esearchigr : तुमचे घर, जमीन तसेच दुकान यांची नोंदणी व कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीने बघण्याची संपूर्ण प्रोसेस

मालमत्ते बाबतची अनेक प्रकरने पुढे येत असतात, त्यामध्ये मालमत्ता खरेदी करताना खोटी माहिती देण्यात येते व नंतर मात्र त्याची इतर नागरिकांनी खरेदी केल्यानंतर, अडचणी निर्माण होतात व त्यावेळेस लक्षात येते की आपली फसवणूक झालेली आहे, परंतु नागरिकांची अशी होणारी फसवणूक टाळण्यासाठी, महाराष्ट्र सरकार अंतर्गत एक ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे त्यामध्ये नागरिक नोंदणी तसेच कागदपत्रे चेक करू शकतात. व या कारणांनी मालमत्तेबाबत होणारी फसवणूक टाळण्यास मदत होते.

मालमत्तेची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी व कागदपत्रे कशा पद्धतीने बघायची याची संपूर्ण प्रोसेस या लेखांमध्ये देण्यात आलेली आहे त्यामध्ये नागरिक संपूर्ण प्रोसेस नुसार कागदपत्रे व नोंदणी चेक करू शकतात. परंतु देण्यात आलेली संपूर्ण माहिती, पूर्ण असल्याचा दावा विभाग करत नाही. तरीसुद्धा नागरिकांना नोंदणी व कागदपत्राची सुविधा पोर्टलवर सुरू करण्यात आलेली आहे.

 

नोंदणी व कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीने काढण्याची संपूर्ण प्रोसेस

  • सर्वप्रथम esearchigr या वेबसाईटवर जावे लागेल व या वेबसाईटची लिंक खाली दिलेली आहे.
  • https://esearchigr.maharashtra.gov.in/portal/esearchlogin.aspx या लिंक वर गेल्यानंतर सर्वप्रथम क्रिएटिव्ह न्यू अकाउंट असे ऑप्शन दिसेल या ऑप्शन वर क्लिक करा,
  • त्यानंतर क्रिएट अँड अकाउंट यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही संपूर्ण वैयक्तिक माहिती तसेच पत्ता व लोगिन माहिती योग्यरीत्या भरा.
  • युजर आयडी टाकून तसेच पासवर्ड टाकून सबमिट बटन वर क्लिक करा. त्यानंतर चेक हियर या बटनवर क्लिक करा, त्यानंतर पासवर्ड व त्याच्या कोड टाका व लॉगिन करा.
  • सर्च बाय प्रॉपर्टी डिटेल्स या बटणावर क्लिक करा, त्यानंतर विचारली गेलेली संपूर्ण माहिती निवडा तसेच प्रॉपर्टी क्रमांक व गट क्रमांक निवडा. सबमिट बटणावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्ही तुमची नोंदणी व कागदपत्रे शोधू शकता त्यामध्ये तुम्हाला इंटर डॉक्युमेंट डिटेल्स वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर जिल्हा निवडा.
  • एस आर ओ निवडून वर्ष निवडून कागदपत्र क्रमांक त्यामध्ये टाका. नंतर रिक्वेस्ट डॉक्युमेंट, या बटनावर क्लिक करा. अशाप्रकारे नोंदणी व कागदपत्रे चेक करण्याची संपूर्ण प्रोसेस आहे.

esearchigr : तुमचे घर, जमीन तसेच दुकान यांची नोंदणी व कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीने बघण्याची संपूर्ण प्रोसेस

खुशखर, आता सर्व शेतकरी योजनांचे अर्ज करा मोबाईल ॲप वरून, नवीन ॲप लॉन्च

Leave a Comment