MPSC विद्यार्थ्यांना Barti अंतर्गत मोफत प्रशिक्षण आणि स्कॉलरशिप सुद्धा | Barti Scholorship for MPSC Students

 

मित्रांनो जे विद्यार्थी एमपीएससीची तयारी करत आहेत, अशा विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण आणि नऊ हजार रुपये विद्यावेतन म्हणजेच स्कॉलरशिप मिळण्याची सुवर्णसंधी प्राप्त झालेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था(बार्टी) पुणे मार्फत MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता मोफत प्रशिक्षण व मोफत विद्या वेतन मिळवण्याची संधी प्राप्त झालेली आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण एमपीएससी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता बार्टी अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या Barti Scholorship for MPSC Students मोफत प्रशिक्षण आणि स्कॉलरशिप प्रोग्राम संदर्भात विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत.

MPSC विद्यार्थ्यांना Barti अंतर्गत मोफत प्रशिक्षण आणि स्कॉलरशिप सुद्धा | Barti Scholorship for MPSC Students
MPSC विद्यार्थ्यांना Barti अंतर्गत मोफत प्रशिक्षण आणि स्कॉलरशिप सुद्धा | Barti Scholorship for MPSC Students

 

महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन मार्फत वर्ष 2023 करिता ज्या परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे त्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण व विद्यावेतन हे देण्यात येत आहे. बार्टी संस्थेअंतर्गत या विद्यार्थ्यांना मोफत अनिवासी प्रशिक्षण देण्यात येत आहे. याकरिता पात्र उमेदवारांना संस्थेकडे अर्ज करायचा आहे. ज्यांची निवड करण्यात येईल त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था Dr. Babasaheb Ambedkar Sanshodhan Prashikshan Sanstha (barti) अंतर्गत मोफत प्रशिक्षण आणि स्कॉलरशिप मिळणार आहे. या प्रोग्राम अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दर महिन्याला नऊ हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे. या प्रोग्राम अंतर्गत करावयाचा अर्जाचा नमुना आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेला आहे अर्जाची लिंक खाली दिलेली असून त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही तो अर्ज डाऊनलोड करू शकतात.

तुम्हाला विहित नमुन्यातील अर्ज प्रशिक्षण केंद्राकडे जाऊन सबमिट करावा लागेल. ज्या विद्यार्थ्यांची या प्रशिक्षणांतर्गत निवड करण्यात येईल, त्यांना बारा महिन्यापर्यंत प्रशिक्षण देण्यात येईल.

बार्टी मोफत प्रशिक्षणाकरिता पात्रता Eligibility for Barty Free Training:

मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था म्हणजेच बार्टी पुणे(barti Pune Maharashtra) अंतर्गत MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण आणि विद्या वेतनाचा लाभ मिळवायचा असेल तर तुमच्याकडे खालील पात्रता असावी लागते.

1. विद्यार्थी हा अनुसूचित जाती या प्रवर्गातील असावा लागतो.
2. विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असावा लागतो तसेच विद्यार्थ्याकडे महाराष्ट्राचा रहिवासी असल्याबाबत प्रमाणपत्र असावे लागते.
3. विद्यार्थ्याकडे अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्याचा दाखला असावा लागतो.
4. विद्यार्थ्याकडे अधिवास प्रमाणपत्र असावे लागते.
5. विद्यार्थी हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा लागतो.
6. अर्जदाराची म्हणजेच विद्यार्थ्यांचे वय हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेकरिता बसण्याकरिता पात्र असावी लागते.
7. वर्ष 2023 मध्ये जेवढ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा घेण्यात येणार आहे त्या परीक्षा करिता तो उमेदवार पात्र असावा लागतो.
8. या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागतो.

आवश्यक कागदपत्रे: Documents Required For Barti Scholorship Scheme

Barti Pune या प्रशिक्षणाअंतर्गत जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

1. जातीचे प्रमाणपत्र
2. उत्पन्नाचा दाखला
3. पासपोर्ट साईज चे फोटो
4. अधिवास प्रमाणपत्र
5. पदवी उत्तीर्ण केल्याबाबतचे प्रमाणपत्र
6. उमेदवारांचे आधार कार्ड
7. उमेदवारांनी शाळा सोडल्याचा दाखला

जर तुम्ही एमपीएससी या परीक्षेची तयारी करत असाल आणि तुम्हाला barti -Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या प्रशिक्षणाच्या माध्यमातून लाभ मिळवायचा असेल तर तुमच्याकडे वरील कागदपत्रे असणे आवश्यक आहे. Barti Free Coaching For MPSC Students

महत्वाचं अपडेट:  50,000 कोलगेट स्कॉलरशिप करिता ऑनलाईन अर्ज सुरू

विद्यार्थ्यांची निवड कशा प्रकारे करण्यात येते?

