शेळी व मेंढी पालन तसेच कुक्कुटपालन करिता 50 लाख रुपये अनुदान अर्ज सुरू | Sheli, Mendhi, Kukut Palan Anudan Yojana Maharashtra

 

मित्रांनो शासनाच्या वतीने शेळी व मेंढी पालन तसेच कुक्कुटपालन करिता 50 लाख रुपये पर्यंत अनुदान वितरीत करण्यात येत आहे. शासनाच्या राष्ट्रीय पशुधन अभियान यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या शेळी, मेंढी व कुक्कुटपालन योजना अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सुरू झालेले असून संबंधित लाभार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तर चला जाणून घेऊया Sheli, Mendhi, Kukut Palan Anudan Yojana Maharashtra संदर्भात विस्तृत माहिती.

शेळी व मेंढी पालन तसेच कुक्कुटपालन करिता 50 लाख रुपये अनुदान अर्ज सुरू | Sheli, Mendhi, Kukut Palan Anudan Yojana Maharashtra
शेळी व मेंढी पालन तसेच कुक्कुटपालन करिता 50 लाख रुपये अनुदान अर्ज सुरू | Sheli, Mendhi, Kukut Palan Anudan Yojana Maharashtra

 

मित्रांनो शासनाच्या Rashtriy Pashudhan Abhiyan वतीने पशुपालकांकरिता अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येत असतात. पशुपालन हा व्यवसाय शेतीला पूरक व्यवसाय म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. आपल्या ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त शेतकरी पशुपालन करतात त्यामुळे जर तुमच्यापैकीही कुणाला एखाद्याला पशुपालन हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर शासनाच्या वतीने शेळ्या मेंढ्या तसेच कुकुट पालन व वराह पालन करिता सबसिडी वितरित करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत लाभ मिळवून आपण पशूंची खरेदी करू शकतो.शेळी व मेंढी पालन योजना 2023

मित्रांनो पशुपालन हा व्यवसाय शेतीला पूरक व्यवसाय असून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य पुरवणारा महत्त्वपूर्ण असा व्यवसाय आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन करावे याकरिता मोठ्या प्रमाणात अनुदानाची वितरण करणे सुरू झालेले आहे. मित्रांनो शेती या व्यवसायामध्ये कधी नैसर्गिक आपत्ती येईल हे सांगता येत नाही. मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती आल्यास शेतकऱ्यांचे पीक उध्वस्त होते त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते अशा वेळेस शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य पुरवणारा व्यवसाय म्हणजे शेतीवर आधारित पशुपालन व्यवसाय होय. तर आता आपण जाणून घेऊया शासनाच्या वतीने पशुपालन व्यवसायाकरिता देण्यात येणारे अनुदान.शेळी व मेंढी पालन योजना 2022

कोणत्या व्यवसायाकरिता अनुदान मिळत आहे?

मित्रांनो शासनाच्या वतीने पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना कुक्कुटपालन करण्याकरिता तसेच शेळी व मेंढी पालन (sheli palan yojana maharashtra) करण्याकरिता तसेच वराह पालन व मुरघास निर्मिती करिता अनुदान वितरित करण्यात येत आहे.

पशुपालन करण्यासाठी मिळणारे अनुदान

शेतकरी मित्रांनो सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान(rashtriya pashudhan abhiyan yojana) अंतर्गत पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना नवीन पशुपालन व्यवसाय सुरू करण्याकरिता सुधारित नियमानुसार खालील प्रमाणे अनुदान वितरित करण्यात येत आहे.

1. शेळी किंवा मेंढी पालन व्यवसाय- 50 लाख रुपये अनुदान
2. कुक्कुटपालन व्यवसाय- 25 लाख रुपये अनुदान
3. मुरघास निर्मिती करिता- 50 लाख अनुदान
4. वराह पालन व्यवसाय- 30 लाख रुपये अनुदान

हे नक्की वाचा:- कृषी यांत्रिकीकरण योजना नविन अर्ज सुरू

 

अर्ज कोण करू शकतो?

मित्रांनो वरील चार महत्त्वपूर्ण अशा योजनांकरिता खालील अर्जदारांना अर्ज करता येत आहे. Sheli Mendhi Palan Yojana Maharashtra

1. वैयक्तिक शेतकरी
2. वैयक्तिक व्यवसायिक
3. शेतकरी उत्पादक कंपनी किंवा संस्था
4. स्वयंसहायता बचत गट
5. शेतकऱ्यांची सहकारी संस्था
6. किंवा खाजगी संस्था
7. सहकारी दूध उत्पादक संस्था

वरील पैकी कोणीही शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या Sheli, Mendhi, Kukut Palan Anudan Yojana अंतर्गत अर्ज करू शकतो.

राष्ट्रीय पशुधन अभियानाचा उद्देश:-

मित्रांनो पशुपालकांकरिता राबविण्यात येणाऱ्या वरीलपैकी चारही योजना या राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या मार्फत राबविण्यात येत आहे. या योजना राबविण्याचा उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील तसेच निम शहरी व शहरी भागातील बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय उभा करता यावा तसेच स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या. जास्तीत जास्त बेरोजगार तरुण व्यवसायाकडे वळावे हा उद्देश या योजनेअंतर्गत आहे.

महत्वाचं अपडेट: महामेष मेंढी पालन योजना सुरू

राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या(rashtriya pashudhan abhiyan yojana) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या योजना करिता लाभ मिळवण्यासाठी अर्ज करण्याची आवाहन शासनाच्या वतीने करण्यात येत आहे. जर तुम्ही सुद्धा ग्रामीण भागात बेरोजगार तरुण असाल तर या योजनेअंतर्गत लाभ मिळण्याकरिता नक्की अर्ज करा.

अर्ज कुठे करायचा?

मित्रांनो राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या चारही योजना करिता अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन असून तुम्हाला अर्ज हा राष्ट्रीय पशुधन विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर करायचा आहे. त्याचप्रमाणे या योजनेसंदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास तुम्ही तुमच्या तालुक्यातील पशुसंवर्धन विभागास भेट देऊन त्यांना या योजने संदर्भात विस्तृत माहिती मिळवू शकतात. या योजनेचा लाभ मिळण्याकरिता लागणारी आवश्यक कागदपत्रे व इतर माहिती तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त करून देण्यात येईल. Sheli Mendhi Palan Yojana

या योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक

शेळी व मेंढी, गाय व म्हैस तसेच मांसल कुकुट पक्षी यांच्यासाठी नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत लाभ मिळवून देणे सुरू करण्यात आले आहेत. ज्या शेतकऱ्यांना वरील योजना अंतर्गत लाभ मिळवायचा आहे, त्यांनी लवकरात लवकर नावीन्य पूर्ण योजना अंतर्गत अर्ज करायचा आहे. सर्वच जिल्ह्यांसाठी नाविन्यपूर्ण योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. आपल्या जिल्ह्यात या योजनेअंतर्गत ज्या बाबींचा लाभ देणे सुरू आहे, त्या बाबींसाठी अर्ज करावा.

या योजने संदर्भात संपूर्ण माहिती पुरविणारी लिंक आम्ही तुम्हाला वर दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही या योजने संदर्भात संपूर्ण माहिती मिळू शकतात त्याचप्रमाणे अर्ज सुद्धा करू शकतात.

Leave a Comment