फळबाग योजनेच्या खत अनुदानासंबंधी जीआर आला, पहा खताला किती मिळेल अनुदान? | Fertilizer subsidy

राज्यामध्ये स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना राबविण्यात येते व या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध बाबींसाठी अनुदान देण्यात येते व यामध्ये एक छोटासा बदल करण्यात आलेला आहे कृषी मंत्री यांच्या अंतर्गत खताला शंभर टक्के अनुदान देण्यात येणार अशा प्रकारची माहिती मागे देण्यात आलेली होती. व त्यानुसार योजनेअंतर्गत खताकरिता शंभर टक्के अनुदान देण्यात येणार आहे व यासंबंधीचा जीआर सुद्धा काढण्यात आलेला आहे.

खतासाठी अनुदान देण्याबाबतचा जीआर 21 सप्टेंबर 2023 ला जारी करण्यात आलेला असून ठिबक सिंचना द्वारे पाणी देणे या ऐवजी, रासायनिक व सेंद्रिय खते देणे ही बाब समाविष्ट करण्यात आलेली आहे याचे मुख्य कारण म्हणजे, ठिबक सिंचनाचे मिळणारे अनुदान राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून मिळत होते त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

योजनेअंतर्गत निघालेल्या शासन निर्णयानुसार खत अनुदान या बाबी अंतर्गत, विविध प्रकारच्या फळ पिकांसाठी अनुदान निश्चित करण्यात आलेले आहे व त्यानुसार, चिंच या फळ पिकासाठी 5593 रुपये अनुदान, आंबा 10×10 साठी 6430 रुपये अनुदान. चिकू साठी 5593 रुपये,तर आंबा 5×5 साठी 10067 रुपये, डाळिंब 9810 रुपये,लिंबू 8174 रुपये एवढे अनुदान असणार आहे.

या महत्वपूर्ण निर्णयामुळे स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना अंतर्गत लाभार्थ्यांना खत अनुदानाचा लाभ घेता येईल त्यामुळे घेण्यात आलेला निर्णय महत्त्वपूर्ण आहे.

फळबाग योजनेच्या खत अनुदानासंबंधी जीआर आला, पहा खताला किती मिळेल अनुदान? | Fertilizer subsidy

 शासनाचा मोठा निर्णय, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी परराज्यामध्ये उसाची निर्यात करू नये, ऊस निर्यातीवर बंदी

Leave a Comment