शॉप ऍक्ट लायसन्स ऑनलाईन कसे काढायचे? | Shop Act licence Online Registration Maharashtra

शॉप ऍक्ट लायसन्स ऑनलाईन कसे काढायचे? | Shop Act licence Online Registration Maharashtra

 

जर तुम्ही एखादा उद्योग, व्यवसाय, हॉटेल, किंवा दुकान चालवत असाल तर तुमच्याकडे शॉप ऍक्ट लायसन्स(Shop Act licence) हे असणे अत्यंत आवश्यक असते. जर तुमच्याकडे शॉप ऍक्ट लायसन्स(Shop Act licence Online) नसेल तर तुम्हाला तुमचा व्यवसाय किंवा उद्योग बंद सुद्धा करावा लागू शकतो. त्यामुळे Shop Act licence Online Registration कसे करायचे? shop act licence maharashtra संदर्भात संपूर्ण प्रोसेस आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

मित्रांनो आपल्यापैकी बरेच जणांकडे छोटा मोठा व्यवसाय असेल किंवा एखादा उद्योग असेल किंवा एखादे दुकान असेल तर ते दुकान आपण आपल्या गावामध्ये किंवा तालुक्याच्या ठिकाणी चालवत असतो. परंतु जर तुम्हाला तुमचे दुकान भविष्य काळामध्ये मोठे करायचे असेल? तर ते दुकान तुम्हाला एकाच ठिकाणी वारंवार चालवावे लागते. म्हणजे तुम्ही एकाच जागेवर अनेक वर्षापासून व्यवसाय करत असाल तर तुमची त्या शहरात ख्याती वाढते. व तुमचा व्यवसाय भरभराटीस लागतो. परंतु हे सर्व होण्याकरिता तुमच्याकडे तुमच्या दुकानाची लायसन्स असायला पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे शॉप ॲक्ट लायसन्स(shop act licence in marathi) असायला पाहिजे. Shop Act License असल्यास तुमच्याकडे शासनाचे दुकान स्थापनेचे प्रमाणपत्र मिळत असते. त्यामुळे हे महत्त्वपूर्ण असलेले Shop Act licence Online Registration Maharashtra विषयी माहिती आता आपण खाली जाणून घेत आहोत.

Table of Contents

शॉप ऍक्ट लायसन कोणी काढावे?

जर तुम्ही खालील व्यवसाय किंवा उद्योग करत असाल तर तुम्ही शॉप ॲक्ट(Shop Act licence Maharashtra) लायसन काढायला हवे.

हॉटेल, रेस्टॉरंट, रिटेल व्यवसाय, ट्रेडिंग व्यवसाय, एज्युकेशन इन्स्टिट्यूट, कोचिंग इन्स्टिट्यूट, एज्युकेशन सेंटर, गारमेंट रिटेल शॉप, शोरूम, होलसेल काम, बुक शॉप, सर्विस सेंटर, प्लेसमेंट एजन्सी, गोडाऊन, गिफ्ट शॉप, किराणा दुकान, थेटर, मल्टिप्लेक्स, बँक शाखा, किंवा इतर व्यवसाय जे तुम्ही घरून ऑपरेट करत आहात.

शॉप ऍक्ट लायसन काढण्याचे फायदे(shop act licence maharashtra Benifits)

1. शॉप ऍक्ट लायसन्स काढल्यामुळे (shop act licence in marathi) आपण कोणत्याही बँकेत चालू खाते (Current Account) उघडू शकतो.
2. जर तुमचे एखादी स्टार्टअप असेल तर तुम्हाला शॉप ऍक्ट लायसन्स मुळे गव्हर्मेंट च्या टेंडर मध्ये फायदा मिळू शकतो.
3. शॉप ॲक्ट लायसन्स आपण आपल्या दुकानांमध्ये लावल्यामुळे आपल्या व्यवसायाची Legal Compliance कमी होतात.
4. शॉप ॲक्ट लायसन्स बँकेतून कर्ज मिळणे सुरू होते.

 

शॉप ॲक्ट लायसन्स ऑनलाईन कसे काढायचे? How to Register For Shop Act License online? 

