शेतकरी बांधवांना त्यांच्या पिकांना हवामान आधारित धोक्यापासून तसेच इतर धोक्यापासून संरक्षण प्रदान करण्यासाठी प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या खरीप पिकांना या प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजना अंतर्गत सुरक्षा कवच प्रदान करण्यात येत आहे. जर शेतकरी बांधवांच्या पिकांचे नुकसान झाल्यास या Pradhanmantri Kharip Pik Vima Yojana अंतर्गत नुकसान भरपाई देण्यात येत असते. खरीप पीक विमा 2022 ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत Kharip Pik Vima 2022 Online Application Start. या पोस्ट मध्ये आपण खरीप पीक विमा योजना कसा काढायचा? या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता ही पोस्ट शेवट पर्यंत वाचा.
खरीप पीक विमा 2022 ऑनलाईन अर्ज सुरू | Kharip Pik Vima 2022 Online Application Start
|
खरीप पीक विमा 2022 अर्ज सुरू झाले आहेत. या संबंधित शासन निर्णय शासनाच्या वतीने १ जुलै २०२२ रोजी काढण्यात आलेला आहे. pik vima arj 2022 काढल्यामुळे आपण आपल्या पिकांना नैसर्गिक अप्पतीमुळे काही नुकसान झाले तर नुकसान भरपाई मिळवू शकतो. या वर्षी आपल्या महाराष्ट्र राज्यात पीक विम्या करिता बीड पॅटर्न हा लागू केलेला आहे. ज्या शेतकरी बांधवांना अर्ज करायचा आहे. त्यांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर kharip pik vima 2022 nondani करायची आहे. Pik vima arj 2022, पिक विमा २०२२, पिक विमा योजना ऑनलाईन अर्ज
खरीप पीक योजना 2022 अर्ज कसा करायचा? How to apply for Kharif Pik Vima Yojana 2022 :-
खरीप पीक विमा योजना 2022 करिता अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. Kharip Pik Vima Yojana Nondani ही तुम्ही Csc सेंटर तसेच आपले सरकार सेवा केंद्र किंवा स्वतः ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करू शकतात. आपण स्वतः ऑनलाईन सुद्धा पीक विमा अर्ज करू शकतो. अगदी आपण आपल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटर च्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने Kharip Pik Vima 2022 Nondani करू शकतो. crop insurace online application
घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने जर तुम्हाला Kharip Pik Vima 2022 अर्ज करायचा असेल तर तुम्ही kharip pik vima 2022 nondni संदर्भात यूट्यूब वर व्हिडिओ पाहून सुद्धा खरीप पीक विमा योजना ऑनलाईन नोंदणी करू शकतात.
खरीप पीक विमा योजना अंतिम तारीख (Kharip Pik Vima Yojana Last Date) :-
खरीप पीक विमा योजना 2022 करिता अंतिम तारीख ही 31 जुलै आहे.
खरीप पीक विमा 2022 मध्ये खालील पिकांचा समावेश आहे:-
तृणधान्य व कडधान्य पिके:-
भात (धान),खरीप ज्वारी, बाजरी,
नाचणी(रागी), मुग,उडीद, तुर, मका
गळीत धान्य पिके:-
भुईमुग, कारळे, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन
नगदी पिके:-
कापुस, खरीप कांदा
हे नक्की वाचा:- पीक विमा योजना बीड पॅटर्न काय आहे?
खरीप पीक विमा योजना समाविष्ट जिल्हे आणि नियुक्त कंपनी:-
♦️HDFC इर्गो इंन्शुरन्स कं:-
अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर,जालना, गोंदिया, कोल्हापूर
♦️भारतीय कृषी विमा कंपनी:-
सोलापूर, जळगाव, सातारा, औरंगाबाद, भंडारा, पालघर, रायगड वाशिम ,सांगली, बुलढाणा, नंदुरबार , यवतमाळ , अमरावती, गडचिरोली, उस्मानाबाद, लातूर
♦️आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंन्शुरन्स कं :-
हिंगोली, अकोला, धुळे, पुणे
♦️युनायटेड इंडिया इंन्शुरन्स कं :-
नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
♦️बजाज अलायन्झ जनरल इंन्शुरन्स कं:-
बीड
पीक पेरा स्वघोषणापत्र डाऊनलोड करा:-
Kharip Pik Vima Yojana अर्ज करणाकरिता तुम्हाला पीक पेरा बाबत स्वघोषणापत्र जोडावे लागते. ते तुम्ही खालील लिंक वरून download करून घ्यावे. व त्यामध्ये माहिती भरून ते अपलोड करायचे आहे.
?पीक वेरा स्वघोषणापत्र डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
?ऑनलाईन अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.
जे शेतकरी बांधव खरीप पीक विमा 2022(Kharip Pik Vima Yojana 2022) करिता अर्ज करणार आहात अश्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी सुद्धा ऑनलाईन पद्धतीने आपल्या मोबाईल वरुन करून घ्यावी, जेणेकरून तुम्हाला पीक विमा क्लेम करताना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही.
पीक विमा योजना अंतर्गत ज्या शेतकरी बांधवांनी अर्ज केलेला असेल, आणि या वर्षी जर तुमच्या शेती पिकांचे नुकसान झालेले असेल, तर आपण लवकरात लवकर पीक विमा योजना क्लेम करायला पाहिजे. पीक विमा क्लेम केल्या नंतर पीक विमा कंपनी चे कर्मचारी तुमच्या शेताची पाहणी करतात, आणि त्यानंतर तुम्हाला पीक विमा हा देण्यात येत असतो. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी पीक विमा क्लेम करावा.
ही माहिती सर्व शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा. अशाच महत्वपूर्ण माहिती वेळेवर जाणून घेण्याकरिता आमच्या वेबसाईट वर भेट देत चला. या योजने संबंधित काही अडचणी असल्यास कमेंट करा.
आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा.