सातबारा (7/12) दुरुस्त करण्यासाठी असा करा ऑनलाईन अर्ज? | Satbara Correction Online Maharashtra in Marathi

सातबारा (7/12) दुरुस्त करण्यासाठी असा करा ऑनलाईन अर्ज? | Satbara Correction Online Maharashtra in Marathi

 

 

आता आपल्याला आपला सातबारा(सातबारा उतारा महाराष्ट्र) घर बसल्या ऑनलाइन पद्धतीने पाहता येतो तसेच तो डाउनलोड करता येतो. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या सातबारे मध्ये जर काही बदल करायचे असतील. सातबारा मध्ये जर काही त्रुटी (Satbara Correction Online Maharashtra in Marathi)असतील आणि त्या त्रुटी जर दूर करावयाची असतील तर त्याची सुविधा ही आपल्याला ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध आहे. परंतु अशा ऑनलाइन सुविधा ह्या उपलब्ध असल्या तरी सुद्धा बऱ्याच नागरिकांना या माहितीच्या अभावी माहीत नसतात. त्यामुळे ते तलाठी कार्यालयात जाऊन आपला वेळ आणि पैसा वाया घालतात. त्यामुळे आजच्या या पोस्टमध्ये आपण सातबारा दुरुस्त करण्याची ऑनलाईन प्रोसेस जाणून घेणार आहोत.

 

बऱ्याच वेळा आपल्याला सातबारा मध्ये खालील प्रकारचे बदल करायचे (Satbara correction in Marathi) असतात. जसे की खरेदी खत आधारित झालेल्या बद्दल, कुटुंबातील व्यक्तीची झालेली निधन त्यामुळे वारसाच्या नावे करण्यात येणाऱ्या सातबारावरील बदल, जमीन लीज वर असल्यामुळे झालेला बदल, जर आपण एखाद्या बँकेकडून कर्ज घेतलेले असल्यास बँकेने जर सातबारावर बोजा टाकल्यास त्यामध्ये होणारा बदल, आणि जर आपण घेतलेल्या कर्जाची परतफेड केल्यानंतर आपल्याला त्या बँकेने टाकलेल्या कर्जाची बोजा हा सातबारा (7/12 durusti)वरून कमी करायचा असेल तर अशा प्रकारचा बदल जर आपल्याला करावयाची असतील, तर ते आपण ऑनलाईन पद्धतीने सुद्धा घरबसल्या करू शकतो.(Satbara Correction Online Maharashtra in Marathi) परंतु बऱ्याच जणांना या विषयी माहिती नसल्यामुळे ते तलाठी कार्यालयामध्ये कागदपत्रे घेऊन चकरा मारत असतात. जर आपण ही कामे तलाठी यांच्याकडून करून घ्यायची असेल तर तलाठ्याकडे बदल करायची संपूर्ण कागदपत्रे सुपूर्द करावी लागतात आणि त्यानंतर तलाठी नोंद घेण्याची प्रक्रिया पूर्ण करत असतो. परंतु ही प्रक्रिया किचकट आणि वेळ खाणारी आहे, त्यामुळे जर आपण यापूर्वी सातबारा मधील बदल करावयास टाकलेला असेल आणि तो अजून पर्यंत झालेल्या नसेल आणि त्यावेळेस जर आपल्याला आपल्या जमिनीची इतर व्यवहार करायचे असेल तर म्हणजेच आपल्याला आपली जमीन एका व्यक्तीचे नाव दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर करायची असेल आणि अशा वेळेस पिक विमा संबंधित काही कामे आल्यास किंवा जमिनीची भूसंपादन झाल्यास शासनाच्या रकमेचे वाटप झाल्यास अनेक प्रकारचे प्रश्न आणि अडचणी निर्माण होत असतात. या सर्व बाबींवर तोडगा काढण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने ई हक्क प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता महसूल विभागातील कामे ही जलद गतीने होणार आहे.

हे नक्की वाचा:- सरकारकडून मिळालेल्या जमिनी अशा करा स्वतःच्या नावावर.

