Kisan Vikas Patra: तुम्ही शेतकरी आहात? किसान विकास पत्र योजनेअंतर्गत फक्त 115 महिन्यांमध्ये पैसे दुप्पट मिळतील, शेतकऱ्यांनो आत्ताच गुंतवणूक करा

शासनाअंतर्गत अनेक प्रकारच्या योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येत असतात, त्यातीलच एक राबविण्यात येत असलेली योजना म्हणजेच किसान विकास पत्र योजना आहे, तुम्हाला प्रश्न पडलेला असेल नेमके ही योजना आहे तरी कशाची? किसान विकास पत्र योजनेअंतर्गत शेतकरी गुंतवणूक करू शकतात व गुंतवणूक केल्यानंतर एकूण 115 महिन्यांमध्ये रकमेच्या दुप्पट रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे.

अनेक शेतकरी कोणत्या ना कोणत्या बँकेमध्ये गुंतवणूक करत असतात परंतु हवा तेवढा व्याज परतावा मिळत नाही, व शेतकऱ्यांसाठी ची किसान विकास पत्र योजना ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, या योजनेअंतर्गत पूर्वी 120 महिन्यांमध्ये दुप्पट पैसे होत होते, परंतु योजनेअंतर्गत मिळणारा व्याज परताव्याचा दर वाढवण्यात आलेला आहे त्यानुसार शेतकऱ्यांना एकूणच 7.5 टक्के पर्यंत व्याजदर मिळणार आहे.

शेतकऱ्यांना किसान विकास पत्र योजना अंतर्गत पैसे गुंतवायचे असेल तर किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करू शकणार आहे. तसेच योजनेला कमाल मर्यादा देण्यात आलेली नाही. पूर्वी मात्र योजनेचा दर 7.2% एवढा होता, परंतु वाढ करण्यात आल्यानंतरचा दर हा 7.5% एवढा करण्यात आलेला आहे. किसान विकास पत्र योजना आपल्या भारत देशातील सर्व पोस्ट ऑफिस मध्ये कार्यरत असून मोठ्या बँकांमध्ये सुद्धा ही योजना आहे.

देशातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने किसान विकास पत्र योजनेअंतर्गत सहभागी होत आहे, योजना अंतर्गत देशातील शेतकऱ्यांचे हित साधले जावे त्यांना आर्थिक लाभ मिळवा अशा प्रकारचा उद्देश आहे व याच कारणाने शेतकऱ्यांना पैसे दुप्पट करण्याचे हे एक उपयुक्त साधन आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बळकट होण्यास सुद्धा मदत होणार आहे.

 

किसान विकास पत्र योजना गुंतवणूक कशी करावी?

योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना गुंतवणूक करायची असेल तर जवळील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन सर्वप्रथम त्या ठिकाणी, खाते ओपन करण्यासाठी फॉर्म भरावा लागेल, तसेच त्यासोबत आधार कार्ड, पासपोर्ट, वयाचा दाखला,KVP अर्ज फॉर्म, घेऊन जावे लागेल तसेच खातेदाराचे वय किमान दहा वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. शेतकरी किमान 1 हजार रुपयांची गुंतवणूक करू शकणार आहे, कमाल मर्यादा देण्यात आलेली नाही, त्यामुळे पैसे दुप्पट करण्याची ही योजना अत्यंत हिताची शेतकऱ्यांना ठरणार आहे.

Kisan Vikas Patra: तुम्ही शेतकरी आहात? किसान विकास पत्र योजनेअंतर्गत फक्त 115 महिन्यांमध्ये पैसे दुप्पट मिळतील, शेतकऱ्यांनो आत्ताच गुंतवणूक करा

पीएम कुसुम योजनेच्या लाभार्थ्यांना, सेल्फ सर्वे मेसेज सुरू, या ॲपवरून ऑनलाईन पद्धतीने संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करा

Leave a Comment