शरद पवार ग्राम समृद्धी योजना सुरू असा करा अर्ज डाऊनलोड

 शरद पवार ग्राम समृद्धी योजना सुरू असा करा अर्ज डाऊनलोड शरद पवार ग्राम समृद्धी योजना (sharad pawar gram samridhi yojana application form) – ग्रामपंचायत स्तरावर राबवण्यास सुरवात झाली आहे. सुरुवातीला ही योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या नावाने होती आता या योजनेत बदल करून नवीन शरद पवार ग्राम समृद्धी योजना या नावाने राबविण्यात येत आहे.आणि आता ही sharad pawar gram Samruddhi योजना सुरू झाली आहे.

शरद पवार ग्राम समृद्धी योजना सुरू असा करा अर्ज डाऊनलोड
शरद पवार ग्राम समृद्धी योजना सुरू असा करा अर्ज डाऊनलोड इच्छुक व्यक्तींनी आपल्या गावातील ग्रामपंचायत/पंचायत समितिच्या संपर्कात राहून या योजनेचा लाभ घ्यावा. या लेखा मध्ये शेवटी आपण अर्ज दिला आहे तो तुम्ही डाऊनलोड करून घ्या.

 

 शरद पवार ग्रामसमृद्धी योजना - ग्रामपंचायत स्तरावर राबवण्यास सुरवात: या योजने मध्ये


✅ या योजने मध्ये चार वैयक्तिक लाभाच्या योजनांचा समावेश:


🎯 *गाय व म्हैस याकरिता पक्का गोठा बांधणे:* 


📌 अकुशल खर्च - रु. 6,188/- (प्रमाण 8 टक्के )

📌 कुशल खर्च - रु.71,000/- (प्रमाण 92 टक्के )

📌 एकूण - रु.77,188/- (प्रमाण 100 टक्के )


🎯 *शेळीपालन शेड बांधणे:*


📌 अकुशल खर्च - रु. 4,284/- (प्रमाण 8 टक्के)

📌 कुशल खर्च - रु.45,000/- (प्रमाण 92 टक्के)

📌 एकूण - रु.49,284/- (प्रमाण 100 टक्के)


🎯 *कुक्कुटपालन शेड बांधणे:*


📌 अकुशल खर्च - रु. 4,760/- (प्रमाण 10 टक्के)

📌 कुशल खर्च - रु.45,000/- (प्रमाण 90 टक्के)

📌 एकूण - रु.49,760/- (प्रमाण 100 टक्के)


🎯 *भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग:*


📌 अकुशल खर्च - रु. 4,046/- (प्रमाण 38 टक्के)

📌 कुशल खर्च - रु. 6,491/- (प्रमाण 62 टक्के)

📌 एकूण - रु.10,537/- (प्रमाण 100 टक्के


Yojana Form Download

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून ‘शरद पवार ग्रामसमृद्धी योजना (Sharad Pawar Gram Samridhi) ‘ राबविण्याचा शासन निर्णय 3 फेब्रुवारी २०२१ रोजी घेण्यात आला आहे.व ही योजना आता संपूर्ण महाराष्ट्रात ग्राम पंचायत पातळीवर राबवण्यात येणार आहे.असे शासन निर्णयात सांगण्यात आले आहे.

मंत्री मंडळ बैठकी मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्याला वैयक्तिक व सार्वजनिक कामे हाती घेऊन त्याद्वारे कायमस्वरुपी मत्ता निर्माण करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे व कामाअभावी होणारे स्थलांतर थांबविणे हा या योजनेचा उद्देश ठरविण्यात आला आहे.


या कामांसाठी आवश्यक असणारे ६०:४० अकुशल-कुशल कामगारांचे प्रमाण संतुलित राहण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या विविध योजनांच्या जसे की, शेततळे, वृक्ष लागवड, शोषखड्डे, फळबाग लागवड, इ. अकुशल खर्चाचे प्रमाण जास्त असलेल्या योजनांच्या संयोजनातून या बाबी दिल्याने प्रत्येक शेतकरी आता समृद्ध होतील, असा या योजनेचा उद्देश ठरविण्यात आला आहे. 

सन २०२२ पर्यंत सर्व शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून व प्रत्येक ग्रामपंचायत व त्या ग्रामपंचायतीतील घटक गावे समृद्ध होतील हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही योजना राबविण्यात येणार आहे. ही योजना नेमकी कशी आहे या विषयी सविस्तर माहिती पाहूया. ग्रामीण भागातील जीवन मान उंचवनारी ही एक महत्वपूर्ण शासकीय योजना आहे sharad pawar Gram samruddhi yojana maharashtra


या शरद पवार ग्राम समृद्धी योजनेच्या माध्यमातून ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध’ या ध्येयासाठी चार वैयक्तिक लाभाच्या योजना शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेत राबविण्यात येणार आहे.चार योजनांचा समावेश या योजनेत आहे.या योजनेच्या नावा- मध्येच गाव समृद्ध असे नमूद केलेले आहे, त्यामूळे ही योजना गाव समृद्ध करणारी ठरणार आहे.

त्यामध्ये प्रत्येक लाभार्थीला गाय व म्हैस यांच्या करिता पक्का गोठा बांधणे, शेळीपालन करिता शेड बांधणे, कुक्कुटपालन साठी शेड बांधणे तसेच भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग या चार वैयक्तिक कामांच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्यात येणार आहे.(Sharad Pawar Yojana)ग्रामीण भागातील पात्र असलेल्या लाभार्थ्याला वैयक्तिक व सार्वजनिक कामे हाती घेऊन त्याद्वारे कायमस्वरुपी मत्ता निर्माण करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे व कामाअभावी होणारे स्थलांतर थांबविणे हा या योजनेचा उद्देश आहे.(how to apply for sharad Pawar Gram samrudhi yojana in Marathi)

एकंदरीतच ही योजना ग्रामीण भागातील लोकांना लखपती बनविणार असे या मध्ये नमूद केलेले आहे.ग्रामीण भागामध्ये ही योजना महत्वपूर्ण ठरणार आहे.
🔴शरद पवार ग्राम समृद्धी योजना अर्ज डाऊनलोड करा - download

🔴 या योजनेचा GR पहा- download  


हे सुध्दा वाचा:- कृषी यांत्रिकीकरण योजना
मित्रानो शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना करिता अर्ज करू शकतात. तसेच या योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज सुरू झालेले आहेत.शरद पवार ग्राम समृद्धी योजना अर्ज लिंक या पोस्ट मध्ये दिलेली आहे.shard pawar gram samruddhi yojana information in Marathiही माहिती आवडल्यास नक्की शेअर करा. या प्रकारच्या महत्वपूर्ण माहिती करिता आमच्या वेबसाईट वर भेट देत चला.

1 टिप्पण्या

Have any doubt let me know

टिप्पणी पोस्ट करा

Have any doubt let me know

थोडे नवीन जरा जुने