Regular Loan Repayment: नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मिळणार प्रोत्साहन पर 50 हजार रुपयांचे अनुदान, काय म्हणाले अजित पवार?

नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी, 15 ऑगस्ट रोजी अजित पवार यांनी माध्यमांशी बोलत असताना निर्मित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान देण्यात येईल अशा प्रकारची माहिती दिली. तसेच खूप दिवसांपासून पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान देण्यात येईल अशा प्रकारची चर्चा चालू होती, परंतु शेतकऱ्यांकडून प्रोत्साहन पर अनुदान मिळत नसल्याची तक्रार करण्यात आलेली होती व या कारणांनी 15 ऑगस्ट रोजी अजित पवार यांनी प्रोत्साहन पर अनुदानाचा विषय स्पष्ट केलेला आहे.

नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरच प्रोत्साहन पर अनुदान देण्यात येईल अशा प्रकारची घोषणा अजित पवार यांनी केलेली आहे, तसेच ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज फेड केलेली होती अशा शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाचे अनुदान देण्यात आलेले होते परंतु काही शेतकऱ्यांना निधी कमी पडल्याने, अधिवेशनामध्ये चर्चा झालेली आहे.

अधिवेशनामध्ये झालेल्या चर्चेनुसार, पन्नास हजार रुपयांच्या अनुदानामध्ये पात्र शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येतील, व यासाठीचा निधी अधिवेशनात मंजूर करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे कृषी पंपाचे वीज बिलासाठी कनेक्शन तोडले जाते याबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारला गेला व या प्रश्नाला उत्तर देत असताना अजित पवार म्हणाले की ज्या ठिकाणी कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडले गेले असेल तर, यासंबंधी चर्चा अजित पवार ऊर्जा मंत्र्यांशी करेल असे त्यांनी सांगितले.

Regular Loan Repayment: नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मिळणार प्रोत्साहन पर 50 हजार रुपयांचे अनुदान, काय म्हणाले अजित पवार?

शेतकऱ्यांनो अलर्ट व्हा! सातबारा खरा की बनावट, अशा पद्धतीने ओळखा

Leave a Comment