Sc आणि Obc विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा तयारी साठी फ्री कोचिंग आणि ४००० ₹ प्रती महिना | free coaching scheme for sc and obc students

 

आजच्या या पोस्ट मध्ये आपण एका महत्वपूर्ण अशा विषयावर माहिती जाणून घेणार आहोत. ही एक केंद्र शासनाच्या अंतर्गत चालवण्यात येणारी योजना आहे. केंद्र शासनाच्या वतीने देशातील sc आणि obc प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा तयारी साठी फ्री कोचिंग आणि ४००० ₹ प्रती महिना देणारी महत्वपूर्ण अशी योजना आहे. वेगवेगळ्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना ज्या विषयाची तयारी करीत आहेत, त्या कोचिंग ची संपूर्ण फी आणि महिन्याला चार हजार रुपये देण्यात येत आहे. free coaching scheme for sc and obc students या योजने अंतर्गत अर्ज कसा करायचा? कागदपत्रे या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी ही पोस्ट शेवट पर्यंत वाचा.

 

Sc आणि Obc विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा तयारी साठी फ्री कोचिंग आणि ४००० ₹ प्रती महिना | free coaching scheme for sc and obc students
Sc आणि Obc विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा तयारी साठी फ्री कोचिंग आणि ४००० ₹ प्रती महिना | free coaching scheme for sc and obc students

एससी आणि ओबीसी विद्यार्थ्यांसाठी फ्री कोचिंग योजना free coaching scheme for sc and obc students :-

 

मित्रांनो एससी आणि ओबीसी विद्यार्थ्यांसाठी फ्री कोचिंग योजना केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत UPSC, SSC, RRB तसेच  state public service commission, IBPS(BANK EXAM), Insurance exam, IIT,JEE, NEET, CAT, CET,CLAT,NDA,CAT, GMAT. अश्या अनेक प्रकारच्या परीक्षांची तसेच पूर्व परीक्षांची तयारी करणाऱ्या एससी आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या योजने अंतर्गत फ्री कोचिंग. आणि चार हजार रुपये प्रती महिना देण्यात येत आहे. विद्यार्थी कोणत्याही ठिकाणी कोचिंग करू शकतात. त्याची फी या योजने अंतर्गत देण्यात येत आहे.

हे नक्की वाचा:- बँक रेल्वे आणि एसएससी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी barti मार्फत प्रशिक्षण आणि स्कॉलरशिप योजना

या योजने अंतर्गत एकूण ३५०० विद्यार्थ्याना लाभ देण्यात येणार आहे. एससी आणि ओबीसी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हा समावेश 70:30 या प्रमाणात राहणार आहे. एकूण ३५०० विद्यार्थ्यांपैकी ६०% ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येत आहे तर ४०% लाभ बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

कोचिंग फी ही विद्यार्थ्यांना DBT द्वारे कोचिंग लावून कोचिंग ची फी विद्यार्थांनी पेड केल्याची RECEIPT अपलोड केल्या नंतर 2 आठवड्या मध्ये मिळणार आहे. तसेच चार हजार रुपये महिन्याला DBT द्वारे विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट ट्रान्स्फर करण्यात येणार आहे.

 

एससी आणि ओबीसी विद्यार्थ्यांसाठी फ्री कोचिंग योजना पात्रता free coaching scheme for sc and obc  students eligibility :-

 

1. विद्यार्थी हा sc किंवा obc प्रवर्गातील असावा लागतो.
2. अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना ह्या योजने अंतर्गत अर्ज करता येणार नाही.
3. उत्पन्न मर्यादा ही 8 लाख रुपये किंवा त्या पेक्षा कमी पाहिजे.
4. उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक आहे. ( हा दाखला Revenue Officer या लेवल च्य अधिकाऱ्यांनी दिलेला असावा)
5. कमीत कमी ५०% मार्क असले पाहिजे.

हे नक्की वाचा:- राजश्री छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना

एससी आणि ओबीसी विद्यार्थ्यांसाठी फ्री कोचिंग योजना उद्देश Purpose of free coaching scheme for SC and OBC students:-

चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण देणे हा या योजनेचा उद्देश आहे
आर्थिकदृष्ट्या वंचित अनुसूचित जाती (SC) आणि इतर मागासवर्ग (ओबीसी) उमेदवारांना स्पर्धात्मक परीक्षेत चांगले प्रावीण्य मिळवून सार्वजनिक/खाजगी क्षेत्रात योग्य नोकरी मिळावी हा उद्देश आहे.

केंद्र शासनाची फ्री कोचिंग योजना अर्ज करण्याची प्रक्रिया free coaching scheme for sc and obc  students application process:-

या योजने अंतर्गत अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. सुरुवातीला registration करायचे आहे. त्यानंतर युजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करून घ्यावे. त्या नंतर अर्ज ऑनलाईन पद्धतीने सबमिट करा. आता documents upload करायचे आहे. Documents कोणते लागतात, त्याची लिस्ट खाली दिलेली आहे. या योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

ऑनलाईन अर्ज लिंक:-

अर्ज ऑनलाईन करण्यासाठी येथे क्लिक करा.

योजनेची माहिती असलेला pdf पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अर्ज करण्याची अंतिम तारीख:-

एससी आणि ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या या स्कीम अंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ३१ मे २०२२ होती, परंतु ती आता १५ जून २०२२ पर्यंत करण्यात  आलेली आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा.

अर्ज कोण कोण करू शकतो?:-

आपल्या भारत देशातील सर्व एससी आणि ओबीसी प्रवर्गात समाविष्ट विद्यार्थी ज्यांच्ये वार्षिक उत्पन्न हे ८ लाख रुपये पर्यंत आहे.

एससी आणि ओबीसी विद्यार्थ्यांसाठी फ्री कोचिंग योजना आवश्यक कागदपत्रे Documents required for free coaching scheme for SC and OBC students :-

या योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे लागतात. ही कागदपत्रे अर्ज केल्या नंतर ऑनलाईन पद्धतीने अपलोड करावी लागेल.

1. जातीचा दाखला
2. इन्कम सर्टिफिकेट
3. Permenant adress proof
4. 10th markshit
5. 12th markshit
6. पासपोर्ट size फोटो
7.  Signature
8.  अपंग प्रमाणपत्र (असल्यास)
9. Current adress proof

अशी ही एक महत्वपूर्ण अशी योजना केंद्र सरकारच्या वतीने विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येत आहे. ही माहिती सर्व विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा. अशाच महत्वपूर्ण माहिती करिता आमच्या वेबसाईट ला भेट देत चला.

1 thought on “Sc आणि Obc विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा तयारी साठी फ्री कोचिंग आणि ४००० ₹ प्रती महिना | free coaching scheme for sc and obc students”

Leave a Comment