महाराष्ट्रात होणार 11 ऑगस्ट रोजी शेतकरी दिन साजरा | Farmers Day will be celebrated in Maharashtra on August 11

 

महाराष्ट्रात होणार 11 ऑगस्ट रोजी शेतकरी दिन साजरा | Farmers Day will be celebrated in Maharashtra on August 11

 

महाराष्ट्र शासनाच्या वतीने 11 ऑगस्ट 2022 रोजी पद्मश्री डॉक्टर विखे पाटील यांच्या स्मरणार्थ “शेतकरी दिन” साजरा करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपल्या महाराष्ट्र राज्य “शेतकरी दिन “साजरा करण्याबाबत नवीन शासन निर्णय सुद्धा निर्गमित केला आहे. महाराष्ट्रात होणार 11 ऑगस्ट रोजी शेतकरी दिन साजरा Farmers Day will be celebrated in Maharashtra on August 11. आपल्या महाराष्ट्र राज्यात 11 ऑगस्ट 2022 रोजी शेतकरी दिन साजरा होत असल्या विषयी जो महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासन निर्णय प्रकाशित केला आहे त्याविषयी संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेत आहोत.

पद्मश्री डॉ. विखे पाटील यांच्या स्मरणार्थ दि. ११ ऑगस्ट, २०२२ रोजी राज्यात “शेतकरी दिन(Shetkari Din) साजरा करण्याबाबत नवीन शासन निर्णय जाहीर.

हे नक्की वाचा:- पोक्रा योजना 2022 अर्ज सुरू

प्रस्तावना :

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचे स्मरणार्थ शासन निर्णय कृषि विभाग क्र.शेदिजा २०१२/प्र.क्र. १५०/३, दि. १६.८.२०१४ अन्वये दि. २९ ऑगस्ट, हा दिवस “शेतकरी दिन” (Farmers Day 2022) म्हणून साजरा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानंतर दरवर्षी हा दिवस मराठी तिथीप्रमाणे शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेतक-यांकरिता केलेल्या कार्याचे स्मरण व्हावे व राज्यातील सर्व शेतक-यांचा सन्मान व्हावा म्हणून सन २०२२ मध्ये दि. ११ ऑगस्ट, २०२२ या नारळी पौर्णिमेच्या दिवशी त्यांचा जन्म दिवस शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यामुळे आता 11 ऑगस्ट 2022 रोजी आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यात शेतकरी दिवस (Shetkari Divas 2022) साजरा करण्यात येणार आहे.  त्याबाबत शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे

हे नक्की वाचा:- लोकशाहीर आण्णाभाऊ साठे कर्ज योजना? अर्ज सुरू

शासन निर्णय :

1. सन २०२२ मध्ये दि. ११ ऑगस्ट, २०२२ (नारळी पोर्णिमा) हा दिवस राज्यात शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

2. सदर कार्यक्रमासाठी कोणताही अतिरीक्त निधी उपलब्ध करुन देता येणार नाही. या कार्यक्रमासाठी कमीत कमी खर्च आयुक्त (कृषि) यांच्या अधिनस्त असलेल्या तरतुदीमधून करावा.

3. शेतकरी दिन साजरा करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना कृषि आयुक्तालयाने निर्गमित कराव्यात.

4. वेबिनार संवाद / मार्गदर्शन वर्ग आयोजित करुन दि. ११ ऑगस्ट, २०२२ रोजी राज्यात शेतकरी दिन साजरा करण्यात यावा.

अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने 11 ऑगस्ट 2022 रोजी पद्मश्री डॉक्टर विखे पाटील यांच्या स्मरणार्थ शेतकरी दिन साजरा होणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने कधी साजरा होणार शेतकरी दिन?

ममहाराष्ट्र शासनाच्या वतीने पद्मश्री डॉक्टर विखे पाटील यांच्या स्मरणार्थ ११ ऑगस्ट 2022 हा दिवस शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

शेतकरी बांधवांविषयीची ही माहिती आवडल्यास इतर शेतकरी बांधवांना देखील शेअर करा. अशीच महत्वपूर्ण माहिती वेळेवर जाणून घेण्याकरिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला. तुम्ही आमच्या टेलिग्राम चैनल ला देखील जॉईन होऊ शकतात.

Leave a Comment