MAHADBT Lottery 2022 Farmer Scheme Documents Upload Process महा डी.बी.टी. कागदपत्रे अपलोड

MAHADBT Lottery 2022 Farmer Scheme Documents Upload Process महा डी.बी.टी. कागदपत्रे अपलोड महा-डीबीटी maha dbt योजनांची Farmer योजना करिता ज्या लाभार्थ्यांची लॉटरी पद्धतीने निवड झाली आहे त्यांना कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.(maha dbt yojna lottery)

 

महा डी बी टी maha dbt maha it योजनांचे उद्दिष्ट हे लाभार्थ्यांना एकाच पोर्टल वरून सर्व योजनांचा लाभ घेता यावा या साठी आहे.आणि या mahadbt योजनांमध्ये अनेक नागरिकांनी विविध योजनांसाठी अर्ज केले होते.त्यापैकी २ लाख शेतकऱ्यांची पहिल्या लॉटरी मध्ये निवड झाली आहे.ज्या लाभार्थ्यांची निवड झाली आहे अशा लाभार्थ्यांना त्यांच्या रजिस्टर मोबाईल वर sms पाठवण्यात आले आहे.maha dbt Farmer Scheme Documents upload

 

MAHADBT Lottery 2021 Farmer Scheme Documents Upload Process महा डी.बी.टी. कागदपत्रे अपलोड maha dbt maha it Farmer Scheme Documents upload
Maha dbt maha it Farmer Scheme Documents upload

 

 

या महा-डीबीटी पोर्टल वर शेतकरी योजना या ऑप्शन मध्ये शेतकऱ्यांच्या सोयी करिता सर्व योजनांचा लाभ हा एकाच अर्जाद्वारे देण्याच्या उद्देशाने अर्ज करण्यापासून ते शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत संगणकीय प्रणाली ही विकसित करण्यात आली आहे.आणि या पोर्टल वर शेतकऱ्यांना त्यांच्या मनाने योजना निवडता येते.योजने विषयी कोणतेही बंधने नाहीत.(maha dbt farmer’s scheme)

 

त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना शेती शी निगडीत विविध बाबींकरिता उदा . कृषी यांत्रिकीकरण ,ठिबक संच, तुषार संच, फळबाग लागवड, शेडनेट उभारणी यासारखे विविध अर्ज करण्यात येत असून केले गेले आहेत.

 

त्या नुसार ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केला होता त्यांची लॉटरी पद्धतीने सोडत करण्यात आली आहे.आणि अशा शेतकऱ्यांना संदेश सुद्धा प्राप्त झाले आहे. अशा शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या CSC सेंटरशी संपर्क साधून आपले विहित नमुन्यातील कागदपत्रे अपलोड करून घ्यावेत किंवा MahaDBT Farmer ऍप मध्ये इंस्टाल करून त्यामध्ये अपलोड करा

 

MAHA DBT Farmer scheme How to Upload Documents(कागदपत्रे अपलोड कशी करावी):-

 

महा डी बी टी योजना मार्फत  राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची  लॉटरी काढण्यात आली आहे आणि या योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे त्यांनी  कागदपत्रेे अपलोड सादर करणे आवश्यक आहे. सदर कागदपत्रेे वेबसाईट वर अपलोड करायची आहेत.

 

महा-डीबीटी – लॉटरी मध्ये निवड झाल्यानंतर सदर अर्जदार शेतक-यांनी करावयाची कामे

१.कृषि विभागाच्या योजनांच्या ऑनलाईन सोडतीत आपली निवड झाली असुन अधिक तपशीलासाठी व विहीत कालावधीत कागदपत्रे अपलोड करणेसाठी महा-डीबीटी पोर्टलवर लॉगीन करावे.

 

२.ज्या शेतक-यांना त्यांचे नोंदणीकृत मोबाईलवर वरीलप्रमाणे लघु संदेश (SMS) मिळाला आहे, अशा शेतक-यांनी खालील प्रमाणे कार्यवाही करावी.

 

३. https://mahadbtmahait.gov.in/ हे संकेतस्थळ उघडावे.

 

४. या संकेतस्थळावर शेतकरी योजना या पर्यायावर क्लिक करावे.

 

५. त्यानंतर वापरकर्ता आयडी या पर्यायावर क्लिक करावे.

 

६. वापरकर्ता आयडी वर क्लिक केल्यानंतर वापरकर्ता आयडी, पासवर्ड व त्याखाली प्रतिमेत दर्शविलेले शब्द भरुन लॉग इन करा या वर क्लिक करा.

 

७. मुख्य मेनुमधील मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायावर क्लिक करा.

