म्युच्युअल फंड म्हणजे काय? म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक कशी करावी? Mutual Funds In Marathi

मित्रांनो आजच्या या लेखा मध्ये आपण म्युच्युअल फंड म्हणजे काय आहे? या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्याच बरोबर म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक कशी करायची तसेच mutual fund कशे काम करते या विषयी सुद्धा माहिती पाहणार आहोत.

म्युच्युअल फंड म्हणजे काय? म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक कशी करावी? Mutual Funds In Marathi

 

 

तुम्ही टेलिव्हिजन वर अनेक वेळा mutual fund ची जाहिरात पाहिलेली असेल. त्या मध्ये mutual fund sahi hai असे एक वाक्य दिलेले असते. जर आपण योग्य mutual fund मध्ये गुंतवणूक केली तर आपल्याला खूप चांगले रिटर्न्स मिळू शकतात. अनेक लोकांना म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवण्यास भीती वाटते. म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंत्वल्यास त्यांचे पैसे बुडतील असे त्यांना वाटत असते. जर तुम्हाला चांगल्या म्युच्युअल फंड कंपनीची माहिती असेल अभ्यास असेल तर तुम्ही म्युच्युअल फंड च्या माध्यमातून योग्य ते रिटर्न्स मिळवू शकतात.

 

 

म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याचा फायदा काय:-

जर तुम्हाला शेअर विकत घ्यायचे असेल किंवा तुम्हाला शेअर मध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला तुम्ही ज्या कंपनीचे शेअर विकत घेणार आहात त्या कंपनीची सर्व माहिती असणे आवश्यक असते. तसेच त्या कंपनीचा रिटर्न्स, प्रॉफिट, फंडामेंटल माहिती असणे आवश्यक असते. त्याच प्रमाणे कंपनीची आत्ता पर्यंत ची ग्रोथ तसेच भविष्यात कंपनी ची ग्रोथ कशी राहील याचा अंदाज असावा लागतो. तरच तुम्ही शेअर घेऊन रिटर्न्स मिळवू शकतात.

 

एकंदरीतच शेअर्स मध्ये गुंतवणूक करण्यासाठी संपूर्ण ज्ञान असावे लागते. परंतु म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला जास्त ज्ञान नसले तरी सुद्धा चालते कारण की mutual funds मध्ये mutual fund चालवणारा mutual fund manager असतात. हे गरजेनुसार mutual funds मध्ये बदल करतात. आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी खूप जास्त पैसे असावेच असे नाही. आज तुम्ही नव्वद हजार रुपये किंमत असलेला शेअर घेऊ शकत नाहीत. परंतु 500 रुपये चा म्युच्युअल फंड घेऊन तुम्ही अशा अनेक कंपन्यांमध्ये म्हणजेच अनेक शेअर मध्ये गुंतवणूक करू शकतात.

 

 

म्युच्युअल फंड आणि स्टॉक / शेअर बाजारात काय फरक आहे:-

 

अनेक जण शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड ला सारखेच   समजत असतात. शेअर मार्केट आणि mutual funds हे बाजाराचे भाग असले तरी सुद्धा शेअर मार्केट आणि  mutual fund हे वेगवेगळे आहेत.

 

सोप्या भाषेत तुम्हाला फरक समजून सांगायचा झाल्यास शेअर मार्केट मध्ये तुम्ही प्रत्यक्ष शेअर मध्ये गुंतवणूक करू शकतात.

 

परंतु म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही एकाच वेळी अनेक शेअर मध्ये अप्रत्यक्ष पने गुंतवणूक करू शकतात. म्हणजेच mutual fund हा शेअर चा संग्रह असतो.

 

 

म्युच्युअल फंड म्हणजे काय? | What is Mutual Funds in Marathi:-

म्युच्युअल फंड हा एक अनेक गुंतवणूक दारांचे पैसे जमा करून बनविण्यात आलेला फंड म्हणजेच संग्रह असतो. आणि या म्युच्युअल फंड च्या अंतर्गत आपण अनेक जागी अप्रत्यक्ष पणे गुंतवणूक करीत असतो.

म्युच्युअल फंड हे SEBI (securities and exchange board of india) अंतर्गत नोंदणीकृत आहेत. सेबी ही भारतीय बाजारावर नियंत्रण ठेऊन असते. सेबी ही मार्केट मध्ये गुंतवणूक झालेल्या पैशाचे संरक्षण करत असते.

उदाहरणार्थ,

एकादा स्मॉल कॅप फंड असेल जसे की axis small cap fund, जर आपण या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक असेल तर या म्युच्युअल फंड ला चालविणारा मालक हा आपल्यासारख्या अनेक लोकांचे पैसे गोळा करून अनेक small cap कंपन्यांचे शेअर्स खरेदी करतो. आणि जसे जसे ते शेअर्स रिटर्न्स देतील तसा तसा हा mutual fund सुद्धा रिटर्न्स देत असतो. कारण की तो small cap mutual fund आहे. आणि त्या फंडातील कंपन्या नुसार हा फंड ग्रो होत असतो.

