कर्जमाफी चे ५०,००० रू प्रोत्साहन अनुदान पाहिजे असेल, तर हे काम त्वरित करा | Niymit Karjmafi 2022 Maharashtra

 

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना ही वर्ष 2019 मध्ये राबवण्यात आलेली होती. या कर्जमाफी योजने अंतर्गत नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान देण्यात येणार होते. त्यामुळे आता जर तुम्ही नेहमीच कर्ज परतफेड करणारे शेतकरी असाल तर तुम्ही नियमित कर्ज माफी योजना अंतर्गत 50 हजार रुपये अनुदान मिळवण्यास पात्र आहात. परंतु जर तुम्हाला हे अनुदान हवे असेल तर खालील काम करावे लागेल नाहीतर अनुदान मिळणार नाही.

 

कर्जमाफी चे ५०,००० रू प्रोत्साहन अनुदान पाहिजे असेल, तर हे काम त्वरित करा | Niymit Karjmafi 2022 Maharashtra
कर्जमाफी चे ५०,००० रू प्रोत्साहन अनुदान पाहिजे असेल, तर हे काम त्वरित करा | Niymit Karjmafi 2022 Maharashtra

 

 

 

नियमित कर्जमाफी ५०,००० प्रोत्साहन अनुदान मिळण्यासाठी हे करा:-

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने नियमित कर्जदार शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाचा लाभ मिळण्यासाठी त्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बचत कर्ज खाते शी लिंक करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. त्यामुळे जर तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना अंतर्गत 50,000 रू प्रोत्साहन पर अनुदान हवे असल्यास लवकरात लवकर तुमच्या आधार कार्ड हे तुमच्या कर्ज खात्याची लिंक करून घ्यावी. Niymit karjmafi yadi 2022

 

 

हे नक्की वाचा:- ट्रॅक्टर अनुदान योजना 2022 लाभार्थी यादी जाहीर

 

नियमित कर्जदार शेतकरी बांधवांनी त्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खाते शी 5 सप्टेंबर च्या पूर्वी लिंक करून घ्यावे.

 

आपल्या महाराष्ट्र राज्याचा राबवण्यात आलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत जे शेतकरी कर्जदार आहेत परंतु ते दरवर्षी त्यांचे कर्ज परतफेड करत असतात, त्यामुळे अशी शेतकरी कर्जमुक्ती योजनेपासून वंचित राहू नये याकरिता महाराष्ट्र शासनाने त्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पर रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना ही रक्कम लवकरच त्यांच्या थेट बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही अजून पर्यंत तुमची आधार कार्ड तुमच्या बँक खात्याची लिंक केलेली नसेल तर लवकरात लवकर करून घ्यावे ही विनंती. mjpsky yojana list 2022

 

 

हे नक्की वाचा:- शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टीची दुप्पट रक्कम 

 

या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत वर्ष 2019 मध्ये शेतकरी महापुरामध्ये बाधित झालेले होते, आणि त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला होता अशा शेतकऱ्यांना सुद्धा या योजने करता पात्र ठरविण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे आधार कार्ड नसेल त्यांनी लवकरात लवकर आधार कार्ड नवीन काढून घेऊन ते लिंक करून घ्यायचे आहे. ज्या नियमित कर्जावर शेतकऱ्यांकडे आधार कार्ड नसेल त्यांची यादी तालुक्याच्या बँक अधिकारी गटसचिव यांनी तयार करून ते ग्रामपंचायत आणि बँक शाखेच्या ठिकाणी लावण्यात येणार आहे.

Leave a Comment