एकूण ३८ कोटी रुपयांचा खरीप पीक विमा २०२१ या जिल्ह्यासाठी मंजूर

 

 

शेतकरी बांधवांना त्यांच्या शेत पिकांचे संरक्षण करण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना ही राबविण्यात येत असते. या प्रधान मंत्री पीक विमा योजना अंतर्गत शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी सुरुवातीला पिकांची लागवड केल्या नंतर विमा कंपनी कडे पीक विमा ची शेतकऱ्यांच्या हिश्यावर येणारा प्रीमियम हा भरावा लागतो. त्यानंतर केंद्र आणि राज्य सरकार त्यांच्या वाटेवर येणारी पीक विमा रक्कम विमा कंपनीस देत असते.

 

एकूण ३८ कोटी रुपयांचा खरीप पीक विमा २०२१ या जिल्ह्यासाठी मंजूर

 

 

 

शेतकऱ्याने पीक विमा काढल्या नंतर त्यांना पीक विमा पावती तसेच पीक विमा भरल्याचा receipt number हा देण्यात येत असतो. जर शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाल्यास या नंबर च्या साहाय्याने शेतकऱ्यास पीक विमा क्लेम करायचा असतो. आणि पीक विमा क्लेम केल्या नंतर शेतकऱ्यास पीक विमा नुकसान भरपाई देण्यात येत असते.

 

हे नक्की वाचा:- पीक विम्याचे ३८,००० रुपये खात्यात पडण्यास सुरुवात

 

अतिवृष्टी नुकसान भरपाई २०२१ च्या सर्व जिल्ह्याच्या पीक विमा याद्या ह्या प्रकाशित झालेल्या आहेत. Nuksan Bharpai Yadi २०२१ Maharashtra, pik vima manjur jilhe

 

 

परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आणखीन ३८ कोटी ५१ लाख ७ हजार रुपये इतकी पीक विमा नुकसान भरपाई ही आता मंजूर  करण्यात आलेली आहे. कृषी विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परभणी जिल्ह्यातील एकूण पीक विमा योजना अंतर्गत लाभार्थी शेतक-यांची संख्या ही ३ लाख ८२ हजार ९८५ इतकी आहेत. आता पर्यंत परभणी जिल्ह्यातील इतक्या शेतकरी बांधवांना लाभ मिळाला आहे, एकूण विमा परतावा रक्कम ही आता ३१० कोटी ५१ लाख ७ हजार रुपये झाली आहे,

 

हे नक्की वाचा:- पीक विमा तक्रार निवारण कसे करायचे? 

 

या वर्षी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टी झाली होती, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप जास्त प्रमाणात नुकसान झाले होते. परभणी जिल्हा साठी रिलायन्स विमा कंपनी ही आहे. आणि या कंपनी कडे एकूण ४ लाख १० हजार ४४९ पीक विमा क्लेम विविध माध्यमांतून रिलायन्स विमा कंपनीकडे सादर केल्या होत्या. ज्या लोकांनी पीक विमा नुकसानीचा क्लेम केला होता त्यापैकी २७ हजार ४६४ इतके पीक विमा क्लेम हे अपात्र ठरले आहेत. डिसेंबर महिन्यात पहिला टप्पा हा देण्यात आला होता त्या पहिल्या टप्प्यात ३ लाख ५१ हजार १६० शेतकऱ्यांना २७२ कोटींचा विमा परतावा हा मंजूर करण्यात आला होता. आणि आणखी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एकूण ३८ कोटी रुपयांचा खरीप पीक विमा हा मंजूर करण्यात आला होता.

 

 

 

 

Leave a Comment