सातबारा वरील ULPIN काय आहे? याचा काय उपयोग आहे | ULPIN Number Maharashtra

 

मित्रांनो ज्याप्रमाणे आपले स्वतःचे आधार कार्ड आहे. त्या आधार कार्ड मुळे आपली एक विशिष्ट ओळख आहे आधार कार्डवर एक विशिष्ट असा नंबर आहे तो प्रत्येकाचा वेगळा असतो त्याचप्रमाणे आता जमिनीचे सुद्धा आधार कार्ड बनणार आहे म्हणजेच जमिनीला सुद्धा आधार कार्ड प्रमाणे ul pin नंबर मिळणार आहे. तर या सातबारावरील UL PIN काय आहे? ulpin number maharashtra याचा उपयोग काय असून यामुळे जमिनीवर तसेच सातबारावर कोणता फरक पडणार आहे, या संदर्भात विस्तृत माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

 

सातबारा वरील ULPIN काय आहे? याचा काय उपयोग आहे | ULPIN Number Maharashtra
सातबारा वरील ULPIN काय आहे? याचा काय उपयोग आहे | ULPIN Number Maharashtra

 

 

मित्रांनो शेतकऱ्यांना त्यांच्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे त्यांच्या जमिनीचा सातबारा. मित्रांनो शेतकऱ्यांचे संपूर्ण जीवन शेतामध्ये कष्ट करण्यात जाते. शेतकऱ्याचे आणि शेत जमिनीचे तसेच शेतकऱ्याच्या शेत जमिनीतील सातबाराचे हे एक वेगळेच नाते असते. जमिनीचा महत्त्वाचा दस्तऐवज हा सातबारा असतो. ULPIN in 7/12, ULPIN in 7/12 Maharashtra

 

 

मित्रांनो पूर्वी तलाठी आपल्याला हाताने लिहून सातबारा देत असायचा परंतु तलाठ्याद्वारे देण्यात येणाऱ्या हस्तलिखित सातबारा मध्ये बरेच वेळा अनेक प्रकारच्या चुका व्हायच्या त्यामुळे संगणकृत सातबारे आणले गेले आहे. परंतु संगणकीकृत सातबारा मध्ये देखील चुका होण्याची शक्यता आहे त्यामुळे जर आपण सातबाराला एक विशिष्ट प्रकारचा क्रमांक दिला आणि त्यामध्ये सर्व माहिती साठवून ठेवली जसे की आपल्या आधार कार्डवर ULPIN Number Maharashtra आपल्या आधार कार्ड चे नंबर वर आपली संपूर्ण माहिती असते त्याचप्रमाणे जमिनीला एक ul pin नंबर देण्यात आला असून जमिनीची संपूर्ण माहिती त्या नंबर मध्ये असणार आहे.

 

 

सातबारा उतारे आणि मिळकत पत्रिकावर यापुढे अद्वितीय भूभाग ओळख क्रमांक म्हणजेच यु एल पिन UL PIN नंबर देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. UL PIN म्हणजे unique land parcel identification number होय. ULPIN Number हा एक विशिष्ट प्रकारचा ओळख क्रमांक असून राज्यातील प्रत्येक जमिनीला हा नंबर देण्यात येणार आहे. ULPIN in Satbara

 

महत्त्वाचं अपडेट: नाविन्यपूर्ण योजना अर्ज सुरू

 

UL Pin मुळे सातबारावर कोणते बदल होणार?What changes will UL Pin bring to Satbara?

या UL Pin सातबारा यावर इतर कोणत्याही बदल होणार नसून सातबारावर हा एक विशिष्ट प्रकारचा ओळख क्रमांक येणार आहे. या नंबर मध्ये तुमच्या जमिनीची संपूर्ण माहिती असेल. या नंबर मुळे एखाद्या शेतकऱ्याची संपूर्ण मालमत्ता तसेच हे जमिनीची माहिती मिळवण्यास सोपे जाणार आहे. हा एक विशिष्ट प्रकारचा नंबर असून यामुळे कोणत्याही जमिनीची तात्काळ ओळख पटणार आहे. ULPIN in Satbara

 

आता सातबारावर गट क्रमांक व उपविभागाच्या उल्लेखाच्या आधी हा पिन क्रमांक टाकण्यात येणार आहे. तसेच या तीन संदर्भात स्कॅन करण्याकरिता एक किंवा कोड सुद्धा सातबारावर असणार आहे. मिळकत पत्रिकेवर मध्यभागी महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह असून पत्रिकेवरील पहिल्या ओळीच्या वरील डाव्या बाजूला ulpin असेल. प्रत्येक जमिनीला हा क्रमांक देण्यात येणार असून ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला आधार कार्ड आहे त्याप्रमाणे प्रत्येक जमिनीला हा नंबर असेल. त्यामुळे जमिनी संबंधित सर्व रेकॉर्ड एकाच नंबरच्या माध्यमातून मिळणार आहे. ULPIN in Satbara,ULPIN Number Maharashtra

 

हे नक्की वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना नवीन अर्ज सुरू

सातबारा वरील UL PIN संदर्भातील ही माहिती तुम्हाला नक्कीच महत्त्वपूर्ण वाटत असेल, ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या सर्व योजना विषयी तसेच शेती विषयक माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत राहा.

Leave a Comment

WhatsApp Icon