 

८. त्यानंतर त्याच पोर्टल वर छाननी अंतर्गत अर्ज हा पर्याय दिसेल तुम्हाला त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्ही केलेल्या सर्व अर्जाची स्थिती दिसेल. आणि त्या मध्ये Upload Document For Under Scrutiny असा ऑप्शन  ज्या घटकासमोर असेल त्या घटकासाठी लॉटरीद्वारे आपली निवड झाली आहे, असे समजावे. तुम्हाला त्या योजनेसाठी documents अपलोड करायचे आहे.

 

९. मुख्य मेनुमधील कागदपत्रे अपलोड करा या पर्यायावर क्लिक करा.

 

१०. त्यानंतर वैयक्तिक कागदपत्रे या पर्यायावर क्लिक केल्यानंतर दर्शविलेल्या स्क्रीनवरील कागदपत्रे अपलोड करा या पर्यायावर क्लिक करा.

 

११.कागदपत्रे अपलोड करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर कागदपत्रे अपलोड स्क्रीन दिसेल त्यात नमुद केलेली विहीत कागदपत्रे १५ केबी ते ५०० केबी या आकारमानातच अपलोड करुन जतन करा या पर्यायावर क्लिक करा.maha dbt 

 

Maha dbt documents upload process MAHADBT Lottery 2021 Farmer Scheme Documents Upload Process महा डी.बी.टी. कागदपत्रे अपलोड
महा डी.बी.टी. कागदपत्रे अपलोड करणे

 

 

 

आपण Maha Dbt Farmers Scheme अंतर्गत ज्या योजनेसाठी फर्म भरला असेल त्या योजनेनुसार कागदपत्रे सादर करावी लागतील यामध्ये आपला 7/12, 8 अ अश्या पद्धतीने कागदपत्रे सादर करावी लागतील

 

 

शरद पवार ग्राम समृद्धी योजना सुरू असा करा अर्ज 

 

आवश्यक कागदपत्रे:-

१)सात बारा,(तुम्ही वेबसाईट वर रजिस्ट्रेशन करतेवेळी जो अपलोड केलता तो)

२)8 अ,(तुम्ही वेबसाईट वर रजिस्ट्रेशन करतेवेळी जो अपलोड केलता तो)

३)आधार कार्ड,(Adhar Card)

४)बँक पासबुक(Bank Passbook)

५)कोटेशन,

इत्यादी कागदपत्रे लागतात.

शेतकरी योजना महाराष्ट्र

 

वरील सर्व कागदपत्रे योजनांनुसार तुम्हाला अपलोड करायची आहे.तुम्हाला जी योजना लॉटरी पद्धतीने मिळाली असेल त्या योजनेनुसार तुम्हाला कागदपत्रे अपलोड करायची आहे.त्यामधे सातबारा आणि ८अ हे प्रत्येक योजनेसाठी अनिवार्य असेल.

वेबसाईट

https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login या पोर्टल वर User id आणि Password च्या साहाय्याने अपलोड करावीत.

 

आवश्यक कादगपत्रे upload केल्यानंतर पूर्वसंमंती ची प्रक्रिया पार पडणार आहेत. पोर्टलवरील प्राप्त अर्जाची ऑनलाईन लॉटरी,साठी लागणारी सर्व कादगपत्रे वेबसाईट वर अपलोड केल्या नंतरच ऑनलाईन पद्धतीने पुर्व संमती मिळणार.

 

वरील सर्व बाबी पूर्ण केल्या नंतर मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट अनुदान वितरण करणे इत्यादी सर्व प्रक्रिया ऑनलाईन च होणार आहे.

 

कागदपत्रे अपलोड फॉरमॅट:-

15 kb ते 500 kb size असेल फॉरमॅट हा jpg, jpeg किंवा pdf असावा.

 

 

महाडीबीटी अंतर्गत शेतकरी बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ हा एकाच पोर्टलच्या माध्यमातून देण्यात येत आहे. ज्यावेळी एखादा व्यक्ती किंवा नागरिक महाडीबीटी पोर्टलवर एखाद्या योजनेसाठी अर्ज करतो, त्यानंतर केल्यानंतर त्याचा अर्ज सबमिट होतो. महाडीबीटी शेतकरी योजनांची निवड पद्धतीने लॉटरी पद्धतीने होती. त्यानंतर महाडीबीटीची शेतकरी लॉटरी लागल्यानंतर संबंधित पदार्थांना कागदपत्रे अपलोड करायची असते. त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होते.

हे सुध्दा वाचा:- महा डी.बी.टी योजनांची लॉटरी लागली संपूर्ण माहिती वाचा 

 

मित्रांनो जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा

 

Leave a Comment