 

त्यामुळे आता या ई हक्क प्रणालीच्या आधारे आपले सातबारा मध्ये काही दुरुस्ती करावयाची असेल सातबारा मध्ये चुका झालेल्या असतील तर या चुका दुरुस्त करण्या(Satbara correction in Marathi) करिता आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. जर तुमच्या हस्तलिखित सातबारा आणि ऑनलाईन सातबारा मध्ये फरक आढळून आला असेल जसे की क्षेत्र बदललेले असेल कमी जास्त असेल किंवा दोन्ही उतारांमध्ये शेतकरी बांधवांच्या नावांमध्ये काही बदल झालेला असेल तर ह्या चुका आपण दुरुस्त केल्या पाहिजे. त्यामुळे आता ह्या चुका कशा पद्धतीने दुरुस्त करायच्या ते आपण जाणून घेत आहोत.

सातबारा मधील चुका दुरुस्त करण्याची ऑनलाईन प्रोसेस:-

जर तुम्हाला तुमच्या सातबारा उतारा मध्ये झालेल्या चुका दुरुस्त करावयाचे असतील तर खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करावी.

1. सातबारा उतारा(7/12 Mutations Online) मधील झालेल्या चुका ह्या ऑनलाइन पद्धतीने दुरुस्त करण्याकरिता सर्वप्रथम खाली दिलेली Property Registration ची वेबसाईट तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटर मध्ये ओपन करून घ्यावी.

https://pdeigr.maharashtra.gov.in

ही वेबसाईट ओपन करून घ्यावी

हे नक्की वाचा:- असा काढा तुमच्या जमिनीचा फेरफार ऑनलाईन घरबसल्या

2. आता तुम्ही ही वेबसाईट तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरमध्ये ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर ‘Public data entry’ हे पेज ओपन झालेले असेल. आता तुम्हाला या पेज मध्ये लॉगिन करण्याकरिता नवीन नोंदणी करायचे आहे. त्यासाठी तुम्ही Proceed to login या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर क्रिएट न्यू युजर यावर क्लिक करावे.
3. आता Sign Up  ऑप्शन वर क्लिक करावे. आता न्यू युजर अकाउंट ओपन करण्याकरिता आवश्यक असलेली सर्व माहिती भरून सेव करावी.
4. आता तुम्ही नवीन नोंदणी केलेली आहे त्यामुळे तुम्हाला लॉगिन करायचे आहे. त्यामुळे लॉगिन या बटनावर क्लिक करून तुमचा युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करून घ्यायचे आहे.

