पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध प्रकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा | Self Employment Opportunity

राज्यामध्ये विविध प्रकारच्या योजना शेतकऱ्यांच्या व युवकांच्या हितासाठी राबविण्यात येत असतात व ग्रामीण भागातील युवकांना एक प्रकारचा स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने पशुसंवर्धन विभाग अंतर्गत विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत असतात या योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांना आपला स्वतःचा व्यवसाय चालू करता येतो व उत्पादनाचे साधन उपलब्ध होते.

पशुसंवर्धन विभाग अंतर्गत येणाऱ्या योजनांमध्ये शेळी मेंढी गट वाटप, कुकुट पिलांचे वाटप, गाई म्हशी गट वाटप, याबरोबरच विविध प्रकारच्या शेड बांधणी साठी सुद्धा अर्थसहाय्य करण्यात येत असते लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील युवकांना/नागरिकांना लाभ घेता येणार आहे त्यामुळे महाराष्ट्राचा रहिवासी असलेला नागरीक, पशुसंवर्धन विभागाअंतर्गत अर्ज करू शकतात.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया प्रक्रिया पूर्ण करावी लागते त्यासाठी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे सुद्धा योग्य साईज नुसार अपलोड करणे गरजेचे आहे नागरिकांना 31 मार्च 2024 या तारखेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल. या तारखेनंतर मात्र अर्ज केले असता अर्जाचा विचार केला जाणार नाही.

अर्ज करताना लागणारी आवश्यक कागदपत्रे : आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, दारिद्र्य रेषेचा दाखला, अपत्य दाखला, क्रेडिट कार्ड, प्रशिक्षण प्रमाणपत्र, ग्रामपंचायत नमुना 8, जातीचा दाखला, बचत गट सदस्य प्रमाणपत्र, अपंग प्रमाणपत्र (असल्यास), आणि सातबारा व आठ अ अशा प्रकारची संपूर्ण कागदपत्रे नागरिकाकडे उपलब्ध असावी.

पशुसंवर्धन विभागा अंतर्गत योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांनी आर्थिक दृष्ट्या दुर्बल असावे, अर्जदार पाचवी पास असणे, ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागते, https://ah.mahabms.com त्यासाठी ही वेबसाईट ओपन करून त्यावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध प्रकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा | Self Employment Opportunity

आपले सरकार सेवा केंद्र साठी अर्ज सुरू, एकूण 120 आपले सरकार सेवा केंद्र देण्यात येईल अशा पद्धतीने अर्ज करा 

Leave a Comment