पोस्ट ऑफिस २९९ आणि ३९९ रुपयांचा विमा योजना | Post Office Accident Insurance Scheme

 

मित्रांनो भारतीय डाक विभागाच्या वतीने नवीन अपघात विमा योजना राबविण्यात येत आहे. India Post Office 299rs And 399rs Accident Insurance Scheme. या पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना अंतर्गत 10 लाख रुपयांचे विमा कवच हे प्रदान करण्यात येत आहे. आजच्या या पोस्ट मध्ये आपण या Post Office Accident Insurance Scheme विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

 

पोस्ट ऑफिस २९९ आणि ३९९ रुपयांचा विमा योजना | Post Office Accident Insurance Scheme
पोस्ट ऑफिस २९९ आणि ३९९ रुपयांचा विमा योजना | Post Office Accident Insurance Scheme

 

भारतीय डाक विभागाच्या वतीने २९९ आणि ३९९ रुपयांमध्ये ही नवीन विमा योजना सुरू केलेली आहे. ही योजना Department of Post च्या वतीने आपल्या भारत देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी नवीन योजना सुरू केली आहे. या India Post Accident Insurance Scheme अंतर्गत विमा धारकास दहा लाख रुपयांचे विमा सुरक्षा कवच हे प्रदान करण्यात येत आहे. या विमा योजना अंतर्गत तुम्हाला विम्याची रक्कम ही वार्षिक भरायची आहे. म्हणजेच 299 किंवा 399 रुपयात तुम्हाला वर्ष भराकरिता सुरक्षा कवच प्रदान करण्यात येत आहे.

 

पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना वयोमर्यादा:-

पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना (Post Office Accident Insurance Scheme) वयोमर्यादा ही वय वर्ष 18 ते 65 आहे. त्यामुळे या इंडिया पोस्ट ऑफिस अंतर्गत तुम्हाला अपघात विमा काढायचा असल्यास वरील प्रमाणे वय असल्यास तुम्ही विमा काढू शकतात.

 

हे नक्की वाचा:- राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजना

 

पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना अंतर्गत मिळणाऱ्या सोयी सुविधा खालील प्रमाणे

या पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना(Post Office Apghat Vima Yojana) अंतर्गत २९९ किवा ३९९ रुपयांच्या हप्तामध्ये १० लाख रुपयांपर्यंतचा विमा सुरक्षा कवच हे विमा धारकास प्रदान करण्यात येत आहे. कोणत्याही कारणाने अपघातात विमा धारक व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अंतिम संस्कारासाठी ५ हजार रुपये व या पोस्ट ऑफिस विमा योजना अंतर्गत किमान दोन मुलांच्या शिक्षणासाठी १ लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळणार आहे.

पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना तपशील:-

1. विमा धरकाचा अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख रुपये प्रदान करण्यात येतात.
2. विमा धारकास कायमचे अपंगत्व आल्यास 10 लाख रुपये प्रदान करण्यात येतात.
3. विमा योजना दवाखान्याचा खर्च करण्याकरिता 60 हज़ार रुपये प्रदान करण्यात येतात.
4. या पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना अंतर्गत विमा धारकाच्या मुलाच्या शिक्षणाकरिता 1 लाख रुपये प्रदान करण्यात येतात. ( जास्तीत जास्त 2 मुलाना )
5. जर विमा धारक हा हॉस्पिटल मध्ये अड्मिट असेल तर तो अड्मिट असेपर्यंत दररोज़ 1 हजार रुपये प्रति दिवस असे दहा दिवस पर्यंत देण्यात येतात.
6. विमा धारकास OPD खर्च हा 30000 रुपये प्रदान करण्यात येतो.
7. जर विमा धारकास पॅरालीसीस झाल्यास त्यास १० लाख रुपये प्रदान करण्यात येतात.
8. विमा धारक व्यक्तीचा कुटुंबास दवाखानात प्रवास करिता  प्रवास खर्च म्हणून 25 हजार रुपये प्रदान करण्यात येतात.

पोस्ट ऑफिस अपघात विमा योजनेचा कालावधी किती?

पोस्ट विभाग अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या रुपये 299 आणि 399 अपघात विमा योजना मध्ये तुम्हाला एक वर्षाकरिता रक्कम भरायची आहे. (India Post Office 299rs And 399rs Accident Insurance) एक वर्ष संपल्यानंतर तुम्हाला पुढील वर्षाकरिता योजना चालू करण्याकरिता जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन नूतनीकरण करायचे आहे. त्यानंतर पुन्हा एक वर्षाकरिता अपघात विमा संरक्षण प्रदान करण्यात येत आहे. म्हणजे वार्षिक प्रीमियम हा 299 रुपये किंवा 399 रुपये इतका आहे.