शॉप ॲक्ट लायसन्स ऑनलाईन काढण्याची प्रक्रिया ही खालील प्रमाणे आहे.(Shop Act License Maharashtra Online Registration)

शॉप ॲक्ट लायसन्स(shop act licence maharashtra 2022) साठी ऑनलाईन अर्ज करण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला आपले सरकारच्या ऑफिशियल संकेतस्थळावर जायचे आहे ती वेबसाईट खाली आहे.

https://aaplesarkar.mahaonline.gov.in

आता शॉप ॲक्ट लायसन काढण्याकरिता वरील वेबसाईटवर ओपन केल्यानंतर आपल्यासमोर तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरमध्ये एक नवीन डॅशबोर्ड ओपन झालेला असेल. आता यामध्ये तुम्हाला नवीन युजर (New User) हा पर्याय दिसत असेल त्या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि तुमचे रजिस्ट्रेशन करायचे आहे. आपले सरकारच्या पोर्टलवर नवीन युजर नोंदणी करण्याकरिता तुम्हाला आवश्यक ती सर्व माहिती त्या ठिकाणी ऍड करायची आहे. त्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर वर युजर आयडी आणि पासवर्ड मिळणार आहे.

 

हे नक्की वाचा:- आपले सरकार वर रजिस्ट्रेशन कसे करायचे?

 

 तो युजर आयडी आणि पासवर्ड तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे त्याचप्रमाणे तुमच्या जिल्ह्याचे नाव टाकायचे आहे आणि खाली दिलेल्या कॅपच्या कोड तुम्हाला त्या ठिकाणी टाकून लॉगिन करून घ्यायचे आहे.shop act licence registration, how to get shop Act licence

आता तुम्ही शॉप ॲक्ट लायसन ऑनलाईन पद्धतीने काढण्याकरिता (Shop Act licence Maharashtra Online Registration) आपले सरकारच्या पोर्टलवर लॉगिन केलेले आहे. आता तुमच्या समोर आपली सरकारची नवीन पेज ओपन झालेले असेल. त्या ठिकाणी तुम्हाला भाषा निवडण्याचा पर्याय दिसलेला असेल. तुम्ही या ठिकाणी इंग्लिश किंवा मराठी तुम्हाला जी भाषा हवी आहे ती निवडून घ्या. म्हणजे जी भाषा पाहिजे त्या भाषेवर क्लिक करा.

आता शॉप ॲक्ट लायसन करिता नोंदणी करण्यासाठी तुम्हाला त्या सर्च बॉक्समध्ये “Shop and Establishment Registration” असे सर्च करायचे आहे आणि पर्याय निवडायचा आहे. आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन झालेले असेल त्यामध्ये तुम्हाला Application Form या पर्यायावरती क्लिक करायचे आहे. आता आपल्यासमोर शॉप ॲक्ट लायसन करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता तुमच्या समोर दोन पर्याय दिसत असेल त्यामध्ये पहिला पर्याय म्हणजे शून्य ते नऊ कामगार आणि दुसरा पर्याय म्हणजे दहापेक्षा जास्त कामगार. जर तुमच्या व्यवसायामध्ये शून्य ते नऊ पर्यंत कामगार असेल तर तुम्ही पहिला पर्याय निवडावा. किंवा दहापेक्षा जास्त कामगार असल्यास तुम्ही दुसरा पर्याय निवडू शकतात. समजा आपण या ठिकाणी शून्य ते नऊ वर्ग असा पर्याय निवडलेला आहे. आता खाली दिसत असलेल्या कन्फर्म या बटणावर क्लिक करायचे आहे.


हे नक्की वाचा:- बांधकाम कामगार योजना ऑनलाईन नोंदणी कशी करायची? 

आता शॉप ॲक्ट लायसन्स करिता फॉर्म एफ FORM F भरायचा आहे त्यामध्ये खालील प्रमाणे माहिती ॲड करायचे आहे.

