बार्टी मार्फत मिळवा प्रशिक्षण आणि स्कॉलरशिप बँकिंग, रेल्वे, एलआयसी, पोलीस भरती या परीक्षांसाठी | barti scholarship and coaching for Bank, Railway, Lic and Police bharati exam

 बार्टी मार्फत मिळवा प्रशिक्षण आणि स्कॉलरशिप बँकिंग, रेल्वे, एलआयसी, पोलीस भरती या परीक्षांसाठी | barti scholarship and coaching for Bank, Railway, Lic and Police bharati exam

मित्रानो जर तुम्ही सरकारी नौकरी ची तयारी करत असाल किंवा तुम्हाला सरकारी नौकरी ची तयारी करायची असेल तर तुमच्या साठी एक सुवर्ण संधी आलेली आहे. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत जे विद्यार्थी बँकिंग, रेल्वे, एलआयसी, पोलीस भरती इत्यादी परीक्षांची तयारी करत आहे.किवा ज्या विद्यार्थ्यांना बँकिंग, रेल्वे, एलआयसी, पोलीस भरती या परीक्षांची तयारी करायची असेल अशा विद्यार्थ्यांना barti (बार्टी ) अंतर्गत मोफत प्रशिक्षण आणि स्कॉलरशिप सुद्धा देण्यात येणार आहे. त्याच बरोबर विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य सुधा पुरविण्यात येणार आहे.या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत प्रत्येक वर्षी १८ हजार विद्यार्थ्यांना खास प्रशिक्षण मोफत देण्यात येणार असून त्या साठी अर्ज करणे आता सुरु झालेले आहे. barti application form 2022

बार्टी मार्फत मिळवा प्रशिक्षण आणि स्कॉलरशिप बँकिंग, रेल्वे, एलआयसी, पोलीस भरती या परीक्षांसाठी | barti scholarship and coaching for Bank, Railway, Lic and Police bharati exam
बार्टी मार्फत मिळवा प्रशिक्षण आणि स्कॉलरशिप बँकिंग, रेल्वे, एलआयसी, पोलीस भरती या परीक्षांसाठी | barti scholarship and coaching for Bank, Railway, Lic and Police bharati exam

Barti scholarship 2021, barti application form 2021, barti scholarship application process, barti upsc scholarship

मित्रानो सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र सरकार च्या माध्यमातून अनुसूचित जातीतील जे मुले मुली सरकारी परीक्षांची तयारी करू इच्छित आहे, अशा मुला-मुलींसाठी बार्टीमार्फत प्रशिक्षण व स्कॉलरशिप देण्यात येत आहे. 

त्या साठीच संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण ३० केंद्रांवर हे राबविण्यात येणार आहे. आणि हे राबविण्यासाठी बार्टीकडून संस्थेकडून २०२१ च्या नोव्हेंबर मध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या लेखामध्ये आपण जाहिरात आणि अर्ज दिलेले आहेत.

बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) तर्फे आपल्या महाराष्ट्र राज्यातील एकूण ३० केंद्र आहे, आणि या 30 केंद्रांवर banking, railway, lic आणि पोलिस भरती तसेच विविध स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी विशेष प्रशिक्षण व स्कॉलरशिप तसेच स्टडी मटेरियल पुरविण्याचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे, आणि त्यासाठी बार्टी(barti) मार्फत अर्ज स्वीकारणे सुरू झालेले आहे.

जर तुम्हाला अर्ज ऑनलाइन पद्धतीने download करायचा असेल तर बार्टीच्या barti.maharashtra.gov.in या official वेबसाईट वर अर्ज आणि जाहिरात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

हे सुध्दा वाचा:- कोणत्याही शासकीय विभागाची तक्रार ऑनलाईन कशी करायची

बार्टी(barti) संस्थे मार्फत रेल्वे, बँकिंग, एलआयसी, पोलीस भरती ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा, मुलाखती साठी पूर्वतयारीसाठी विशेष अनिवासी प्रशिक्षण व स्कॉलरशिप सुद्धा देण्यात येणार आहे. 

बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) अंतर्गत प्रशिक्षण व स्कॉलरशिप साठी अर्ज कसा करायचा:-

मित्रांनो जर तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत प्रशिक्षण व स्कॉलरशिप घ्यायची असेल तर ०९ डिसेंम्बर २०२१ पूर्वी संबंधित केंद्रांवर अर्ज सादर करायचे आहेत. 

हे अर्ज तुम्ही ऑनलाइन barti च्या वेबसाईट वरून डाऊनलोड करून घ्या किंवा खालील लिंक वरून अर्ज डाउनलोड करून अर्ज जमा करा.


(बार्टी) मार्फत प्रशिक्षण व स्कॉलरशिप अर्ज व जाहिरात डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.


बँक, रेल्वे आणि Lic application form 


पोलिस आणि सैन्य application form


बँक, रेल्वे आणि Lic जाहिरात


पोलिस आणि सैन्य जाहिरात


बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत प्रशिक्षण व स्कॉलरशिप कश्या पद्धतीने राबविण्यात येईल :- 

सदर बार्टी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत प्रत्येक वर्षी एकूण १८ हजार विद्यार्थ्यांना बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) barti मार्फत प्रशिक्षण व स्कॉलरशिप देण्यात येईल. 

हे नक्की वाचा:- माहितीच्या अधिकारा अंतर्गत अर्ज कसा करायचा

या बार्टी च्या प्रशिक्षण च्या कालावधी दरम्यान जे विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होतील ज्यांची निवड या कार्यक्रमात होईल अशा विद्यार्थ्यांना प्रत्येकी प्रतेक महिन्याला ६ हजार रुपये प्रमाणे स्कॉलरशिप सुद्धा देण्यात येणार आहे. तसेच जे विद्यार्थी पोलीस भरती ची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांना पोलीस भरतीची मैदानी चाचणीची practice करण्यासाठी बूट व अन्य साहित्य खरेदीसाठी ३ हजार रुपये इतके रू देण्यात येणार आहेत.

जर तुम्हाला ही माहिती महत्वपूर्ण वाटली असेल तर हा लेख तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि आपल्या tech info marathi या teligram चॅनल ला नक्की जॉईन व्हा.1 टिप्पण्या

Have any doubt let me know

  1. सर barti बद्दल आणखीन विस्तृत माहिती द्या. जसे की barti chya सर्व स्कॉलरशिप संबंधी

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

Have any doubt let me know

थोडे नवीन जरा जुने