 

पोस्ट ऑफिस २९९ आणि ३९९ रुपयांचा विमा योजना अर्ज प्रक्रिया

पोस्ट ऑफिस २९९ आणि ३९९ रुपयांचा विमा योजना लाभ घ्यायचा असल्यास अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने भारतीय डाक विभागात जाऊन करायचा आहे. विमा योजना लाभ घेण्याकरिता तुमच्या कडे इंडिया पोस्ट पेमेंट बँक असावे लागते. नसल्यास पोस्टातून ते काढून मिळेल. पोस्ट ऑफिस विमा योजना लाभ घेण्याकरिता तुम्हाला पोस्टमन तसेच पोस्ट विभागाचे कर्मचारी मदत करतील.

 

पोस्ट ऑफिस २९९ व ३९९ च्या पॉलिसी मधील फरक

पोस्ट ऑफिस(India Post Insurance Scheme) अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या २९९ व ३९९ च्या अपघात विमा योजना ह्या सारख्याच आहे. ३९९ च्या योजनेत विमाधारकाच्या अपघाती मृत्यूनंतर दोन मुलांना १ लाखांपर्यंतची मदतही शिक्षणासाठी मिळू शकते तर ही मदत 299 च्या अपघात विमा योजनेत मिळणार नाही. त्याच प्रमाणे 399 योजनेत अंत्यसंस्कार खर्च, वाहतूक खर्च,शिक्षण खर्च देण्यात येतो. हा खर्च 299 योजनेत मिळत नाही.

पोस्ट ऑफिस विमा योजना(Post Office Vima Yojana) अंतर्गत राबविण्यात येत असलेली ही एक महत्त्वपूर्ण अशी अपघात विमा योजना (Apghat Vima Yojana) आहे. इतर विमा योजना पेक्षा पोस्ट ऑफिस मार्फत राबविण्यात येणाऱ्या या विमा योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा मिळत आहे. या पोस्ट ऑफिस विमा योजना(Post Office Vima Yojana) अंतर्गत जर तुम्हाला लाभ घ्यायचं असेल तर तुम्हाला पोस्टचे ippb अकाउंट ओपन करून घ्यावे लागते.

Post Office Accident Insurance Scheme अंतर्गत नवीन अपडेट :-

Post Office Accident Insurance Scheme अंतर्गत ज्यांनी पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना काढला होता, त्यांना आता ईमेल वर विमा कंपनी तर्फे विमा पॉलिसी पाठविण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही पोस्ट ऑफिस 299 आणि पोस्ट ऑफिस 399 विमा काढताना जो ईमेल आयडी दिला होता, तो चेक करावा.

भारतीय डाक विभाग अंतर्गत राबविण्यात येत असलेली ही पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना टाटा कंपनी यांच्या सोबत राबविण्यात येत आहे. आणि पोस्ट ऑफिस तसेच टाटा कंपनी ह्या दोन्ही विश्वसनीय असल्यामुळे पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना (Post Office Accident Insurance Scheme) लवकरच लोकप्रिय विमा झालेला आहे. Post office Apghat Vima तुम्हीं काढला नसेल, तर लवकर काढून घ्यावा. पोस्ट ऑफिस विमा हा तुम्ही कधीही काढू शकतात. त्यामुळे जवळील पोस्ट ऑफिस ला भेट देऊन हा अपघात विमा काढू शकतात.

हे नक्की वाचा:- खरीप पीक विमा योजना ऑनलाईन अर्ज सुरू

भारतीय डाक विभाग अपघात विमा योजना संपर्क

भारतीय डाक विभाग(Post Office Apghat Vima Yojana) अपघात विमा योजना अंतर्गत जर तुम्हाला हा विमा काढायचा असेल तर, तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये भेट देऊ शकतात. खाली आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिस चा कॉन्टॅक्ट नंबर तसेच ईमेल आयडी दिलेला आहे. त्या पोस्ट ऑफिस कॉन्टॅक्ट नंबर वर कॉल करून आपण या पोस्ट ऑफिस अपघात विमा संदर्भात विस्तृत माहिती जाणून घेऊ शकतात. त्याच प्रमाणे खालील इमेल आयडी वर सुद्धा मेल करून योजने संदर्भात माहिती विचारू शकतात.

 

पोस्ट ऑफिस संपर्क क्रमांक:- 155299
ईमेल आयडी:- contact@ippbonline.in

मित्रांनो ही माहिती आवडल्यास नक्की शेअर करा. अशाच महत्वपूर्ण पोस्ट करिता आमच्या वेबसाईट वर भेट देत चला.

आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Comment