“FORM F” ओपन झाल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला तुमचे विभाग निवडायचा आहे त्यामध्ये तुमचा जिल्हा निवडायचा आहे आणि त्याकरिता उपलब्ध असलेले जवळच्या ऑफिसचे नाव तुम्हाला निवडायचे आहे.
खालील प्रमाणे माहिती प्रविष्ट करा.

Name of the Establishment :-

तुम्हाला या नेम ऑफ द इस्टॅब्लिशमेंट या पर्यायांमध्ये तुमच्या दुकानाचे नाव टाकायचे आहे. जे तुमच्या दुकानाचे नाव असेल किंवा तुम्ही जे ठरवले असेल ते नाव तुम्ही या ठिकाणी टाकायचे आहे.

Previous details of establishment( आस्थापनेची पूर्वीची सविस्तर माहिती ):-

या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आस्थापनेची पूर्वीची माहिती ही प्रविष्ट करायची आहे.

Address and situation of the Establishment :-

आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या दुकानाचा म्हणजेच आस्थापनेचा पत्ता तसेच ठिकाण हे प्रविष्ट करायचे आहे. तुमची दुकान कोणत्या एरिया मध्ये आहे तुमच्या दुकानाचा ऍड्रेस तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे.

Date of Commencement of Business

आता या ठिकाणी तुम्हाला तुम्ही तुमचा व्यवसाय कोणत्या तारखेला सुरू केला म्हणजेच तुम्हाला व्यवसाय सुरू केल्याचा दिनांक टाकायचा आहे. व्यवसाय सुरू केल्याचा दिनांक हा तुम्ही ज्या दिवशी फॉर्म भरत आहात. त्या दिवसापासून 30 दिवस पूर्वीचा टाकू नये.

Nature of Business

आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या व्यवसायाचे स्वरूप Nature of Business कोणते आहे ते टाकायचे आहे. म्हणजे तुमचा व्यवसाय हा सार्वजनिक क्षेत्रातील आहे किंवा खाजगी क्षेत्रातील आहे. हे तुम्हाला प्रविष्ट करायचे आहे. आपला व्यवसाय हा खाजगी स्वरूपातील असल्यामुळे खाजगी आपण या ठिकाणी निवडून घ्यावे.

 

Manpower/ Workers Details ( मनुष्यबळ / कामगार तपशील )

आता Manpower/ Workers Details या पर्यायांमध्ये तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये एकूण किती स्त्रिया तसेच पुरुष हे कामगार आहेत यांची एकूण संख्या टाकायची आहे.

हे नक्की वाचा:- पी एम दक्ष योजना काय आहे?

Name of the employer

आता या ठिकाणी तुम्हाला Name of the employer पर्यायामध्ये मालकाचे संपूर्ण नाव टाकायचे आहे. मालकाचे संपूर्ण नाव आहे आधार कार्ड प्रमाणे टाकायचे आहे.

Residential Address of the Employer

Residential Address of the Employer  मध्ये तुम्हाला मालकाचा निवासी पत्ता टाकायचा आहे. मालक ज्या ठिकाणी रहिवास करत आहे त्या ठिकाणचा रहिवासी पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे.

Name and Residential Address of Manager

Name and Residential Address of Manager मध्ये आपल्याला व्यवस्थापकांचे नाव आणि निवासी पत्ता हा प्रविष्ट करायचा आहे.

(a) Category of Establishment i.e. Shop/ Establishment/ Residential Hotel/ Restaurant / Theatre / Other places of public amusement or entertainment and other establishment

आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या दुकानाचा म्हणजेच व्यवसायाचा वर्ग कोणता आहे ते टाकायचा आहे. Category of Establishment त्यामुळे तुम्ही दुकाने किंवा थेटर किंवा सायबर कॅफे यापैकी जे असेल ते तुम्ही या ठिकाणी निवडून घ्या.

(b) Type of organisation i.e. Proprietor, Partnership, LLP, Company/ Trust/ Co-operative Society/ Board

 

आता या ठिकाणी ऑप्शन बी मध्ये तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा म्हणजे आस्थापनेचा प्रकार टाकायचा आहे. म्हणजेच ही भागीदारी कंपनी आहे किंवा स्वतः मालक अशा प्रकारे तुम्हाला खाली निवडायचा आहे.

