शेतकऱ्यांवर शेतातील डीपी बिघडली, अशा पद्धतीने तक्रार करून तीन दिवसात डीपी मिळवा | Report A Dp Burn

सध्याच्या स्थितीमध्ये शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम चालू झालेला आहे व अशा स्थितीमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतीला पाणी देतात परिस्थितीमध्ये डीपी बिघडण्याच्या समस्या, विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात, अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांची डीपी बिघडल्यानंतर त्यांना त्वरित डीपी दुरुस्त करून मिळणे आवश्यक असते दुरुस्त न झाल्यास शेतकऱ्यांच्या पिकाला अगदी काही थोडे दिवसासाठी सुद्धा फटका बसू शकतो.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरण ला आदेश दिले आहेत त्यानुसार राज्यामध्ये एक प्रकारची मोहीम राबविण्यात येणार आहे. व त्यानुसार शेतकऱ्यांची डीपी बिघडल्यानंतर महावितरणच्या ॲपवर एक प्रकारची तक्रार करून शेतकऱ्यांना फक्त तीन दिवसांमध्ये दुरुस्त डीपी मिळवता येणार आहे. व अशा प्रकारची मोहीम राज्यांमध्ये चालू झालेली आहे व या मोहिमे वरून चांगल्या प्रमाणात डिपी बदलण्यात अथवा दुसरी बसवण्यात चांगल्या प्रकारे यश मिळत आहे.

शेतकऱ्यांची डीपी बिघडली असता शेतकऱ्यांना सर्वप्रथम तक्रार करण्यासाठी महावितरण ॲप वर जावे लागेल, ॲप ओपन केल्यानंतर सर्वप्रथम एक ऑप्शन दिसेल नादुरुस्त रोहित्राची माहिती मिळवा म्हणजेच डीपी ची माहिती कळवा अशा प्रकारचे ऑप्शन असेल त्यावर क्लिक करा, त्यामध्ये बिघडण्याचे कारण काय अशा प्रकारची माहिती दोन-तीन वाक्यात विचारली जाईल ती भरून बिघडलेल्या डीपी चा फोटो अपलोड करा. अशाप्रकारे तुमची तक्रार महावितरण कडे घरबसल्या दोन मिनिटांमध्ये होऊन जाईल व त्यानंतर, ग्राहकाला माहिती देण्यात येईल.

शेतकऱ्यांवर शेतातील डीपी बिघडली, अशा पद्धतीने तक्रार करून तीन दिवसात डीपी मिळवा | Report A Dp Burn

पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध प्रकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा.

Leave a Comment