Havaman Andaj : गणपती विसर्जनापर्यंत राज्यात पाऊस कायम, काय आहे पावसाचा अंदाज, बघा संपूर्ण माहिती

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे राज्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली असून राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे, हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यांमध्ये साधारणतः 22-23 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.

गणपती विसर्जनापर्यंत राज्यात पाऊस काय राहणार आहे याचे मुख्य कारण म्हणजे बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे व हा कमी दाबाचा पट्टा पुढे सरकून मध्य प्रदेशाकडे व विदर्भाकडे येणार आहे त्यामुळे राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच बातमी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

ज्या शेतकऱ्यांची सोयाबीन पेरणी लवकर झालेली होती अश्या शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणीवर आलेले असेल, अशा शेतकऱ्यांसाठी ही बातमि अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे कारण राज्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन 5 ऑक्टोंबर पर्यंत काढणीवर येईल, अश्या शेतकऱ्यांनी पाच ऑक्टोबर पर्यंत आपल्या सोयाबीनची काढणी करून घ्यावी, कारण राज्याच्या शक्यता वर्तवली जात आहे.

बंगालच्या खाडीमध्ये तीव्र स्वरूपाचे चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे व त्याची तीव्रता ही महाराष्ट्राकडे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तसेच चक्रीवादळ राज्यात ऑक्टोबर महिन्यात साधारणता दोन वेळा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत अलर्ट देणारी बातमी आहे.

Havaman Andaj : गणपती विसर्जनापर्यंत राज्यात पाऊस कायम, काय आहे पावसाचा अंदाज, बघा संपूर्ण माहिती

अखेर राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख ठरली, मोदींच्या हस्ते या तारखेला राम मंदिराचे उद्घाटन

Leave a Comment

WhatsApp Icon