सोलर पंप योजना महाराष्ट्र नवीन मंजुरी आली | Solar pump anudan yojana Maharashtra

 

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात सोलर पंप अनुदान योजना 2022 राबविण्यासाठी नवीन मंजुरी मिळालेली आहे. आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने नवीन सोलर पंप योजना राबविण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. 07 एप्रिल 2022 रोजी आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक नवीन शासन निर्णय घेऊन सोलर पंप योजना 2022 ही १०० टक्के अनुदानावर राबविण्यात मंजुरी दिलेली आहे. Solar pump yojna Maharashtra

 

सोलर पंप योजना महाराष्ट्र नवीन मंजुरी आली | Solar pump anudan yojana Maharashtra
सोलर पंप योजना महाराष्ट्र नवीन मंजुरी आली | Solar pump anudan yojana Maharashtra

 

 

या पूर्वी सुद्धा महाराष्ट्र शासनाने राज्यातील वनपट्टे धारक जमातीच्या लाभार्थ्यांना करता 100 टक्के अनुदानावर सोलर पंप योजना राबविण्यासाठी मंजुरी ही दिलेली आहे. या योजने मध्ये नवीन विहीर अनुदान योजना करिता सुद्धा १०० टक्के अनुदान हे देण्यात येणार आहे.Solar Pump Yojana

 

हे सुद्धा वाचा:- ड्रॅगन फ्रुट लागवड अनुदान योजना

 

नवीन शासन निर्णयानुसार आता आता ही सोलर पंप योजना (Solar Pump Yojana Maharashtra 2022) ही आता संपूर्ण राज्यात सुरु करण्यात आलेली आहे. त्याच प्रमाणे नवीन विहीर योजना सुद्धा आता १००% अनुदानावर राबविण्यात येत आहे. सोलर पंप योजना करिता ३,२५,००० रुपये  अनुदान राबविण्यात येणार आहे त्याच प्रमाणे नवीन विहीर साठी ३,००,००० रुपये अशा प्रमाणामध्ये हा  निधी खर्च केला जाणार आहे.

 

 

सोलर पंप योजना तसेच नवीन विहीर योजना उद्देश:-

नवीन विहीर योजना, तसेच सोलर योजना आदिवासी जमातीतील शेतकऱ्यांना पुरवून या शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे. शाश्वत कृषी सुविधा उपलब्ध करून देणे. त्यामुळे आदिवासी जमातीतील शेतकऱ्यांना समृद्ध बनविणे.

 

हे नक्की वाचा:- ओबीसी कर्ज योजना महाराष्ट्र

 

या योजने करिता 18 कोटी रुपये इतका निधी हा मंजूर करून ही योजना राबविण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. या नवीन सोलर पंप योजना तसेच नवीन विहीर योजना आणि बोअरवेल योजना करिता 18 कोटी रुपये मंजूर झाले. ही योजना एक वर्ष करिता राबविण्यात येत आहे. तसेच आता ही योजना संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत आहे.

 

या योजनेच्या अंमबजावणीसाठी  संबंधित प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प करणार आहे.  या योजने अंतर्गत ज्या लाभार्थ्यांची निवड होईल अशा निवड झालेल्या लाभार्थ्यांना सोलर पंपाची खरेदी ही आयुक्तालय स्तरावरून करण्यात येणार आहेत. म्हणजेच सोलर पंप शासन खरेदी करून देईल.

 

 

कागदपत्रे:-

१) जातीचा दाखला (cast certificate)

२) रहिवासी दाखला (Resident certificate)

३) वन पट्टा प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र

४) भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या प्रमाणपत्र

५) किमान जमीन क्षेत्र दाखला जोडावा

 

हे नक्की वाचा:- ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र 2022

 

प्राधान्य:-

या योजने अंतर्गत विधवा महिलांना तसेच अपंग शेतकरी बांधवांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.

 

 

अर्ज प्रक्रिया आणि लाभार्थी निवड:-

या योजने अंतर्गत अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने राहणार आहेत. संबंधित प्रकल्प अधिकारी हे योजने करिता अर्ज करण्याचे आवाहन हे वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती प्रसिद्ध करून करतील. त्यावेळेस या योजने करिता अर्जदार अर्ज करू शकतात.अर्ज प्राप्त झाल्या नंतर अर्जाची छाननी करण्यात येईल. त्यानंतर जर अर्ज जास्त प्राप्त झालेले असल्यास लॉटरी काढून लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.

 

अश्या प्रकारे वनपट्टे धारक आदिवासी जमातीतील शेतकऱ्यांना सोलर पंप योजना, नवीन विहीर योजना आणि  बोअरवेल योजना चा लाभ मिळवून देण्यासाठी नवीन शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आलेली आहे. या योजने करिता १८ किती रुपये इतका निधी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

 

अशीच महत्वपूर्ण माहिती वेळेवर मिळविण्यासाठी आमच्या teligram चॅनल ला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

Leave a Comment