फास्टॅग काय आहे? फास्टॅग माहिती मराठी | FASTag Information In Marathi

 

आजच्या या पोस्ट मध्ये आपण FASTag काय आहे? ते कसे युज केले जाते. FASTag बनवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, फास्टॅग नोंदणी कशी करायची, fastag ची किंमत काय असते? Fastag चे रिचार्ज कसे करायचे? आणि FASTag चे balance कसे चेक करायचे या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या सर्व वाहनांना फास्टॅग-FASTag लावणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे ही महत्वाची माहिती जाणून घेण्यासाठी ही पोस्ट शेवट पर्यंत वाचा.

फास्टॅग काय आहे? फास्टॅग माहिती मराठी | FASTag Information In Marathi
फास्टॅग काय आहे? फास्टॅग माहिती मराठी | FASTag Information In Marathi

 

FASTag हे टोल प्लाझावर पेमेंट करण्यासाठी म्हणजेच टोल भरण्यासाठी वापरण्यात येणारे  ई-पेमेंट यंत्र आहे. आपण FASTag च्या साहाय्याने टोल प्लाझा वर पेमेंट करून टोल भरू शकतो. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांच्यातर्फे नॅशनल हायवे वरून जाणाऱ्या सर्व वाहनांना फास्टॅग असणे आवश्यक केले आहे. What is FASTag in Marathi, FASTag information in Marathi

 

हे नक्की वाचा:- GST म्हणजे काय आहे? GST संपूर्ण माहिती

 

फास्टॅग म्हणजे काय आहे? What is FASTag in marathi?:-

 

FASTag हे टोल प्लाझा वर टोल भरण्यासाठी वापरण्यात येणारे इलेक्ट्रॉनिक्स पेमेंट सिस्टम यंत्र आहे. ज्याच्या माध्यमातून टोल प्लाझा वर ऑनलाईन पद्धतीने टोल भरला जातो. FASTag मध्ये रेडियो फ्रीक्वेंसी आइडेंटिफिकेशन (RFID) चा वापर होतो. या FASTag मधील टॅग हा तुमच्या वाहनाच्या विंडस्क्रीनवर लावला जातो. जर तुम्ही प्रवासासाठी बाहेर गेलात तेव्हा तुम्हाला प्रत्यक्ष कॅश देऊन टोल भरण्याची आवश्यकता नाही. जो टॅग तुमच्या गाडीवर लावलेला असतो त्या टॅग ला टोल प्लाझा वरील असलेले सेंसर काय करतात आणि त्या टोल प्लाझा वरची शुल्क तुमच्या अकाउंट मधून आपोआप डेबिट केल्या जाते. म्हणजेच fast tag   च्या माध्यमातून तुम्ही टोल प्लाजा बरं न थांबता कुठलीही कॅश पैसे न देता आपोआप फास्टॅग खात्यातून पैसे पे करू शकतात. ही प्रक्रिया अतिशय जलद आणि सोपी आहे.ज्यावेळेस तुमच्या फास्ट टॅग खात्यांमधील पैसे संपतात त्यावेळेस तुम्ही पुन्हा त्या फास्ट टॅग खात्याला रिचार्ज करू शकतात.

 

 

 

FASTag नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ( Required Documents for FASTag Registration information in Marathi):-

 

फास्टॅग नोंदणी करण्यासाठी आपल्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

 

1. वाहन नोंदणी ची कागदपत्रे.

2. बँक डिटेल्स

3. आधार कार्ड किंवा मतदान कार्ड

4. विज बिल किंवा टेलिफोन बिल

 

वरील कागदपत्रे असल्यास तुम्ही फास्ट टॅग साठी नोंदणी करून फास्ट टॅग मिळवू शकतात.

 

 

 

फास्टॅग नोंदणी कोठे करावी?Where to register Fastag?:-

 

फास्टॅग ची नोंदणी करण्यासाठी आपल्याकडे अनेक पर्याय आहेत. आपण  फास्टॅग बँकेत जाऊन बनवू शकतो. किंवा कोणत्याही फास्टॅग डीलर कडून सुद्धा पण बनवू शकतो. तसेच आपण स्वतः ऑनलाईन सुद्धा फास्ट टॅग करिता नोंदणी करू शकतो. किंवा आपण कोणत्याही टोल नाक्यावर जाऊन फास्ट टॅग बनवून घेऊ शकतो. फ्लिपकार्ट पेटीएम ॲमेझॉन या ई-कॉमर्स कंपनी सुद्धा आपल्याला Fastag बनविण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहेत.

 

हे नक्की वाचा:- GDP म्हणजे काय? GDP कसा मोजतात?

 

जर तुम्हाला टोल चे पेमेंट करताना तुमच्या बँक खात्यातून पैसे काढायचे असेल तर तुम्ही तुमच्या फास्ट खात्याला बँक खाते जोडून डायरेक्टली तुमच्या बँक अकाउंट मधून पैसे कपात करू शकतात. किंवा तुम्ही ॲमेझॉन फ्लिपकार्ट पेटीएम यांचे वॉलेट जोडून सुद्धा टोल नाक्यावरील टोल चे पेमेंट करू शकता. फास्टॅगची ची validity ही 5 वर्षे असते. त्यानंतर जर तुम्हाला फास्टॅग वापरायचा असेल तर नवीन फास्ट टॅग मिळवावा लागतो. फास्टॅगची किंमत ही तुमच्या वाहन नुसार ठरविण्यात येत असते. तुम्ही ज्या ठिकाणी fastag बनवता ते तुम्हाला काही शुल्क आकारू शकतात.

 

 

फास्टॅग कसे रीचार्ज करावे?How to recharge Fastag?:-

जर तुमचे फास्टॅग खाते बँकेशी लिंक असल्यास तुम्हाला fastag रिचार्ज करण्याची आवश्यकता नाही. कारण की तुमच्या बँक खात्यातून ती रक्कम डेबिट होत असते. परंतु वरील परिस्थिती वगळता जर तुमच्या फास्ट टॅग खात्यातील balance संपले तर तुम्ही NEFT, यूपीआय, डेबिट तसेच क्रेडिट कार्ड, एटीएम कार्ड यांचा वापर करून Fastag रिचार्ज करू शकतात.

 

 

 

 

 

FASTag मधील बैलेंस कसे चेक करावे?(How to check FASTag Balance in marathi) :-

 

FASTag मधील बैलेंस  चेक  करण्यासाठी आपण My FASTag App इंस्टॉल करुन या ॲपद्वारे बैलेंस चेक करु शकतो. तसेच फास्टॅगचे बैलेंस चेक करण्यासाठी तुम्ही जर तुमचा मोबाईल हा NHAI प्रीपेड वॉलेटवर रजिस्टर केला असेल तर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वरून मिसकॉल देऊन बैलेंस चेक करू शकतात. या मोबाईल नंबर वर मिस कॉल द्यावा. :-  +91 – 8884333331

 

 

 

हे नक्की वाचा:- ATM विषयी संपूर्ण माहिती मराठी

 

Leave a Comment