मागेल त्याला विहीर योजना; अर्ज सुरू | Magel Tyala Vihir Yojana Maharashtra

 

शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात मागेल त्याला विहीर योजना ही महाराष्ट्र शासनाने नुकतीच सुरू केलेली आहे. या मागेल त्याला विहीर योजना अंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ घेता यावा याकरिता महाराष्ट्र शासनाने गावात मंजूर करण्यात येणाऱ्या विहिरींची संख्यांची अट ही रद्द केलेली असून आता जास्तीत जास्त लोकांना मागेल त्याला विहीर योजना magel tyala vihir yojana अंतर्गत लाभ मिळवता येणार आहे. मागेल त्याला विहीर योजना काय आहे? तसेच मागेल त्याला विहीर योजना संदर्भातील संपूर्ण माहिती Magel tyala vihir online application आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

 

मागेल त्याला विहीर योजना; अर्ज सुरू | Magel Tyala Vihir Yojana Maharashtra
मागेल त्याला विहीर योजना; अर्ज सुरू | Magel Tyala Vihir Yojana Maharashtra

 

 

मागेल त्याला विहीर योजना 2023 Magel Tyala Vihir Yojana 2023

शेतकरी मित्रांनो मागेल त्याला विहीर योजना 2023(Magel Tyala Vihir Yojana 2023) अंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना सिंचनाच्या जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध व्हाव्या, याकरिता प्रयत्न करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने नवीन विहीर बांधकाम करण्याकरिता ठरवून दिलेल्या लक्षात लवकरात लवकर पूर्ण व्हावा असे सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे मागेल त्याला विहीर योजना 2023 अंतर्गत शेतकऱ्यांना विहिरीचा लाभ देण्याची प्रक्रिया अत्यंत सुलभ करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे मागेल त्याला विहीर योजना 2023 महाराष्ट्र अंतर्गत लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

 

मागेल त्याला विहीर योजना महाराष्ट्र अंतर्गत अनुदान किती?

शेतकरी मित्रांनो मागेल त्याला विहीर योजना महाराष्ट्र(Magel Tyala Vihir Yojana Maharashtra) अंतर्गत नवीन विहीर बांधकाम करणे करिता 4 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. मागेल त्याला विहीर योजना ही मनरेगाच्या अंतर्गत राबविण्यात येणार आहे. मनरेगाच्या निकषांमध्ये बदल करून नव्या रूपाने ही योजना राबविण्यात येत आहे.

 

मागेल त्याला विहीर योजना अर्ज Magel Tyala Vihir Scheme Maharashtra

शेतकरी मित्रांनो मागेल त्याला विहीर योजना(Magel Tyala Vihir Scheme) अंतर्गत अर्ज प्रक्रिया ही लवकरच सुरू होत आहे. 01 डिसेंबर 2023 पासून मागेल त्याला विहीर योजना अंतर्गत अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. मागेल त्याला विहीर योजना(Magel Tyala Vihir Anudan Yojana) अंतर्गत सध्या अर्ज प्रक्रिया ही ऑफलाइन असून तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये अर्ज करायचा आहे. तुमच्या ग्रामपंचायत मध्ये या योजनेअंतर्गत अर्ज स्वीकारण्याकरिता एक पेटी बसवण्यात येणार आहे, त्या पेटीमध्ये संबंधित शेतकऱ्यांना त्यांचा अर्ज आवश्यक कागदपत्रांसह जोडून त्या पेटीमध्ये टाकता येणार आहे.

 

मागेल त्याला विहीर योजना कागदपत्रे Required Documents For Magel Tyala Vihir Yojana

मागेल त्याला विहीर योजना अंतर्गत अर्जदाराकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

1. प्रपत्र अ व प्रपत्र ब

2. रोजगार हमी योजनेची जॉब कार्ड

3. लाभार्थी हा जात प्रवर्गातील असेल तर कास्ट सर्टिफिकेट

4. सातबारा व आठ अ

5. शेतकऱ्यांचे आधार कार्ड

वरील अर्ज व कागदपत्रे जोडून अर्ज करावा.

 

 

मागेल त्याला विहीर योजना अर्ज डाऊनलोड करा Magel Tyala Vihir Yojana Application

शेतकरी मित्रांनो मागेल त्याला विहीर योजना(vihir anudan yojana maharashtra) अंतर्गत ऑफलाइन अर्जाचा नमुना हा आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. त्याचबरोबर मागेल त्याला विहीर योजना संदर्भातील महत्त्वपूर्ण असा महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय सुद्धा आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. त्याची लिंक आम्ही तुम्हाला खाली दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही तो शासन निर्णय तसेच अर्ज डाऊनलोड करू शकतात.

 

रोजगार हमी योजना सिंचन विहीर अर्ज pdf 

 

वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून मागेल त्याला विहीर योजना अंतर्गत करावयाचा अर्जाचा नमुना तसेच शासन निर्णय डाऊनलोड करून घ्या.

 

हे नक्की वाचा:- घरकुल योजना यादी 2022-23 जाहीर! आत्ताच डाऊनलोड करा.

Vihir yojana 2023 online application maharashtra

मागेल त्याला विहीर योजना अंतर्गत सध्या अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन राबविण्यात येत आहे. परंतु लवकरच मागेल त्याला विहीर योजना अंतर्गत Vihir yojana 2023 online application maharashtra हे सुरू होणार आहेत. मागेल त्याला विहीर योजना अंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात आल्यानंतर शेतकरी बांधवांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

मागेल त्याला विहीर योजना अंतर्गत अर्ज कोण करू शकतो?

मागेल त्याला विहीर योजना अंतर्गत खालील प्रवर्गातील अर्जदारांना अर्ज करता येतो.

1. अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्ती

2. अनुसूचित जमाती प्रवर्गातील व्यक्ती

3. भटक्या व विमुक्त जाती प्रवर्गातील व्यक्ती

4. इतर मागासवर्गीय प्रवर्गातील व्यक्ती

5. ओपन कॅटेगिरीतील व्यक्ती

6. महिला कर्ता असलेल्या कुटुंबातील महिला

7. इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी

8. जॉब कार्ड धारक व्यक्ती

 

वरीलपैकी कोणत्याही प्रकारामध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्हाला मागेल त्याला विहीर योजना अंतर्गत लाभ मिळवता येतो.

 

महत्वाचं अपडेट:- 50,000 अनुदान योजना नवीन यादी आज जाहीर झाली. आत्ताच डाऊनलोड करा

.

मागेल त्याला विहीर योजना संदर्भातील ही माहिती तुम्हाला आवडल्यास इतर शेतकरी बांधवांना देखील नक्की शेअर करा. अशाच माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत राहा.

Leave a Comment

WhatsApp Icon