माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत 1 एप्रिल 2016 नंतर जन्मलेल्या मुलीच्या खात्यावर 1 लाख रुपये जमा होणार; निर्णय जाहीर; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया | Mazi Kanya Bhagyahri Yojana

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र शासनाच्या मार्फत मुलींच्या शिक्षणाला तसेच मुलींचा घटनारा दर वाढावा या दृष्टीने वेळोवेळी अर्थसहाय्य तसेच मदत पुरविली जात असते. त्याच अंतर्गत महाराष्ट्र शासनाने माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू केलेली आहे या अंतर्गत राज्यातील 01 एप्रिल 2016 नंतर जन्मलेल्या मुलींना एक लाख रुपये मिळणार आहे. ही Mazi Kanya Bhagyahri Yojana काय आहे, या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया तसेच या योजनेचा शासन निर्णय या संदर्भात विस्तृत माहिती आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

पूर्वी ही योजना राज्यात सुरू होती, परंतु या योजनेला वेगळे नाव होते. या Mazi Kanya Bhagyahri Yojana Maharashtra मध्ये काही बदल करून महाराष्ट्र शासनाने नवीन शासन निर्णय काढून मुलींसाठी महत्वाची असणारी ही माझी कन्या भाग्यश्री योजना नव्या रूपात सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत मुलींच्या खात्यावर एक लाख रुपये मिळण्याचे प्रावधान आहे. त्यामुळे हा निधी मुलींच्या पालकांना मुलीच्या उज्वल भविष्यासाठी तसेच त्यांच्या शिक्षणासाठी वापरता येणार आहे. तसेच राज्यात घटत चाललेला मुलींचा जन्मदर वाढविणे हा सुद्धा या मागचा एक उद्देश आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजना चा उद्देश:

मित्रांनो केंद्र तसेच राज्य सरकार मुलींच्या विकासासाठी तसेच मुलींना चांगले शिक्षण मिळवता यावे मुलींना त्यांचा सर्वांगीण विकास करता यावा या उद्देशाने वेळोवेळी अनेक प्रकारच्या योजना राबवीत असते. मुलींबद्दल लोकांच्या मनामध्ये असलेल्या नकारात्मक दृष्टिकोन नष्ट व्हावा, मुलींचे शिक्षणासाठी तसेच लग्नासाठी आर्थिक मदत सरकारच्या मार्फत व्हावी तसेच गोरगरिबाच्या घरात सुद्धा मुलींचा जन्म व्हावा या दृष्टीने राज्य सरकार ही योजना राज्यात राबवित आहे.

प्रधानमंत्री आवास योजना घरकुल मिळाले नाही? तुम्हाला घरकुलाच्या यादीतून वगळले! अशी करा तक्रार; लगेच घरकुल मिळेल

माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत 1 लाख रुपये मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा? How to Apply For Mazi Kanya Bhagyahri Yojana?

मित्रांनो मुलींच्या खात्यावर एक लाख रुपये मिळवण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत तुम्हाला सर्वप्रथम आम्ही दिलेला अर्ज चा नमुना प्रिंट करून घ्यायचा आहे. या अर्ज मध्ये परिपत्रक अ आणि परिपत्रक ब तसेच संपूर्ण अर्ज व्यवस्थितपणे भरून त्याला खालील दिलेली स र्व कागदपत्रे जोडायची आहेत. अर्जाची लिंक आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे.

मित्रांनो ही योजना राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत तुम्ही बालविकास प्रकल्प अधिकारी किंवा बाल विकास प्रकल्प उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे अर्ज करू शकतात.

या योजनेचा अर्जाचा नमुना येथे मिळवा

आवश्यक कागदपत्रे Required Documents for Mazi Kanya Bhagyahri Yojana

या योजने अंतर्गत लाभ मिळण्याकरिता तुमच्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

1. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
2. रेशन कार्ड
3. उत्पन्नाचा दाखला
4. सावित्रीबाई फुले योजनेचा लाभ न घेतल्या बाबतचे प्रमाणपत्र
5. लाभार्थी मुलींचे आधार कार्ड

हे नक्की वाचा:पी एम किसान योजना सर्व गावांची नवीन यादी जाहीर; अनेकांची नावे वगळण्यात आली!

या योजने अंतर्गत जर तुम्हाला लाभ मिळवायचा असेल तर तुमच्या मुलींची जन्माची नोंद हे ग्रामपंचायत किंवा नगरपालिका किंवा महानगरपालिका या ठिकाणी असायला पाहिजे.

योजनेचा संपूर्ण शासन निर्णय येथे पहा

Mazi Kanya Bhagyahri Yojana 2023 Maharashtra संदर्भातील मुलींच्या खात्यावर एक लाख रुपये जमा करण्या संदर्भातील महत्त्वाच्या योजना संदर्भातील एक छोटीशी माहिती आपण या पोस्टमध्ये मिळवलेली आहे. ही माहिती प्रत्येक गरजू व्यक्तींना शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!