26 जानेवारी 2022 देशाचा 73 वा प्रजासत्ताक दिन! Republic Day 2022; इतिहास आणि महत्व

 


आपल्या भारत देशात यावर्षी २६ जानेवारी २०२२ रोजी 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा होणार आहे. आपण सर्व भारतीय मिळून प्रजासत्ताक दीन मोठ्या संख्येने एकत्र येऊन उत्साहात साजरा करत असतो. या प्रजासत्ताक दिनाचे खास महत्व आहे. आपण 'प्रजासत्ताक दिन' प्रत्येक वर्षी २६ जानेवारी ला साजरा करीत असतो. आपल्या भारत देशाला ब्रिटिशांपासून 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र मिळाले होते. परंतु आपल्या देशाची राज्यघटना ही त्यावेळेस अमलात नव्हती. ती 26 जानेवारी 1950 रोजी प्रजासत्ताक दिन' म्हणून साजरा केला जातो. यादिवशी राज्य घटना आपल्या देशाला मिळून स्वतःचे संविधान हे लागू झाले होते. Republic Day 2022, 26 जानेवारी 2022


26 जानेवारी 2022 देशाचा 73 वा प्रजासत्ताक दिन! Republic Day 2022; इतिहास आणि महत्व26 जानेवारी 1950 च्या आधी आपल्या देशात संविधान अमलात नसल्यामुळे त्यावेळी भारतीय राज्य कारभार हा ब्रिटिशांच्या 1935 सालच्या कायद्यावर (कलमावर)य आधारित होते. त्या नंतर भारत देशाचे स्वतःचे संविधान अमलात आले व आता आपण हा २६ जानेवारी हा दिवस दरवर्षी 'प्रजासत्ताक दिन' म्हणून साजरा करत असतो.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसुदा समिती स्थापना केली गेली. त्यानंतर या मसुदा समितीत ३०८ सदस्य होते. यांनी ) 24 जानेवारी 1950 रोजी भारतीय तयार केलेल्या मसुदा वर सह्या केल्या होत्या. व आपल्या भारत देशाची राज्यघटना खऱ्या अर्थाने अमलात आणली होती. भारतीय राज्यघटना लीहताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तसेच या मसुदा समितीतील सदस्य यांनी खूप मेहनत घेतली होती. अनेक देशाच्या घटनेचा आधार आपली घटना तयार करण्यासाठी घेण्यात आला होता. २६ जानेवारी रोजी आपले तयार केलेले संविधान हे संपूर्ण भारत देशामध्ये लागू करण्यात आले होते. त्यामुळे भारतीय संविधान बनवून ते या दिवशी लागू केल्याच्या निमित्तानं हा २६ जानेवारी हा दिवस दरवर्षी आपल्या भारत देशाचा 'प्रजासत्ताक दिन' म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. Republic day 2022, २६ जानेवारी २०२२ इतिहास महत्व भाषण, , २६ जानेवारी २०२२ भाषण, प्रजासत्ताक दिन माहिती मराठी


हे नक्की वाचा:- १५ ऑगस्ट माहिती मराठी मध्ये


 'प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो'?

आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये प्रजासत्ताक 'प्रजासत्ताक दिन' हा आपण २६ जानेवारी रोजी दरवर्षी मोठ्या आनंदाने साजरा करीत असतो. 'प्रजासत्ताक दिन' आपण प्रत्येक वर्षी साजरा करतो कारण आपल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान हे आपल्या देशाने 26 जानेवारी 1950 या दिवशी स्वीकार करण्यात आले होते. या दिवशी आपला भारत देश खऱ्या अर्थाने लोकशाही असलेला देश बनला होता. प्रजेची सत्ता खऱ्या अर्थाने या दिवशी भारतीय संविधान च्या रूपाने आलेली होती. प्रजासत्ताक दिन हा भारतीय संविधान व भारतीय संविधान चे महत्व पटवून देतो. आणि याच २६ जानेवारी ला हे अमलात असल्यामुळे आपण दरवर्षी प्रजासत्ताक दिन' मोठ्या उत्साहात साजरा करतो.'Republic Day 2022' हा दिवस सर्वांनी मोठ्या उत्साहात साजरा केला पाहिजे. प्रत्येकाने झेंडा वंदन करून आपल्या 'प्रजासत्ताक दिन' साजरा केला पाहिजे. 

'प्रजासत्ताक दिन' चिरायू होवो......


मित्रानो जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा. आणि वरील लेखामध्ये जर काही चुका झाल्या असे वाटत असेल तर नक्की कमेंट करा आम्ही त्या मध्ये बदल करू.

तुम्हा सर्वांना ' प्रजासत्ताक दिनाच्या' हार्दिक शुभेच्छा..... धन्यवाद


Post a Comment

Have any doubt let me know

थोडे नवीन जरा जुने