Weather Forecast Update: राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार, या ठिकाणी मुसळधार, जाणून घ्या संपूर्ण अंदाज

राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून पावसाचे वातावरण निर्माण झालेले आहे त्याचप्रमाणे राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस हजेरी लावून, बसलेला आहे, अनेक भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाल्याने नदी नाले ओसंडून वाहू लागलेले असून, हवामान विभागाने राज्यातील पावसाचा जोर कायम असण्याचा इशारा वर्तवलेला आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी असून, राज्यातील अनेक भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस तर काही भागांमध्ये अलर्ट जारी केलेले आहे.

यापूर्वी सुद्धा दिलेल्या अंदाजानुसार पावसाचा जोर गणपती विसर्जनापर्यंत राहणार असल्याची बातमी देण्यात आलेली होती व त्यानुसार राज्यांमध्ये पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे,राज्यातील काही भागांमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर काही भागांमध्ये येल्लो अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलेला आहे.

 

राज्याच्या या भागात मुसळधार पावसाची शक्यता

हवामान विभागाने पुढील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहेत, त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान विभागाने येल्लो अलर्ट जारी केलेला आहे त्यामध्ये विदर्भातील अनेक जिल्ह्यांचा समावेश असून, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा यलो जारी केलेला आहे. अशाप्रकारे राज्यामध्ये अनेक भागात पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.

Weather Forecast Update: राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार, या ठिकाणी मुसळधार, जाणून घ्या संपूर्ण अंदाज

 या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार, हेक्टरी 13600 रुपये, तुम्ही या दहा जिल्ह्यात आहात का? बघा संपूर्ण माहिती

Leave a Comment