Inauguration of Ram Mandir: अखेर राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख ठरली, मोदींच्या हस्ते या तारखेला राम मंदिराचे उद्घाटन

आपल्या संपूर्ण भारत देशाला ज्या क्षणाची आतुरतेने वाट होती, अशा राम मंदिराच्या उद्घाटनाचा क्षण लवकर येणार आहे, राम मंदिराचे उद्घाटन कधी होणार याची सर्वांना वाट होती, अशा परिस्थितीमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन केले जाणार आहे, त्यामुळे देशातील नागरिकांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.

राम मंदिराचे बांधकाम जवळपास होत आलेले आहे, त्यामध्ये तळमजला पूर्णपणे तयार झालेला असून गर्भगृहाची निर्मिती सुद्धा पूर्ण झालेली आहे, तसेच राम मंदिरा संबंधित छायाचित्रे सुद्धा वारंवार समोर येत असतात त्यामुळे राम मंदिराचे बांधकाम अफाट व सुंदर दिसते, त्यामुळे राम भक्तांना रामजन्मभूमीचा मुहूर्त कधी येतो याची वाट लागून आहे.

22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंतर्गत राम मंदिराचे उद्घाटन केले जाणार आहे, राम जन्मभूमीचे उद्घाटन होणार ही बातमी ऐकताच राम भक्तांची खुशी मावेनाशी झालेली आहे व कधी एकदा राम मंदिराची उद्घाटन होईल याची वाट सर्वांना आहे. राम मंदिराचे उद्घाटन प्रसंगी लोक येणार आहेत असेच, अनेक नागरिक राम मंदिराचे उद्घाटन प्रसंगी त्या ठिकाणी उपस्थित राहतील.

राम मंदिराच्या उद्घाटनासाठी तब्बल 160 देशांमधील प्रतिनिधींना निमंत्रणे पाठवली जाणार असून ते प्रतिनिधी राम मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहतील, तसेच पंचवीस हजार संत सुद्धा उपस्थित राहणार असून राम मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी नागरिकांना मोफत जेवण दिले जाणार आहे. तसेच भगवान राम यांचा पुतळा हा कर्नाटकातील म्हैसूर येथून आणलेल्या दगडापासून बनवला जात आहे, संपूर्ण राम भक्तांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे

 

देशामध्ये उज्वला योजना 2.0 स्कीम, महिलांना तब्बल 75 लाख मोफत एलपीजी सिलेंडर,योजनेसाठी तब्बल 1650 करोडचा फंड

Leave a Comment