ई-पीक पाहणी 2022 नक्की करा, शेवटची तारीख जाहीर | E Pik Pahani 2022 Maharashtra

 

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण ई पीक पाहणी 2022 कशी करायची? या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत खरीप पिक विमा 2022 चे अर्ज सुरू झालेले आहे. त्यामुळे तुम्हाला ई पीक पाहणी करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण की तुम्ही ज्या पिकांचा खरीप पिक विमा काढलेला आहे. त्या पिकांमध्ये आणि ई पीक पाहणी E Pik Pahani मध्ये नोंदविण्यात आलेल्या पिकांमध्ये तफावत आढळल्यास ई पीक पाहणी द्वारे नोंदणी करण्यात आलेली पीक हे गृहीत धरण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर ई पीक पाहणी 2022 करून घ्यावी. e peek pahani kashi karavi,e pik pahani online maharashtra

ई-पीक पाहणी 2022 नक्की करा, शेवटची तारीख जाहीर | E Pik Pahani 2022 Maharashtra ई पीक विमा कशी करायची? E-pik pahni kashi karavi
ई-पीक पाहणी 2022 नक्की करा, शेवटची तारीख जाहीर | E Pik Pahani 2022 Maharashtra

ई पीक पाहणी E Pik Pahani

E Pik Pahani आपल्याला आपल्या स्वतःच्या मोबाईलच्या साह्याने करता येते. आणि तुम्ही मोबाईलच्या साह्याने जी ई पीक पाहणी(e-pik pahani) केलेली आहे, त्या ई पीक पाहणीची नोंद ही तुमच्या सातबारावर येणार आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागाने सुरुवातीला ई पीक पाहणीचा नोंदणी प्रकल्प हा 15 ऑगस्ट पासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सुरू केला होता. ई पीक पाहणी करणे अगदी अतिशय सोपी पद्धत आहे. ई पीक पाहणी (E Pik Pahani Maharashtra) करण्यासाठी आपल्याला गुगल प्ले स्टोअर वरून ई पीक पाहणीचे मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे लागते. त्यानंतर तुम्ही त्या ॲपमध्ये तुमच्या मोबाईल नंबर च्या साह्याने अगदी पाच ते सहा मिनिटात ई पीक पाहणी करू शकतात.

हे नक्की वाचा:- पीक विमा योजना बीड पॅटर्न काय आहे? संपूर्ण माहिती 

सध्या प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत प्रधानमंत्री खरीप पिक विमा योजना(Kharip Pik Vima 2022) खरीप हंगाम 2022-23 करिता अर्ज सुरू झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही ज्या पिकांचा पीक विमा काढणार आहात. त्या पिकांची नोंद तुमच्या सातबारावर असावी लागते. आणि ही नोंद तेव्हाच येते जेव्हा तुम्ही तुमच्या मोबाईलच्या साह्याने ई-पीक पाहणी करून घेतात. त्यामुळे जर तुम्ही पिक विमा अर्ज केला असेल किंवा ती तुम्ही पीक विमा अर्ज करणार असाल, तर ई पीक पाहणी च्या शेवटच्या तारखेच्या ई पीक पाहणी करून घ्यावी.

ई पीक पाहणी अंतिम तारीख(E Pik Pahani Last Date):-

ई-पीक पाहणी करण्याची अंतिम तारीख ही 22/10/2022 आहे. शेतकरी बांधवांना ई-पीक पाहणी ही कृषी विभागाच्या ई पीक पाहणी मोबाईल ॲप्लिकेशन वर ई पीक पाहणी नोंदणी करता येणार आहे.

हे नक्की वाचा??:- अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 चे 3425 कोटी रुपये वितरित; तुमच्या जिल्ह्यांच्या याद्या डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

सर्व शेतकऱ्यांना सूचना आहे की आपण आपला पीक पेरा ई पीक पाहणी ऐप मधून भरून घ्यावा अन्यथा आपला 7/12 वर्षभर पडीत दिसेल त्यामुळे आपल्याला कोणतेही लाभ मिळणार नाही तरी आपण आपल्या मोबाईल मधून पिकपेरा तात्काळ भरून घ्यावा शेवटची तारीख 22/10/2022

ई पीक पाहणी करणे का आवश्यक आहे

ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे कारण की , याचा फायदा पीक विमा दाव्यांमध्ये होणार आहे. काही कारणास्तव ई पीक पाहणी आणि तुम्ही काढलेल्या पिकांचा पीक विमा यामध्ये तफावत   आढळून आल्यास ई पीक पाहणी गृहीत धरण्यात येणार आहे. e pik pahani last date 2022, E PEEK PAHANI, E Peek pahani

ई- पीक पाहणी अंतिम तारीख 15 october आहे, त्यामुळे सर्व शेतकरी बंधूंनी अंतिम तारखेच्या आत आपल्या शेतीतील पिकांची ई पीक पाहणी द्वारे नोंदणी करून घ्यावी.

हे नक्की वाचा:- ई पीक पाहणी कशी करायची? संपूर्ण माहिती 

ई पीक पाहणी नवीन अपडेट:-

ज्या शेतकरी बांधवांनी अजून पर्यंत ई पीक पाहणी केलेली नसेल, अश्या शेतकरी बांधवांना विनंती आहे की, त्यांनी लवकरात लवकर ई पीक पाहणी करून घ्यावी. E Peek pahani ची अंतिम तारीख ही वाढविण्यात आलेली आहे. आत्ता सद्या e pik pahani करणे सुरू आहे. E pik pahani चे नवीन मोबाईल ॲप्लिकेशन हे गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्यामुळे नवीन व्हर्जन चे e pik pahani हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून ई पीक पाहणी करून घ्यावी. ई पीक पाहणी कशी करायची? या संदर्भात सविस्तर पोस्ट आम्ही यापूर्वी या वेबसाईट वर लिहिलेली आहे, तुम्ही ते वाचून ई पीक पाहणी करू शकतात.

मित्रांनो आशा करतो की, तुम्हाला ई पीक पाहणी विषयीची ही माहिती आवडली असेल, जर तुम्हाला काही शंका असल्यास कमेंट करा. आम्ही नक्कीच तुमच्या शंकांचे निरसन करू. माहिती महत्वपूर्ण असल्यास इतरांना शेअर करा. अशीच महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता आमच्या वेबसाईट वर भेट देत चला.

1 thought on “ई-पीक पाहणी 2022 नक्की करा, शेवटची तारीख जाहीर | E Pik Pahani 2022 Maharashtra”

  1. Sar aapn एकाच मोबाईल वरून अनेक e pik pahani करू शकतो का?

    Reply

Leave a Comment