पोक्रा योजना 2022 अर्ज सुरू | POCRA Yojana 2022 application start

पोक्रा योजना 2022 अर्ज सुरू | POCRA Yojana 2022 application start

 

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत(Pocra Yojana 2022 Maharashtra) अंतर्गत पोक्रा योजना ही महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने त्याचप्रमाणे जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना शेतीपूरक व्यवसाय करण्याकरिता आर्थिक सहाय्य पुरविण्यात येत आहे. शेतकरी बांधवांना हवामानात झालेल्या बदलामुळे झालेल्या परिस्थितीत जुळवून घेता आले पाहिजे, या करिता शासनाच्या विविध योजना चा लाभ हा शेतकरी बांधवांना देण्यात येत आहे. या नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना( पोकरा योजना 2022) अंतर्गत अनेक जिल्हे आणि गावांचा समावेश हा करण्यात आला आहे. त्या जिल्हा करिता अर्ज सुरू झाले आहे.

 

पोक्रा योजना 2022 अंतर्गत खालील योजना करिता अर्ज सुरू:-

 

पोक्रा योजना 2022(Pocra Yojana 2022 Maharashtra) नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत लागवड, वृक्ष लागवड, फळबाग लागवड  या घटकासाठी 2022-23 करिता अर्ज सुरू झालेले आहेत. POCRA Yojana 2022-23. या पोक्रा योजना महाराष्ट्र अंतर्गत अर्ज हा सप्टेंबर 2022 अखेरपर्यंत करण्यात येणार आहे. ज्या अर्जदाराची या पोक्रा योजना अंतर्गत निवड होईल. त्यांना पूर्व संमती दिल्या नंतर अर्जदारांनी प्रत्यक्ष लागवड नोव्हेंबर 2022 अखेरपर्यंत पुर्ण करणे आवश्यक आहे. ज्या अर्जदाराची या योजने अंतर्गत निवड होईल त्या शेतकऱ्यांनी हमीपत्र लिहुन देणे गरजेचे आहे.

हे नक्की वाचा:- पोक्रा योजना काय आहे? अंतर्गत कोणकोणत्या योजनांचा लाभ आपण मिळवू शकतो?

 

पोक्रा योजना 2022 अर्ज प्रक्रिया( Pocra Yojana 2022 Application Process ) :-

ज्या शेतकरी बांधवांना नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (Pocra Yojana 2022) अंतर्गत फळबाग लागवड, बांबू लागवड व वृक्ष लागवड या घटकांचा लाभ घेण्याकरिता अर्ज करायचा असेल अशा शेतकरी बांधवांनी पोखरा योजनेच्या खालील संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करून अर्ज करायचा आहे.

http://dbt.mahapocra.gov.in

वरील वेबसाईट वर शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.

हे नक्की वाचा:- ट्रॅक्टर अनुदान योजना 2022 महाराष्ट्र अर्ज सुरू

पोखरा योजना 2022 कागदपत्रे (Pocra Yojana Maharashtra Documents) :-

पोखरा योजना अंतर्गत नोंदणी करण्याकरता खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहेत.

1. आधार कार्ड
2. सातबारा आणि आठ अ उतारा
3. मोबाईल क्रमांक (चालू असणारा)
4. अर्जदार हा अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्यास जात प्रमाणपत्र
5. दिव्यांग प्रमाणपत्र (असल्यास)

वरील कागदपत्रे असल्यास आपण पोक्रा योजना 2022 अंतर्गत फळबाग लागवड, बांबू लागवड व वृक्ष लागवड अर्ज करून लाभ घेऊ शकतात. जर तुम्हाला या योजनेविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर संबंधीत कृषि सहाय्यक किंवा समुह सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा.

POCRA योजना विषयीची ही माहिती आवडल्यास इतरांना शेअर करा. अश्याच महत्वपूर्ण पोस्ट करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.

Leave a Comment