राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजना | Rajiv Gandhi Student Accident Insurance Scheme Information In Marathi

 

आजच्या या पोस्ट मध्ये आपण 1 ली ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या राजीव गांधी विद्यार्थी अपघात अनुदान योजना विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. Rajiv Gandhi Apaghat Vima Yojana Information In Marathi पहिली ते बारावी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत सुरक्षा कवच प्रदान करण्यात येत आहे. या राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजना विषयी संपूर्ण माहिती करिता ही पोस्ट शेवट पर्यंत वाचा.

 

राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजना | Rajiv Gandhi Student Accident Insurance Scheme Information In Marathi Rajiv Gandhi apghat vima yojana mahiti marathi
राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजना | Rajiv Gandhi Student Accident Insurance Scheme Information In Marathi

राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजना

राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजना ही एक 1 ते बारावी पर्यंत शिक्षण शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अपघात झाल्यास विमा कवच पुरविणारी एक महत्वपूर्ण अशी योजना आहे.

राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजना ही सुधारित करण्यात आलेली आहे. या योजने मध्ये बदल करून ही योजना नव्याने आता 1 ते 12 पर्यंत च्या विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येत आहे. Rajiv Gandhi Student Accident Insurance Scheme Detail In Marathi या योजने संबंधित सुधारित शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आता ही योजना बदल करून नवीन रुपात राबविण्यात येत आहे.

 

 

हे नक्की वाचा:- ओबीसी आणि एससी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारी करिता मोफत प्रशिक्षण व स्कॉलरशिप अनुदान

 

राजीव गांधी अपघात विमा योजना अंतर्गत मिळणारे लाभ Benifits of Rajiv Gandhi Students Accident Insurance Scheme

 

राजीव गांधी अपघात विमा योजना (Rajiv Gandhi Apaghat Vima Yojana) ही 1 ते 12 पर्यंत शिक्षण शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विमा सुरक्षा कवच प्रदान करणारी एक महत्वपूर्ण अशी योजना आहे. जर या 1 ते 12 पर्यंत शिक्षण शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास या Rajiv Gandhi Student Accident Insurance Scheme अंतर्गत एक लाख 50 हजार रूपयांचे रक्कम ही विमा कवच म्हणून देण्यात येत आहे. जर या विद्यार्थ्याचा अपघात झाला व अपघातामुळे विद्यार्थ्यांना कायमचे अपंगत्व (दोन अवयव/ दोन डोळे किंवा एक अवयव व एक डोळा निकामी) आल्यास एक लाख रुपयांचे विमा रक्कम देण्यात येणार आहे. जर विद्यार्थ्याचा अपघात झाल्यास त्यामध्ये कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास जसे की एक अवयव किंवा एक डोळा निकामी झाल्यास 75 हजार रुपये इतकी रक्कम विमा म्हणून देण्यात येणार आहे. तसेच रुग्णालयाचा खर्च हा जास्तीत जास्त 1 लाख रुपये पर्यंत करण्यात येणार आहे. Rajiv Gandhi Apghat Vima Yojana Mahiti Marathi, rajiv gandhi students insurance scheme information in marathi

 

 

 

हे नक्की वाचा:- शासकीय वसतिगृह काय आहे? अर्ज प्रक्रिया, सुविधा संपूर्ण माहिती

 

 

जर विद्यार्थ्याचा सर्पदंशाने झाल्याने किंवा पोहत असताना मृत्यू झाल्यास 1.50 लाख रुपये इतकी रक्कम या राजीव गांधी अपघात विमा योजना अंतर्गत देण्यात येणार आहे. जर विद्यार्थी की कोणत्याही कारणास्तव जखमी झाल्यास त्या विद्यार्थ्यास 1 लाख रुपये इतकी रक्कम या Rajiv Gandhi Accident Insurance Scheme अंतर्गत प्रदान करण्यात येणार आहे.

 

 

 

 

राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा अनुदान योजना अर्ज प्रक्रिया Rajiv Gandhi Student Accident Insurance Scheme Application Process:-

 

जर विद्यार्थ्याचा अपघात झाला आणि विद्यार्थ्यास या योजने अंतर्गत अर्ज करायचा असेल तर या योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी प्रस्ताव हे विद्यार्थ्यांचे पालक व संबंधित शाळांचे मुख्याध्यापक/ गट शिक्षणाधिकारी/ शिक्षणाधिकारी (प्राथमिक)/ माध्यमिक)/ शिक्षण निरीक्षक यांना करावे लागणार आहे. प्रस्ताव केल्या नंतर अनुदान रक्कम वितरित करण्यात येईल.

 

 

या योजने अंतर्गत विद्यार्थ्याचे निधन झाल्यास या राजीव गांधी अपघात विमा योजना अंतर्गत मिळणारी अनुदानाची रक्कम ही त्या विद्यार्थ्या च्या कुटुंबास ही रक्कम देण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत कार्यवाही लवकर व्हावी लाभार्थ्यास तत्काळ लाभ वितरण व्हावे या करिता आपल्या महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जात आहे.

 

या योजने मध्ये आत्महत्या या बाबीचा समाविष्ट नसणार आहे. अम्ली पदार्थ घेऊन अपघात झाल्यास या योजने अंतर्गत लाभ मिळणार नाही. तसेच नैसर्गिक मृत्यू चा सुद्धा समावेश या Rajiv Gandhi Student Accident Insurance Scheme अंतर्गत होणार नाही.

 

अश्या प्रकारे वर्ग 1 ते 12 पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक अपघात सुरक्षा कवच पुरविणारी महत्वपूर्ण अशी योजना आहे. ही माहिती आवडल्यास नक्की शेअर करा. अशाच महत्वपूर्ण माहिती करिता आमच्या वेबसाईट वर भेट देत चला.

Leave a Comment

WhatsApp Icon