प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना माहिती |pradhan mantri matru vandana yojana 2022

 

आजच्या या लेखामध्ये आपण प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY) या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत गरोदर महिलांना पहिल्या बाळत पणासाठी 5000 रुपयाचे अर्थसहाय्य दिले जाते. ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना केंद्र सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालय अंतर्गत राबविण्यात येत आहे. या योजने मध्ये केंद्र तसेच राज्य सरकार यांच्या एकत्रितपणे राबविली जाते.pradhan mantri matru vandana yojana 2022

 

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना माहिती |pradhan mantri matru vandana yojana 2022
प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना माहिती |pradhan mantri matru vandana yojana 2022

 

 

Pradhan Mantri Matru Vandana Yojana चा उद्देश हा आपल्या भारत देशातील मातांचे व बालकांचे आरोग्य हे निरोगी व सुदृढ राहावे या उद्देशाने राबविण्यात येत आहेत. आपल्या महाराष्ट्र राज्यात ही योजना आपल्या महाराष्ट्र सरकारने दिनांक 21/11/2017 ला राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देऊन तेव्हा पासून राबविण्यात येत आहे. गरोदर मातांना आर्थिक मदत पुरविणारी ही एक महत्वपूर्ण योजना आहे.

 

हे नक्की वाचा:- विलासराव देशमुख अभय योजना संपूर्ण माहिती

 

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना मध्ये राज्य शासनातर्फे ४०% हिस्सा तर उर्वरित केंद्र शासनाचा ६०% इतका हिस्सा असतो. pradhan mantri matru vandana yojana information in Marathi

 

 

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना उद्देश(purpose of Pradhan Mantri Matru Vandana Yojana) :-

 

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना ही गर्भवती व स्तनदा मातेला आर्थिक स्थैर्य पुरवणारी एक महत्त्वपूर्ण अशी योजना आहे. गर्भवती व स्तनदा महीलेला सकस तसेच पोषक आहार मिळाला पाहिजे. तसेच गर्भवती महिलेचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे. आरोग्य निरोगी राहिले पाहिजे त्यामुळे येणाऱ्या नवजात बालकांची आरोग्य चांगले राहील यासाठी महिलांना या योजने अंतर्गत लाभ देण्यात येत असतो. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना केंद्र सरकारने 1 जानेवारी 2017 पासून सुरू केली आहे. ही योजना राज्यात सुद्धा सुरू आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत तसेच केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचना प्रमाणे ही योजना राज्यात सुरु आहे.प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना 2022 ( Pradhan mantri Matru Vandana Yojana information in Marathi )

 

हे नक्की वाचा:- ड्रॅगन फ्रूट लागवड अनुदान योजना

 

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना नोंदणी प्रक्रिया:-

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना साठी अर्ज करण्याची प्रक्रिया आहे ऑनलाइन पद्धतीने आहे. लाभार्थी स्वतः ऑनलाइन पद्धतीने स्वतःचे नाव नोंदणी करू शकतात.Pradhan mantri Matru Vandana Yojana online application

 

 

ऑनलाइन पद्धतीने नाव नोंदणी करण्यासाठी सर्व प्रथम लाभार्थ्याला www.Pmmvy-cas.nic.in या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचा आहे. प्रधानमंत्री मातृत्व योजना साठी नाव नोंदणी ऑनलाइन पद्धतीने असल्यामुळे आपण घरबसल्या अगदी सहजपणे या योजनेसाठी नाव नोंदणी करू शकतो. information of pradhanmantri matrutva vandana yojana

 

हे सुद्धा वाचा:- मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना

 

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना कागदपत्रे documents for pradhanmantri matrutva vandana yojana:-

माता व बाल संरक्षण प्रमाणपत्र (MCP Card) व आधार संलग्न बँक/पोस्ट खात्याची माहिती देणे आवश्यक असेल.

 

आधार कार्ड / बँक तथा पोस्ट खाते नसल्यास सदर कार्ड व खाते काढण्यासाठी अंगणवाडी सेविका / ए.एन.एम.या मदत करतील.

 

हे नक्की वाचा:- प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण घरकुल यादी जाहीर 2022

 

केंद्र तसेच राज्य सरकार यांच्या समन्वयाने आपल्या महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येणारी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही एक महत्त्वपूर्ण अशी योजना आहे. त्यामुळे आपल्या राज्यातील गरोदर महिलांनी या योजनेचा लाभ नक्की घ्यावा. या योजने विषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही अंगणवाडी सेविका तसेच ए.एन.एम यांच्याशी संपर्क करून अधिक माहिती मिळवू शकता. तसेच योजनेविषयी अर्ज करताना काही अडचण आल्यास तुमची मदत सुद्धा करण्यात येईल.

 

अशीच महत्वपूर्ण माहिती वेळेवर मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चैनल ला जैन होण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

Leave a Comment