(C) Name of the members of the employer’s family employed in the establishment

तुमच्या व्यवसायामध्ये काम करत असलेल्या कुटुंबातील व्यक्तींची नावे तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. जसे की सागर- भाऊ, संकेत- मुलगा अशाप्रकारे.

Self Declaration :-

आता वरील प्रमाणे सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन म्हणजेच स्वघोषणापत्र हे वाचून घ्यायचं आहे. आणि मी सहमत आहे. I Agree यावर क्लिक करून सबमिट करायचं आहे. आता तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला एक एप्लीकेशन आयडी दिलेला असेल तो तुम्हाला लिहून घ्यायचा आहे किंवा स्क्रीनशॉट काढायचा आहे. आणि आता ok यावर क्लिक करायचं आहे.

Documents Upload कागदपत्रे अपलोड :-

shop act licence documents list in marathi आता तुम्हाला कागदपत्रे अपलोड (shop act licence documents) करायची आहे. त्या पर्याय वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अपलोड करावयाची सर्व कागदपत्रांची नावे, आणि कागदपत्रे अपलोड करण्याचा फॉरमॅट आणि साईज दिलेली आहे. तिथे दर्शविलेली सर्व कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायची आहे. त्या नंतर Self Decleration स्वघोषणापत्र प्रिंट करून घ्यायचं आहे. (shop act licence self declaration form) त्या नंतर त्यावर शॉप मालकाचे नाव लिहायचे आहे, तसेच तुमची सही तिथे करायची आहे. आता त्याचा pdf बनवायचा आहे. आणि तो अपलोड करायचा आहे. आता तुम्हाला तुमचे आधार कार्ड तुम्हाला अपलोड करायचे आहे. तसेच तुमच्या दुकानाची मराठी पाटी (shop act licence maharashtra)असलेला फोटो अपलोड करायचा आहे, आणि पासपोर्ट आकाराचा फोटो तसेच तुमची सही तुम्हाला अपलोड करायची आहे.

जर तुम्ही सायबर कॅफे चालवत असाल तर तुम्हाला NOC द्यावी लागेल. Other documents मध्ये तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स आणि पॅन कार्ड हे अपलोड करायचे आहे. आता तुम्ही सर्व कागदपत्रे अपलोड केलेली आहे.

आता तुम्ही पुढील प्रक्रियेत, पेमेंट करायचे आहे.

Payment पेमेंट(shop act licence fees)

आता तुम्हाला पेमेंट (shop act licence fees) करायचे आहे. त्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकतात. तसेच चलन च्या माध्यमातून सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकतात.जर तुम्ही ऑनलाईन हा पेमेंट निवडला तर तुम्ही डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड, वॉलेट, नेट बँकिंग हे पर्याय वापरून ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करू शकतात.

हे नक्की वाचा:- आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच CSC सेंटर कसे मिळवायचे?

आता तुम्ही शॉप ऍक्ट लायसन्स ( Shop Act licence Online) काढण्या संबंधित सर्व प्रोसेस पूर्ण केलेली आहे. आता तुम्हाला तुमचा अर्ज डाऊनलोड करायचा आहे.

shop act licence download ( शॉप ऍक्ट लायसन्स डाऊनलोड) :-

आता आपण शॉप ऍक्ट लायसन्स करिता केलेला फॉर्म डाऊनलोड करून घ्यायचा आहे. तिथे उजव्या बाजूला Download Form हा ऑप्शन असेल. त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचा Shop Act licence form डाऊनलोड करून त्याला प्रिंट करून घ्या.  त्यानंतर खाली तुम्हाला Download Intimation Receipt हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचे शॉप ऍक्ट लायसन्स ( Shop Act licence Online Download) करू शकतात.

अश्या प्रकारे आपण शॉप ऍक्ट लायसन्स करिता ऑनलाईन अर्ज करून, ते डाऊनलोड करू शकतो. जर ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा. अश्याच महत्वपूर्ण पोस्ट करिता आमच्या वेबसाईट वर भेट देत चला.

Leave a Comment