Namo Shetkari Yojana : शेतकऱ्यांसाठी खुशखबर, पी एम किसान योजनेचे 2 हजार आले! आता नमो शेतकरी चे 2000 रुपये मिळणार, हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू 

राज्यांमध्ये नमो शेतकरी योजना ही पी एम किसान योजनेच्या धरतीवर राबविण्यात येत आहे, नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी वितरित केला जातो यासाठी शेतकरी प्रतीक्षेत आहे, तसेच पीएम किसान योजनेचा 14 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर 27 जुलैला वितरित करण्यात आलेला आहे, व अशा प्रकारची महाराष्ट्रामध्ये राबविण्यात येणार असलेली नमो शेतकरी योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये मानधन देणारी योजना म्हणजेच नमो शेतकरी योजना आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केंद्र सरकार व राज्य सरकार अंतर्गत वार्षिक 12 हजार रुपयाचे मानधन मिळणार आहे. तसेच नमो शेतकरी योजनेचा GR निर्गमित करण्यात आला व त्यासंबंधीचा लेखाशीर्ष तयार करण्यात आलेले आहे. शेतकरी योजनेचा हप्ता हा कधी वितरित केला जातो, याकडे शेतकऱ्यांची लक्ष आहे.

नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्यातील 85 लाख 66 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाचे वितरण करण्यात येईल, 85 लाख 66 हजार शेतकरी हे पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र ठरलेले आहे व पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र ठरलेले शेतकरीच नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र ठरत असल्यामुळे एकूण साडे अठराशे कोटी रुपयांची हे अनुदान वितरित करण्यात येईल.

नमो शेतकरी योजनेचा एक जीआर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे व प्रसिद्ध करण्यात आलेल्या जीआर नुसार, डीबीटी द्वारा अनुदानाचे वितरण करण्यासाठी एक अकाउंट असणे आवश्यक आहे. एक मध्यवर्ती अकाउंट खोलण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्याची एक तारीख ठरवण्यात येईल व त्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्त्याचे वितरण करण्यात येईल.

 

Namo Shetkari Yojana : शेतकऱ्यांसाठी खुशखबर, पी एम किसान योजनेचे 2 हजार आले! आता नमो शेतकरी चे 2000 रुपये मिळणार, हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू 

पी एम किसान योजना 14 व्या हप्त्याचे 2000 जमा झाले का? ते असे चेक करा

Leave a Comment