 

म्हणजेच आपण म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केली म्हणजे कोणताही स्पेसिफिक शेअर न घेता आपण mutual fund च्या माध्यमातून गुंतवणूक केलेली असते. Mutual fund हा अनेक लोकांचे पैसे मिळवून बनलेला असतो. म्युच्युअल फंड च्या माध्यमातून त्या mutual fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त रिटर्न्स मिळवून देण्याचा प्रयत्न हा केला जात असतो.

 

आपण एक वेळ म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केल्या नंतर आपल्याला दुसरे कोणतेही काम करण्याची गरज नाही कारण आता आपले पैसे ज्या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक झालेले आहे, त्या फंड ला चालवणारे Fund Manager हे त्याची गुंतवणूक योग्य ठिकाणी करून आपल्याला चांगले रिटर्न्स मिळवू देण्याचा प्रयत्न करत असतात.

 

 

जर तुम्हाला शेअर मार्केट समजत नसेल आणि तुम्हाला शेअर मध्ये गुंतवणूक करण्यासाठी रिसर्च करता येत नसेल तर तुम्ही चांगला mutual fund निवडून त्या मध्ये गुंतवणूक करू शकतात. अगदी सामान्य व्यक्ती सुद्धा या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करू शकतो. जर व्यक्ती कडे जास्त पैसे नसतील तरी सुद्धा तो केवळ 500 रुपये पासून प्रत्येक महिन्याला गुंतवून चांगली रक्कम मिळवू शकतो.

 

 

म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक किती प्रकारे करता येते:-

म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही one time पैसे गुंतवू शकतात. किंवा जर तुम्हाला प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही SIP करू शकतात. Mutual fund मध्ये sip केल्याने तुमच्या पैशाचे averaging होते आणि प्रत्येक वेळी वेगवेगळ्या दर मध्ये खरेदी झाल्याने जास्त रिटर्न्स मिळवू शकतात.

 

Mutual fund मध्ये गुंतवणूक करण्यासाठी sip हा एक उत्तम पर्याय आहे. ज्यामुळे तुम्हाला बचतीची सवय लागून चांगले रिटर्न्स मिळतात.

 

म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक कशी करावी? How to invest in a mutual fund in Marathi :-

जर तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही म्युच्युअल फंड च्या वेबसाइट वर जाऊन थेट गुंतवणूक करू शकतात. आपण थेट गुंतवणूक करू शकतात किंवा एकाध्य mutual fund advisor च्या मार्फत म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करू शकतात. जर तुम्हीं थेट गुंतवणूक केली तर तुम्हाला कमीशन देण्याची गरज नाही त्यामुळे तुम्हाला लॉंग टर्म मध्ये खूप चांगले रिटर्न्स मिळत असतात. याला डायरेक्ट प्लान म्हणतात.

जर सल्लागार च्या अंतर्गत गुंतवणूक केली तर कमीशन द्यावे लागते. याला रेगुलर प्लान असे म्हणतात.

जर तुम्हाला डायरेक्ट गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडच्या खालील वेबसाईट वर जाऊन investments करू शकतात. https://www.mutualfundindia.com/

किंवा आपण आपल्या कागदपत्रांसह त्याच्या कार्यालयात देखील जाऊ शकता.

 

म्युच्युअल फंड गुंतवणूक करायची असल्यास बाजारात अनेक मोबाईल application आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन सहज पणे गुंतवणूक करू शकतात.

Mutual fund मध्ये गुंतवणूक करण्यासाठी काही mobile application ची नावे खालील कागदपत्रे आहेत.

Groww,

MyCams,

InvesTap,

KTrack Mobile App,

IPRUTouch App

 

 

म्युच्युअल फंडचे प्रकार | Mutual Fund Types in Marathi :-

 

Open Ended Mutual Fund, Close Ended Mutual Funds, Interval Fund,

Debt funds, Liquid Mutual Funds, Money Market Funds, इक्विटी फंड्स , Balanced Mutual Funds इत्यादी mutual funds चे वेळ वेगळे प्रकार आहेत.

 

Groww App (Android) : Sign Up NOW click here

 

 

Mutual fund चे फायदे:-

 

१) चांगले mangement

 

२) विकल्प

 

३) विविधता

 

४) Convenience (सुविधा)

 

५) स्वस्त

 

६) टॅक्स बीनिफीट

 

अश्या प्रकारे mutual fund आहेत, ते वरील प्रमाणे कार्य करतात, म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे आणि फंडस् संबंधित सर्व माहिती गोळा करा. कोणत्याही नुकसानीस आपण स्वतः जबाबदार असाल.

 

 

.

 

 

 

Leave a Comment