नोकरदारांसाठी केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, आता एक वर्ष काम केलं तरी मिळणार ग्रॅच्युईटी | Gratuity New Update

 

जे लोक कामगार आहेत, नोकरदार आहेत कंपनीमध्ये काम करत आहेत, यांच्या करिता साठी केंद्र सरकारच्या वतीने महत्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे. या नोकरदारांना कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी ही आता एक वर्षे काम केल्यावरही मिळणार आहे. जर कामगाराने कोणत्याही संस्थेत किंवा कंपनीमध्ये पाच वर्षे सतत काम केले तर त्या कामगारास पाच वर्षानंतर ग्रॅच्युईटी मिळत होती. परंतु आता केंद्र सरकारने या नियमांमध्ये बदल करून कोणत्याही कामगारांनी कोणत्याही संस्थेत एक वर्ष काम केल्यावरही त्याला आता ग्रॅच्युईटी,(Gratuity) मिळणार आहे. Gratuity New Update

 

नोकरदारांसाठी केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, आता एक वर्ष काम केलं तरी मिळणार ग्रॅच्युईटी | Gratuity New Update
नोकरदारांसाठी केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, आता एक वर्ष काम केलं तरी मिळणार ग्रॅच्युईटी | Gratuity New Update

 

 

 

देशातील नोकरदार लोकांसाठी अतिशय महत्त्वाची गुड न्यूज ही केंद्रीय मोदी सरकारच्या वतीने देण्यात आलेली आहे. या निर्णयाचा फायदा जास्तीत जास्त लोकांना आता होणार आहे. केंद्र शासनाच्या वतीने लवकरच आपल्या भारत देशामध्ये नवीन कामगार संहिता ही लागू करण्यात येणार आहे. देशातील कामगार सुधारणांकरिता ही संहिता लागू करण्याचे महत्त्वाचे मानण्यात येत आहे. लवकरच केंद्रशासन याची अंमलबजावणी करण्यात असल्याचे कळले आहे. त्यानंतर संपूर्ण देशात नवीन कामगार संहिता ही लागू होईल. Gratuity New Update 2022

 

 

हे नक्की वाचा:- Mutual Fund काय आहे? गुंवणुक कशी करायची?

 

केंद्र शासनाच्या वतीने लागू करण्यात येणाऱ्या नवीन कामगार संहिता नुसार कर्मचाऱ्यांच्या कामासंबंधी कर्मचाऱ्यांचे पगार, भविष्य निर्वाह निधी ( pf), कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या, ग्रॅच्युईटी त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांचे कामाचे तास हे वाढवण्यात येणार आहे आणि रजेचे दिवस हे वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या नियमांमध्ये अनेक प्रकारचे बदल आपल्याला पाहावयास मिळणार आहे. Gratuity 2022 New Update

 

 

केंद्र शासनाच्या वतीने नवीन कामगार कायदा लागू झाल्यानंतर ग्रॅच्यईटीसाठी Gratuity Update नवीन नियम हे लागू होणार आहे. या नवीन नियमानुसार कर्मचाऱ्यांना आता संस्थेत 5 वर्षे सतत काम करण्याची सक्ती राहणार नाही. कर्मचाऱ्याने एका संस्थेत एक वर्ष काम केल्यास तरी सुद्धा आता ग्रॅच्युईटी मिळणार आहे. सरकारने ही सुविधा जे कर्मचारी कंत्राट बेसवर काम करत असतात त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. ग्रॅच्यईटी कायदा 2020 चा लाभ हा फक्त फिक्स टर्म कर्मचारी यांनाच मिळणार आहे.

 

ग्रॅच्युईटी संबंधित नवीन नियम काय?

पूर्वी ग्रॅच्युईटी ही एका सस्थेत सतत पाच वर्षे काम केल्यानंतर मिळत होती. परंतु आता या Gratuity नियमांमध्ये बदल केल्यामुळे कोणत्याही संस्थेत कंत्राटी बेसवर एक वर्ष काम केले तरीसुद्धा Gratuity मिळणार आहे.

 

 

हे नक्की वाचा:- शेअर मार्केट काय आहे? गुंतवणूक कशी करायची?

 

अशाप्रकारे केंद्र शासनाच्या वतीने नोकरदारांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेऊन त्यांना दिलासा दिला आहे. ही माहिती आवडल्यास इतरांना देखील शेअर करा.

Leave a Comment