mahadbt Lottery 2022 २ लाख शेतकऱ्यांची निवड

mahadbt Lottery 2022 २ लाख शेतकऱ्यांची निवड महा डी.बी.टी ची सोडत लॉटरी ही लागलेली आहे. महा डी बी टी मध्ये सण २०२०-२१ मध्ये एक शेतकरी एक अर्ज या पद्धतीनुसार अर्ज हे मागविण्यात आले होते.आणि शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ एकच पोर्टल वरून घेण्याची सोय maha dbt च्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे.त्याद्वारे राज्यातील २ लाख शेतकऱ्यांची पारदर्शकपणे निवड करण्यात आली आहे.

 

Maha dbt Lottery Result 2021 Farmer “mahadbt Lottery 2021” mahadbt Lottery 2021 २ लाख शेतकऱ्यांची निवड
Mahadbt lottery

 

 

Maha dbt Lottery Result 2021 Farmer

“mahadbt Lottery 2022″

या मध्ये यांत्रिकीकरण, सूक्ष्मसिंचन, विशेष घटक योजना, नविन विहीरी व फलोत्पादनाच्या विविध बाबींसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. अशी माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. ज्यांची या योजनेमध्ये लॉटरी पद्धतीने निवड झाली आहे त्यांना त्यांच्या रजिस्टर मोबाईल वर sms द्वारे माहिती देण्यात येणार आहे.

 

तसेच यापूर्वी कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना योजनांसाठी वेगवेगळे अर्ज हे करावे लागत होते.

 

तसेच अर्ज केलेल्या आर्थिक वर्षात जर लाभार्थ्यांना त्या योजनेचा लाभ मिळाला नाही तर पुढील आर्थिक वर्षात पुन्हा अर्ज करावा लागत असे त्याचबरोबर प्रत्येक अर्जासोबत कागदपत्रेही स्वतंत्रपणे जोडावे लागत असे.

 

नवीन विहिरी साठी अर्ज करा पोक्रा अंतर्गत

 

परंतु आता ही बाब लक्षात घेऊन कृषि विभागाच्या सर्व योजनांसाठी एकच अर्ज करण्या ची सोय उपलब्ध करून देऊन “Mahadbt” ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

 

म्हणून आता शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतः च्या घरूनच अर्ज करण्याची सुविधा करण्यात आली त्याच प्रमाणे आवश्यक कागदपत्रे एकदाच अपलोड करायची आहे प्रत्येक योजनेसाठी स्वतंत्रपणे कागदपत्रे सादर करण्याची गरज राहली नाही.

 

जर शेतकऱ्यांना या आर्थिक वर्षात लाभ मिळाला नाही तर पुढील आर्थिक वर्षात शेतकऱ्यास नवीन अर्ज करण्याची गरज नाही.

 

मागील वर्षाचा शेतकऱ्याचा जो अर्ज आहे तोच अर्ज पुढील वर्षी ही ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजेच शेतकऱ्यांना एकदाच अर्ज करायचा आहे.पुन्हा प्रत्येक वर्षी अर्ज करण्याची गरज पडत नाही (mahadbt Lottery Maharashtra)

 

 

mahadbt Lottery List 2022 कशी पहायची?

 

या नवीन उपलब्ध करून दिलेल्या पद्धतीस महाराष्ट्र राज्यातील सर्वच शेतकऱ्यांनी उत्स्फुर्त असा प्रतिसाद दिला आहे.

 

या mahadbt मध्ये सुमारे ११ लाख ३४ हजार शेतकऱ्यांनी या प्रणालीवर नोंदणी करुन विविध योजनांतर्गत अर्ज केला आहे.

 

आणि त्यापैकी राज्यातील २ लाख शेतकऱ्यांची ऑनलाईन लॉटरी द्वारे निवड करण्यात आली आहे.

 

आणि या योजनांमध्ये प्रामुख्याने यांत्रिकीकरण, सिंचनाच्या विविध बाबी, फलोत्पादन, नवीन विहीरी बांधणे अशा विविध प्रकरच्या योजनांसाठी लाभार्थ्यांची निवड झालेली आहे.

 

तसेच या लॉटरी मधील पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या रजिस्टर मोबाईलवर निवडीबाबत sms ही प्राप्त होणार आहे. (maha-dbt Lottery)

 

या योजने मधून निवड झालेल्या शेतकऱ्यांना mhadbt प्रणालीवर जाऊन लॉग इन करुन त्यांच्या निवडीबाबतची माहिती मिळू शकते.

 

कृषी यांत्रिकीकरण योजना संपुर्ण माहिती

 

जे पात्र शेतकरी असतील त्यांनी निवडीनंतर मुदतीत घटकांची अंमलबजावणी करायची आहे आणि जे शेतकरी करणार नाहीत त्यांची निवड रद्द केली जाईल आणि संगणकीय प्रणालीद्वारे जे शेतकरी प्रतीक्षा यादीत आहे अशा प्रतिक्षा यादीतील क्रमवारीनुसार पुढील शेतकऱ्यांची निवड केली जाईल.

 

तसेच ज्या अपात्र शेतकऱ्यांची चालु आर्थिक वर्षात निवड होणार नाही त्यांचे अर्ज हे येणाऱ्या पुढील आर्थिक वर्षात ऑनलाईन सोडती साठी म्हणजेच लॉटरी साठी विचारात घेण्यात येणार आहे त्यांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही, असे महाराष्ट्र राज्याचे कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले आहे.

आणि जे पात्र लाभार्थी आहेत त्यांनी mahadbt पोर्टल वर त्यांच्या अर्जाची स्थिती पहायची आहे.

मित्रांनो अशा करतो की, तुम्हाला  हा लेख आवडला असेल आवडल्यास नक्की शेअर करा. जेणेकरुन महाराष्ट्रातील सर्व बांधवांना ही महत्वपूर्ण माहिती मिळेल.

शेतकरी मित्रांनो महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर शेतकरी योजनांची लॉटरी लागल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एसएमएस प्राप्त होत असतो. त्यामुळे तुम्ही ज्या योजनांकरिता अर्ज केलेला आहे त्या योजनांपैकी ज्या योजनेमध्ये तुमची निवड झालेली आहे, त्या योजनेचा एसएमएस प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करून सुद्धा चेक करावे लागते.

 

 

हे सुध्दा वाचा: शरद पवार ग्राम समृद्धी योजना अर्ज सुरू असा करा अर्ज डाऊनलोड

Leave a Comment