वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना | VJNT Loan Scheme, Vasantrao Naik Mahamandal Karj Yojana

 

मित्रांनो जे बांधव VJNT या प्रवर्गातील आहेत, त्यांना वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ कर्ज योजना म्हणजेच VJNT Loan scheme अंतर्गत व्यवसाय करण्याकरिता बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या VJNT Loan scheme 2023 अंतर्गत अर्ज कसा करायचा? व्यवसाय करण्याकरिता किती रुपये लोन मिळू शकते? कागदपत्रे, अटी व पात्रता याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना | VJNT Loan Scheme, Vasantrao Naik Mahamandal Karj Yojana
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना | VJNT Loan Scheme, Vasantrao Naik Mahamandal Karj Yojana

 

Table of Contents

वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना| VJNT Loan Scheme Maharashtra 

विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गातील जे तरुण बेरोजगार असतील अशा तरुणांना स्वतःचा व्यवसाय उभा करून रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या याकरिता आपल्या महाराष्ट्र राज्यात ही वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना राबविण्यात येत आहे. VJNT प्रवर्गातील तरुणांना रोजगार च्या संधी उपलब्ध करून देणारी ही एक महत्त्वपूर्ण अशी योजना आहे.

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ कर्ज योजना उद्देश 

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ कर्ज योजना(Vasantrao Naik Mahamandal Karj Yojana) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या Vjnt Loan Scheme अंतर्गत Vjnt या प्रवर्गातील लोकांना स्वयंरोजगार प्राप्त व्हावा, त्याचप्रमाणे या प्रवर्गातील व्यक्ती आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावी या घटकातील लोकांची आर्थिक उन्नती व्हावी या प्रवर्गातील व्यक्तींची व्यवसाय मध्ये स्थान वाढावे या उद्देशाने ही vjnt loan scheme 2022 राबविण्यात येत आहे.

वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना अंतर्गत समाविष्ट योजना:- VJNT Loan Scheme Maharashtra

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ((Vasantrao Naik Mahamandal Karj Yojana)) हे आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने एका उपक्रमाच्या माध्यमातून चालविण्यात येत आहे. हा एक महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे. या महामंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या VJNT Loan Yojana अंतर्गत खालील योजना ह्या राबविण्यात येत आहेत. VJNT Loan scheme 2022

1. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना
2. एक लाख रुपये थेट कर्ज योजना
3. गट कर्ज व्याज परतावा योजना
4. बीज भांडवल योजना

Vjnt karj yojana अंतर्गत राबवणाऱ्या चारही कर्ज योजना बद्दल आता आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना :-

Vasantrao Naik Mahamandal Karj Yojana अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांपैकी वैयक्तिक लाभासाठी देण्यात येणारी ही एक महत्त्वपूर्ण अशी कर्ज योजना आहे. या योजनेअंतर्गत दहा लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज मिळवता येते. अर्ज करणाऱ्या अर्जदाराची वय हे 18 ते 50 वर्षे यादरम्यान असावे लागते. अर्ज करणाऱ्या अर्जदाराची बँक खाते है आधार कार्ड सोबत लिंक असावे लागते.

हे नक्की वाचा:- ओबीसी OBC कर्ज योजना महाराष्ट्र

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना अर्ज प्रक्रिया:-

अर्ज करायचा असल्यास अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन उपलब्ध असून ऑनलाईन पद्धतीने वेबसाईटवर अर्ज करायचा आहे.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना कागदपत्रे:-
1. रहिवासी दाखला
2. उत्पन्न दाखला
3. आधार कार्ड
4. कास्ट सर्टिफिकेट
5. शाळेचा दाखला
6. व्यवसायाचा अहवाल व कोटेशन

वरील सर्व कागदपत्रे हे ऑनलाईन पद्धतीने सादर करून ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे.

1 लाख रुपये थेट कर्ज योजना:-

महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एक लाख रुपये पर्यंत थेट कर्ज देण्यात येते.  या योजनेअंतर्गत तुम्हाला कर्ज हवे असल्यास दोन जामीनदार ठेवावे लागते त्याचप्रमाणे तुम्हाला बोझा नोंद करून द्यावी लागते.

1 लाख रुपये थेट कर्ज योजना अर्ज प्रक्रिया:– अर्ज प्रक्रिया ही ऑफलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे.

1 लाख रुपये थेट कर्ज योजना कागदपत्रे:- 

वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या योजनेकरिता खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.VJNT Loan scheme 2023

1. कास्ट सर्टिफिकेट
2. रेशन कार्ड
3. रहिवासी दाखला
4. आधार कार्ड
5. उत्पन्न दाखला

ऑफलाइन पद्धतीने अर्ज करून त्याचबरोबर वरील कागदपत्रे सादर करून आपण या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतो.

हे नक्की वाचा:- अण्णाभाऊ साठे महामंडळ कर्ज योजना अर्ज सुरू 

गट कर्ज व्याज परतावा योजना:-

वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या vjnt loan scheme अंतर्गत गट कर्ज व्याज परतावा योजना ही राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत 10 लाख ते 50 लाख पर्यंत कर्ज मिळवता येते.  योजना गटाकरिता राबवण्यात येत असल्यामुळे तो गट नोंदणी करत असावा व गटातील सदस्य हे vjnt प्रवर्गातील असावे लागते. गटामधील असलेल्या सदस्यांची वय हे 18 ते 45 या वयोगटातील असावे. त्याचप्रमाणे लाभार्थ्याची कर्ज खाते हे त्यांच्या आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.

गट कर्ज व्याज परतावा योजना अर्ज प्रक्रिया:- या वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या गट कर्ज व्याज परतावा योजना अंतर्गत अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने आहे. VJNT Loan Scheme 2023 Maharashtra सदर योजनेच्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला ऑनलाइन अर्ज करता येतो.