हे नक्की वाचा:- गावातील तलाठ्याचे सर्व जमिनीचे व्यवहार पहा आता ऑनलाईन

5. आता तुम्ही यशस्वीरित्या लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर’Details‘ नावाची एक पेज ओपन होणार आहे. त्यामुळे तुम्हाला वेगळे पर्याय दिसत असेल. आपल्याला आपल्या सातबारा मध्ये बदल करायचा असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला ‘7/12 Mutations‘ हा पर्याय शोधून त्यावर क्लिक करायचे आहे.
6. आता तुम्हाला तुमच्या गावाची माहिती तुमचा जिल्हा तुमचा तालुका हे निवडून घ्यायचे आहे.
7. आता तुम्हाला तुमच्या सातबारा (Satbara Mutation) मध्ये जो बदल करायचा आहे तो निवडायचा आहे. म्हणजेच फेरफार याचा प्रकार तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे.
8. आपल्याला या पोर्टलच्या माध्यमातून अनेक प्रकारचे बदल करता येतात. परंतु बऱ्याच लोकांच्या हस्तलिखित व संगणकीकृत सातबारा मध्ये तफावत आहे त्यामुळे त्यांनी “हस्तलिखित व संगणकीकृत सातबारामध्ये तफावत दुरुस्तीसाठी करावयाचा अर्ज” हा ऑप्शन या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे. आता तुमच्यासमोर सातबारा मधील चूक दुरुस्त(7/12 Mutations) करण्यासाठी चा अर्ज हा ओपन झालेला असेल. त्या अर्ज मध्ये तुम्हाला अर्जदाराची संपूर्ण माहिती, अर्जदाराचे नाव, अर्जदाराच्या वडिलांचे नाव किंवा पतीचे नाव, अर्जदाराचे आडनाव, अर्जदाराचा ईमेल आणि मोबाईल नंबर ही सर्व माहिती टाकून पुढे जा या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला अर्ज क्रमांक मिळेल. आता ओके बटनावर क्लिक करा.
9. आता तुम्हाला तुमच्या सातबारा वरील खाते क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर ‘खातेदार शोधा’ या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यामध्ये तुमचे नाव( खातेदाराचे नाव ) तुम्हाला निवडून घ्यायचे आहे. त्यानंतर खातेदाराला ज्या गट क्रमांकाचा सातबारा दुरुस्त करायचा असेल तो गट क्रमांक या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे.
10. आता या ठिकाणी खातेदाराच्या जमिनीची संपूर्ण माहिती तुम्हाला दिसत असेल. आता तुम्हाला सातबारा(Satbara Durusti)  मधील जी चूक दुरुस्त करायचे असेल ती या ठिकाणी निवडून घ्यायची आहे. जसे की खातेदाराच्या नावात दुरुस्ती, एकूण क्षेत्र मध्ये दुरुस्ती, एककात दुरुस्ती करणे यापैकी तुम्हाला ज्या प्रकारची दुरुस्ती करायची असेल ते निवडून घ्यावी. आता जर तुम्ही या ठिकाणी खातेदाराच्या नावात दुरुस्ती असा पर्याय निवडला असेल तर तुम्हाला संगणकीकृत सातबारा मधील खातेदारकाचे नाव तिथे दाखवण्यात येत असेल. त्यातील तुम्हाला ज्या नावात दुरुस्ती करायची असेल ते दुरुस्त नाव इथे लिहायचे आहे, आणि त्याखाली तुम्हाला दुरुस्तीचा तपशील सुद्धा लिहायचा आहे.
11. आता तुम्हाला कागदपत्रे अपलोड करायचे आहे. यामध्ये तुम्हाला जुने हस्तलिखित सातबाराची प्रत अपलोड करायची आहे तसेच इतर जुने फेरफार सुद्धा अपलोड करायचे आहे. त्यानंतर उर्वरित सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहे.
12. त्यानंतर तुम्हाला ‘स्वघोषणा’ पत्रावर क्लिक करून सहमत आहे या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर सबमिट केल्यानंतर तुमचा अर्ज हा गावातल्या तलाठी कार्यालयात सबमिट केल्या जाईल त्यानंतर तो अर्ज तलाठी चेक करून मंडळ अधिकाऱ्यांकडे ट्रान्सफर करतील. तुमच्या अर्जाची पडताळणी झाल्यानंतर तुमच्या सातबारा उतारा मध्ये तुम्ही केलेल्या दुरुस्तीची नोंद करण्यात येईल. आणि तुमच्या सातबारातील चुका दुरुस्त होऊन तुमचा सातबारा मध्ये बदल होईल.(7/12 mutation Online Maharashtra) satbara durusti online

सातबारा उतारा वरील खालील प्रकारचे बदल, आपण ऑनलाइन पद्धतीने करू शकतो:-

१. ई करार नोंदी
२. बोजा / गहाणखत दाखल करणे
३. मयताचे नाव कमी करणे
४. वारस नोंद
५. बोजा कमी करणे
६. अज्ञानपालनकर्ता चे नाव ( अपाक ) कमी करणे
७. एकत्र कुटुंब पुढारी / म्यानेजर ( एकुम्या ) कमी करणे
८. विश्वास्थांचे नाव बदलणे

अशा प्रकारचे सातबारा उतारा मधील बदल हे आपण घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने करू शकतो. सातबारा उतारा मधील चुका ऑनलाईन दुरुस्त करण्यासंबंधीत ही माहिती आवडल्यास इतरांना देखील नक्की शेअर करा. अशाच महत्त्वपूर्ण माहिती करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.

Leave a Comment

WhatsApp Icon