मित्रांनो एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था(Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute) पुणे अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या प्रोग्राम अंतर्गत विद्यार्थ्यांची निवड ही गुणवत्ता यादीनुसार करण्यात येते. तसेच ज्या उमेदवारांची वार्षिक उत्पन्न हे आठ लाख रुपयांपेक्षा कमी आहे म्हणजेच आठ लाख रुपयांच्या मर्यादित आहे अशा सर्व पात्र उमेदवारांना प्रवेश देण्यात येणार आहे. Scholarship for MPSC students under barti

प्रशिक्षण मिळण्याकरिता अर्ज करण्याची अंतिम तारीख

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच barti पुणे (Barti Free Training and Scholorship) अंतर्गत मोफत प्रशिक्षण मिळवण्याकरिता अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 31 डिसेंबर 2022 आहे.

बार्टी अंतर्गत MPSC फ्री कोचिंग अर्ज कसा करायचा? How to Apply for MPSC Free Coaching under Barti?

मित्रांनो जर तुम्हाला बार्टी पुणे यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या MPSC फ्री कोचिंग आणि Scholorship अंतर्गत अर्ज करायचा असेल तर ऑफलाईन पद्धतीने विहित नमुन्यातील अर्ज करायचा आहे. अर्ज डाउनलोड करण्याची लिंक खाली दिलेली आहे, त्यावर क्लिक करून अर्ज डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढून अर्ज तुम्ही व्यवस्थितपणे भरून जमा करू शकतात.

Barti Free Mpsc Coaching Form Download Link- 

वरील लिंक वरून अर्ज डाउनलोड करुन घ्या.

उमेदवारांना प्रशिक्षण कोणत्या ठिकाणी देण्यात येईल?Barti Free Coaching For MPSC Students

मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था म्हणजेच बार्टी अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल त्यांना एमपीएससीचे ट्रेनिंग देण्याकरिता म्हणजे त्यांची शिकवणी घेण्याकरिता संबोधी अकादमी संचालित संबोधित स्पर्धा परीक्षा केंद्र, तिसरा मजला सी बिल्डिंग, निर्माण भारतीय सिटी सेंटर, शासकीय ग्रंथालयासमोर, निराला बाजार, औरंगाबाद या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बार्टी अंतर्गत या विद्यार्थ्यांना एका वेळेस या ठिकाणी 200 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. दोनशे अनुसूचित जातींच्या जागांपैकी 30 टक्के जागा महिलांकरिता तर 4 टक्के जागा दिव्यांग व्यक्तींकरिता राखीव असतील. तर 5 टक्के जागा या अनुसूचित जाती करिता राखीव असतील, तर 5 टक्के जागा या विशेष बाब म्हणून राखीव ठेवण्यात येणार आहे. Barti Free Coaching For MPSC Students

महत्वाचं अपडेट: वनरक्षक भरती जाहिरात आली. आत्ताच अर्ज करा 

बार्टी अंतर्गत प्रशिक्षण मिळवण्याच्या अटी:-

मित्रांनो Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute Pune अंतर्गत प्रशिक्षण मिळवण्याकरिता खालील अटी ठरवून देण्यात आलेला आहे. Barti Free Coaching For MPSC Students

1. उमेदवारांची निवड ही गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येणार असून ज्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल त्या विद्यार्थ्यांना दररोज चार तास किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीची प्रशिक्षण मिळणार आहे.
2. या प्रोग्राम अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्याला कमीत कमी 80 टक्के पेक्षा जास्त उपस्थिती दर्शवावी लागेल.
3. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दर महिन्याला नऊ हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे.
4. शासनाच्या वतीने या संस्थेला विद्यार्थ्यांकरिता टेस्ट सिरीज तसेच इतर शैक्षणिक साहित्य व पुस्तके हे खरेदी करण्याकरिता प्रत्येक विद्यार्थ्याप्रमाणे पंचवीस हजार रुपये मिळणार आहे.
5. जे विद्यार्थी प्रशिक्षण मिळवणार आहे, त्यांना कोणत्याही प्रकारची शासकीय खाजगी किंवा निम शासकीय नोकरी करता येणार नाही.
6. सदर योजनेबाबत कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास त्याबाबतचा संपूर्ण अधिकार हा barti च्या महासंचालकाकडे आहे.
7. जर उमेदवारांनी या योजनेअंतर्गत यापूर्वी लाभ मिळवलेला असेल, तर त्यांना पुन्हा लाभ मिळवता येणार नाही.

Leave a Comment