्हणजे काय? 

 

वरील बाबींचे पालन केल्यास आपण ऑनलाईन सायबर क्राईम पासून सुरक्षित राहू शकतो.

अश्या प्रकारे आपण सायबर क्राईम ऑनलाईन तक्रार कशी करायची? आणि ऑनलाईन सायबर क्राईम पासून सुरक्षित कसे राहायचे? या संदर्भातील माहिती जाणून घेतली आहे. ही माहिती इतरांना देखील नक्की शेअर करा. अश्याच महत्वपूर्ण माहिती साठी आमच्या वेबसाईटवर भेट देत रहा.

Leave a Comment