राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना 2022 माहिती मराठी | National Apprenticeship Promotion Scheme (NAPS) In Marathi

राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना 2022 माहिती मराठी | National Apprenticeship Promotion Scheme (NAPS) In Marathi

 

राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना(NAPS) ही कारागिरांना आवश्यक असलेले पायाभूत औद्योगिक प्रशिक्षण हे प्रदान करून कारागिरांना आधुनिक तंत्रज्ञानाचा तसेच यंत्रसामुग्री चा वापर करता यावा आणि ते स्वावलंबी बनावे या उद्देशान अस्तित्वात आलेली आहे.

शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजनाही((National Apprenticeship Promotion Scheme – NAPS )) केंद्र सरकारच्या वतीने राबवण्यात येत आहेत. कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार यांच्या नियंत्रणाखाली ही योजना आपल्या महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत उमेदवारास कुशल कारागीर बनण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रशिक्षण देण्यात येत आहे.

या योजना अंतर्गत शिकाऊ उमेदवारांकरिता राखीव जागा ह्या उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या उद्योग कंपनी किंवा आस्थापने 30 किंवा त्यापेक्षा जास्त मनुष्यबळ आहेत. अशा कंपन्यांना महाराष्ट्रासाठी 25% पर्यंत शिकाऊ उमेदवार भरती करणे बंधनकारक आहे. शिकाऊ उमेदवाराची भरती करत असताना पाच टक्के जागा या कौशल्य प्रमाणपत्र धारक उमेदवारांसाठी त्याचप्रमाणे फ्रेशर साठी राखीव ठेवण्यात येणार आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण योजनेअंतर्गत उमेदवारांची भरती वाढवण्याकरिता “राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेस”(National Apprenticeship Promotion Scheme – NAPS ) मान्यता देण्यात येत आहे.

हे नक्की वाचा:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

 

या राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजने ची अंमलबजावणी खालील प्रमाणे करण्यात येत आहे.

1. या योजने अंतर्गत जे उमेदवार केंद्र शासनाच्या Apprenticeship Training Portal संकेतस्थळावर नोंदणी करुन त्यांची प्रशिक्षण पूर्ण करतील त्यांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येईल.
2. या योजनेअंतर्गत लाभार्थ्याचा आधार कार्डचा क्रमांक Apprenticeship Training Portal वर लिंक करण्यात येईल.
3. या योजनेअंतर्गत ज्या आस्थापना शिकवू उमेदवारांची भरती करतील अशा आस्थापनांना प्रति शिकवू उमेदवार प्रमाणे जेवढे विद्यार्थी शिकाऊ उमेदवार देण्यात येत आहे त्याच्या 25% किंवा 1500 रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम त्या स्थापनेला देण्यात येणार आहे.
4. या शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजने अंतर्गत फ्रेशर ला प्रशिक्षण कालावधीत ही रक्कम मिळणार नाही. त्याऐवजी ही रक्कम स्थापनेस ५०० तास / ३ महिने एवढी देय राहील.
5. योजने(National Apprenticeship Promotion Scheme – NAPS )अंतर्गत आस्थापना मध्ये महाराष्ट्रातील शिकाऊ उमेदवारांकरिता 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात येईल. त्यापैकी पाच टक्के जागा आहे फ्रेशर व कौशल्य प्रमाणपत्र धारक उमेदवारांकरिता असणार आहे.
6. या राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना अंतर्गत केंद्र शासनाच्या तर्फे दरवर्षी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
7. ही केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे.

शिकाऊ उमेदवारी योजना प्रशिक्षण पोर्टल वर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

अश्या प्रकारे आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ही शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना राबविण्यात येत आहे. या योजने संदर्भात काही शंका असल्यास कमेंट करा आम्ही तुमच्या शंकांचे नक्कीच निरसन करण्याचा प्रयत्न करू. ही माहिती आवडल्यास इतरांना देखील शेअर करा. अशाच महत्वपूर्ण पोस्ट करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.

Leave a Comment