गट कर्ज व्याज परतावा योजना कागदपत्रे:-

गट कर्ज व्याज परतावा योजना अंतर्गत खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

1. व्यवसायाचे कोटेशन आणि व्यवसायाचा प्रकल्प अहवाल
2. आधार कार्ड
3. रहिवासी दाखला
4. उत्पन्नाचा दाखला
5. कास्ट सर्टिफिकेट
6. शाळेचा दाखला

वरील कागदपत्रे आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अपलोड करावी लागते.

 

बीज भांडवल योजना :-

Vjnt Loan scheme 2023 अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या बीज भांडवल योजना अंतर्गत लाभार्थ्यांना खालील व्यवसाय करण्याकरिता भांडवल उपलब्ध करून देण्यात येत आहे. ही योजना बँकेमार्फत राबविण्यात येत आहे.

बीज भांडवल योजना कागदपत्रे:-

1. रेशन कार्ड
2. रहिवासी दाखला
3. कास्ट सर्टिफिकेट
4. पॅन कार्ड
5. उत्पन्नाचा दाखला

इत्यादी कागदपत्रे जोडावी लागतात.

बीज भांडवल योजना अंतर्गत समाविष्ट व्यवसाय:-

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या VJNT Loan Scheme 2023 अंतर्गत खालील लघु व मध्यम तसेच इतर व्यवसायांचा समावेश आहे.

ऑटोरिक्षा,वडापाव विक्री केंद्र,भाजी विक्री केंद्र, डी. टी. पी. वर्क, सॉफ्ट टॉईज विक्री केंद्र, चहा विक्री केंद्र, ब्युटी पार्लर, मसाला मिर्ची कांडप उद्योग, पापड उद्योग, सलून, स्विट मार्ट, सायबर कॅफे अशा प्रकारच्या अनेक उद्योगांसाठी या बीज भांडवल योजना अंतर्गत कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे.

हे नक्की वाचा:- व्यवसाय आणि उद्योग उभारणी साठी तात्काळ कर्ज वाटप सुरू 

वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना अंतर्गत आकारण्यात येणारे व्याज:-

वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना(Vasantrao Naik Mahamandal Karj Yojana) अंतर्गत vjnt karj yojana 2023 अंतर्गत ज्यांनी कर्ज योजना चा लाभ घेतलेला आहे, म्हणजेच कर्ज घेतलेले आहेत व ते नियमित कर्ज परतफेड करत असेल तर त्यांना कोणत्याही प्रकारचे व्याज आकारण्यात येत नाही. परंतु वेळोवेळी कर्जाची परतफेड न केल्यास 4% टक्के दर साल दर शेकडा दराने व्याज आकारण्यात येईल. Vjnt loan scheme अंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्याना कोणत्याही प्रकारची व्याज नसते परंतु कर्जाची परतफेड ही जर नियमित केली नाही तर त्यांना 4% दराने व्याज द्यावे लागते.

वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना अंतर्गत ऑनलाइन अर्ज कसा करायचा VJNT Loan Scheme Maharashtra Online Application :-

वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या vjnt loan scheme ला ऑनलाइन अप्लाय करण्याची प्रोसेस खालील प्रमाणे आहे.

Vjnt loan scheme अंतर्गत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना आणि गट कर्ज व्याज परतावा योजना या दोन योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो. या दोन योजनांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.

Vjnt loan scheme online Application Link

अर्ज करण्याची लिंक

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ संपर्क:-

वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजना विषयी सविस्तर माहितीसाठी, त्याचप्रमाणे इतर माहिती आणि तुम्हाला काही अडचणी असेल तर महामंडळाची संपर्क साधण्यासाठी तुम्ही खालील ई-मेलवर मेल करू शकता किंवा खालील क्रमांकावर संपर्क साधून माहिती मिळवू शकतात.

ईमेल:- rmvnvjntdcamravati@gmail.com

फोन नंबर:- ०७२१-२५५०५०३

अशाप्रकारे वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ यांच्यावतीने VJNT या प्रवर्गातील व्यक्तींसाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, एक लाख रुपये थेट कर्ज योजना आणि बीज भांडवल योजना या चार प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहेत. या VJNT Karj Yojana अंतर्गत मिळवलेल्या कर्जावर नियमित परतफेड केल्यास कोणत्याही प्रकारची व्याज देण्याची आवश्यकता नाही. या चार योजनांपैकी ज्या योजनांची अर्ज प्रक्रिया ही ऑफलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे, त्यांचे अर्ज हे महामंडळाच्या जिल्हा ऑफिसमध्ये मिळणे सुरू झालेले आहेत. तिथून अर्ज घेऊन आपण या योजनेअंतर्गत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो. त्या योजनेअंतर्गत जिल्हा कार्यालय मधून अर्ज मिळवण्यासाठी त्याचप्रमाणे अर्ज सबमिट करण्याकरिता स्वतः अर्जदारास जावे लागेल.

हे नक्की वाचा:- नियमित कर्ज माफी संदर्भात महाराष्ट्र शासनाने घेतला हा महत्त्वपूर्ण निर्णय!

जर तुम्हाला सुद्धा स्वयंरोजगार प्राप्त करावयाचा असेल एखादा उद्योग स्थापन करायचा असेल आणि तुम्ही vjnt या प्रवर्गातील असाल तर वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना अंतर्गत कर्ज मिळवून स्वतःचा व्यवसाय उभारू शकतात. ही माहिती तुम्हाला आवडल्यास इतरांना देखील नक्की शेअर करा, अशाच महत्त्वपूर्ण माहिती करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.

Leave a Comment