फळ पीक विमा योजना 2022 अर्ज सुरू | Falpik Vima Yojna 2022

 

मित्रांनो फळ पीक विमा योजना अंतर्गत राज्यातील शेतकरी बांधवांना त्यांच्या फळ पिकांना हवामनापासून होणाऱ्या धोक्यापासून संरक्षण देण्यासाठी राबविण्यात येत आहे. हवामान बदलामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते, त्यामुळे फळ उत्पादक  शेतकरी बांधवांचे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असते. या पासून संरक्षण हे या योजने अंतर्गत देण्यात येत आहे. आता या फळ पीक विमा योजना 2022 करिता अर्ज सुरू झालेले आहेत. आजच्या या पोस्ट आपण Falpik Vima Yojna 2022 विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

 

 

फळ पीक विमा योजना 2022 अर्ज सुरू | Falpik Vima Yojna 2022
फळ पीक विमा योजना 2022 अर्ज सुरू | Falpik Vima Yojna 2022

 

शेतकरी बांधवांना फळ पीक हे चांगले उत्पन्न मिळवून देणारे पीक आहे. कृषी क्षेत्राचे उत्पादन मध्ये फळ पिकांचा महत्वाचा वाटा आहे. कारण कि फळ पिकांचे बाजारमूल्य अधीक आहे. त्यामुळे फळ पिके घेऊन शेतकरी चांगले उत्पन्न मिळवून घेऊ शकतात. परंतु जर हवामान बदलामुळे शेतकऱ्याच्या फळ पिकांना धोका निर्माण झाला तर फळ पीक उत्पादक शेतकऱ्यांना होणारा तोटा सुद्धा इतर पिकांपेक्षा खूप जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे या गोष्टी लक्षात घेऊन शेतकरी बांधवांकरिता फळ पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. मृग बहार फळ पीक विमा योजना २०२२ ( falpik vima )

 

हे नक्की वाचा:- फुल शेती अनुदान योजना महाराष्ट्र अंतर्गत अर्ज सुरू

 

अनेक प्रकारच्या हवामान आधारित धोक्यांमुळे फळ पिकांचे उत्पादन घटते, आणि त्याच्या परिणाम म्हणजे फळ उत्पादक शेतकरी हा आर्थिक संकटात सापडतो. या सर्व बाबींचा विचार करून शेतकऱ्यांच्या फळ बागांचा विमा काढण्यासाठी पुनरचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना ( Falpik vima RWBCIS )राबविली जात आहे.

 

 

 

या फळ पीक विमा योजना मध्ये खालील फळ पिकांचा समावेश होतो, 

या मध्ये संत्रा, मोसंबी, चिकू, डाळिंब, पेरू, लिंबू, सीताफळ, द्राक्ष इत्यादी फळ पिके समाविष्ट आहेत. ही योजना महसूल मंडळाला आधारभूत धरून ठरविली जाते. या प्रधानमंत्री फळ पीक विमा योजना 2022 – 23 करिता अर्ज करण्यासाठी तारीख सुध्दा जाहीर झाल्या आहेत.

 

हे नक्की वाचा:- या शेतकरी बांधवांना फळ पीक विमा ची नुकसान भरपाई वाटप

 

फळ पीक विमा काढण्यासाठी मोसंबी करिता उत्पादन क्षम वय हे  3 वर्ष आहे. संत्रा 3 या फळ पीक करिता 3 वर्ष, सीताफळ या फळ पीक करिता 3 वर्ष, चिकू या फळ पीक करिता 5 वर्ष तर लिंबू या फळ पीक करिता 4 वर्ष, पेरू या फळ पीक करिता 3 वर्ष, डाळिंब 2 वर्ष, आणि द्राक्ष या फळ पीक करिता 2 वर्ष उत्पादन क्षम वय आहे.Falpik Vima Yojna maharashtra 2022

 

 

🛑🛑नवीन अपडेट:- खरीप पीक विमा योजना 2022 अर्ज सुरू संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया

 

फळ पीक विमा योजना (Falpik Vima Yojna 2022) अंतर्गत अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख :-

 

1. पेरू फळ पीक करिता अंतिम तारीख ही 14 June

2. द्राक्ष फळ पीक करिता अंतिम तारीख ही 30 June

3. संत्रा फळ पीक करिता अंतिम तारीख ही 14 june

4. मोसंबी फळ पीक करिता अंतिम तारीख ही 30 june

5. डाळिंब फळ पीक करिता अंतिम तारीख ही 14 july

6. सीताफळ फळ पीक करिता विमा अंतिम तारीख ही 31 july

7. चिकू फळ पीक अंतिम तारीख ही 30 june

8. लिंबू फळ पीक करिता अंतिम तारीख ही 14 june

 

हे नक्की वाचा:- पीक विमा तक्रार निवारण कसे करायचे? 

 

रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, एचडीएपसी एर्गो  जनरल इन्शुरन्स कंपनी आणि भारतीय कृषी विमा कंपनी ह्या तीन कंपन्या मार्फत आपल्या महाराष्ट्र राज्यात pm fal pik vima yojana ही राबविण्यात येत आहे. त्यामुळे सर्व फळ उत्पादक शेतकऱ्यांना विनंती आहे की, ज्यांना फळ पीक विमा काढायचा असेल त्यांनी अंतिम तारीख च्या आत फळ पीक विमा योजना अंतर्गत अर्ज करायचा आहे.

 

मित्रानो खरीप पीक विमा योजना 2022 करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे सुरू झालेले आहेत. त्यामुळे शेवटच्या तारखेची वाट न पाहता शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावे, ही विनंती. आम्ही आमच्या वेबसाईट वर खरीप पीक विमा 2022 विषयी नवीन पोस्ट केलेली आहे. त्यामुळें तुम्ही ती पोस्ट देखील वाचू शकतात.

 

खरीप पीक विमा 2022 माहिती येथे क्लिक करा.

 

शेतकरी बांधवां विषयीची ही माहिती आवडल्यास नक्की शेअर करा. तसेच अशाच महत्वपूर्ण माहिती करिता आमच्या वेबसाईट वर भेट देत चला. तसेच आमच्या teligram channnel ला जॉईन होऊ शकता. काही अडचणी असल्यास कमेंट करा.

 

आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा.

 

Leave a Comment

WhatsApp Icon