ओबीसी कर्ज योजना 2023 महाराष्ट्र अर्ज सुरू I OBC Loan Scheme Maharashtra

ओबीसी कर्ज योजना 2022 महाराष्ट्र अर्ज सुरू I OBC Loan Scheme Maharashtra

 

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील ओबीसी बांधवांना करिता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत ओबीसी कर्ज योजना (OBC loan Scheme 2023 Maharashtra) अंतर्गत अनेक प्रकारच्या कर्ज योजना या सुरू करण्यात आलेल्या आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यातील ओबीसी बांधवांना वर्ष 2022 करिता अनेक प्रकारच्या कर्ज योजनेच्या माध्यमातून रुपये एक लाख पर्यंतची थेट कर्ज देण्यात येत आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण ओबीसी कर्ज योजना (obc karj yojana 2023) विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

ओबीसी कर्ज योजना 2022 महाराष्ट्र करिता अर्ज सुरू I OBC loan Scheme 2022 Maharashtra OBC karj yojana Maharashtra
ओबीसी कर्ज योजना 2023 महाराष्ट्र करिता अर्ज सुरू | OBC loan Scheme 2023 Maharashtra

इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून OBC Mahamandal obc karj yojana 2023 अंतर्गत ओबीसी समाजाच्या सर्वांगीण कल्याणासाठी स्वयंम उद्योगासाठी अनेक कर्ज योजना ह्या राबविण्यात येत आहेत. ओबीसी बांधवांना कृषी सलग्न व पारंपारिक उपक्रम व लघु उद्योग तसेच मध्यम उद्योग उत्पादन, व्यापार विक्री सेवाक्षेत्र इत्यादी व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते.

 

ओबीसी कर्ज योजना 2023 अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कर्ज योजना:-

ओबीसी कर्ज योजना 2023 अंतर्गत खालील कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत(MAHARASHTRA STATE OBC FINANCE & DEVELOPMENT CORPORATION LTD) वर्ष 2022-23 करिता 1 लाख रुपये पर्यंत कर्ज देण्यात येणार आहे.

1. 20 टक्के बीज भांडवल कर्ज योजना
2. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना
3. गट कर्ज व्याज परतावा योजना
4. शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना

आपल्या महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्गीय प्रवर्गातील जास्तीत जास्त व्यक्तीने या ओबीसी कर्ज योजना अंतर्गत लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ यांनी केले आहे.obc karj yojana 2022. ओबीसी कर्ज योजना अंतर्गत मिळालेल्या कर्जाची परतफेड ही 48 समान मासिक हत्यांमध्ये करायची आहे. याकरता ओबीसी बांधवांना कोणत्याही प्रकारची व्याज(Loan Schemes maharashtra) आकारण्यात येणार नाही. परंतु जर तुम्ही घेतलेल्या कर्जाची रक्कम ही परतफेड न केल्यास कर्ज ताकद ठेवल्यास तुम्हाला दसादशे 4 टक्के दराने(obc karj yojana 2023)  व्याज द्यावे लागेल.

ओबीसी कर्ज योजना लाभार्थ्यांना मिळणारी रक्कम

ओबीसी कर्ज योजना (OBC Loan Scheme) अंतर्गत 1 लाख रुपये कर्ज मध्ये 75 हजार रुपये हे सुरुवातीला लाभार्थ्यांना पहिला हप्ता म्हणून देण्यात येतात. त्या नंतर प्रत्यक्ष उद्योग सुरु झाल्यानंतर साधारणत: तीन महिन्यांनंतर 25 हजार रुपये चा दुसरा हप्ता देण्यात येतो.

 

हे नक्की वाचा:- VJNT कर्ज योजना महाराष्ट्र

OBC कर्ज योजना अंतर्गत लाभार्थी पात्रता ( OBC Loan Scheme Eligibility Criteria )

 

अर्जदार लाभार्थीची पात्रता खालील प्रमाणे आहेत. Eligibility for msobcfdc loan scheme

1. OBC Loan Scheme अंतर्गत लाभ घेण्याकरिता लाभार्थी हा ओबीसी म्हणजेच (इतर मागासवर्गीय ) या प्रवर्गातील असावा.
2. महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
3. वय मर्यादा ही १८ ते ५० वर्ष असावी.
4. Obc Loan Scheme अंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्जदाराचा सिबिल स्कोअर हा किमान ५०० इतका असावा
5. अर्जदाराच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न हे 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
6. एका वेळी कुटुंबातील केवळ एकच व्यक्ती लाभ घेऊ शकतो.
7. ओबीसी कर्ज योजना(Obc Karj Yojana) अंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्ज दाराने त्याच्या आधार कार्ड सोबत लिंक असलेल्या बँक खात्याची माहिती सादर करावी
8. ज्या अर्ज दाराने प्रशिक्षण घेतलेले आहे, अश्या अर्जदारास प्राधान्य देण्यात येणार आहे.
9. अर्जदार हा थकबाकीदार नसावा. कोणत्याही महामंडळाचा, बँकेचा किंवा संस्थेचा
10. अर्जदार हा ज्या व्यवसाय करिता कर्ज घेणार आहे, त्या व्यवसाय बद्दल त्याला ज्ञान किंवा अनुभव असावा लागतो.

हे नक्की वाचा:- अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2022 अर्ज सुरू

 

 

OBC Loan Scheme आवश्यक कागदपत्रे (Required Documents for Obc Loan Scheme)

1. आधार कार्ड, शिधा पत्रिकेची प्रमाणित प्रत
2. पासपोर्ट साईज फोटो
3. 7/12 उतारा, व्यवसाय स्थळाची भाडेपावती आणि करारनामा
4. दोन जामिनदारांची हमीपत्रे तसेच हे जामिनदार राहत असल्या बाबतचे संमतीपत्र
5. ना हरकत प्रमाणपत्र स्वराज्य संस्थेचे( व्यवसाय करण्याबाबत)
6. परवाने आणि लायसन्स (तांत्रिक व्यवसायाकरीता)
7. यंत्र सामुग्री, कच्चा माल, इत्यादींचे दरपत्रक तसेच व्यवसायाचा प्रकल्प अहवाल सादर करावा लागतो.

ओबीसी बांधवांना लाभ देण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजना:-

Obc Loan Scheme 2023 Maharashtra अंतर्गत खालील कर्ज योजना ह्या राबविण्यात येत आहेत.

1. 20 % बीज भांडवल कर्ज योजना:-

ओबीसी कर्ज योजना (Obc Loan Scheme Maharashtra) अंतर्गत राबविण्यात येत असलेली ही 20 % बीज भांडवल कर्ज योजना बँक आणि महा मंडळ यांच्या मार्फत राबविण्यात येत आहेत. या योजने मध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका तसेच जिल्हा अग्रणी बँका आणि राष्ट्रीयकृत बँका यांच्या माध्यमातून 75% रक्कम असणार आहे. आणि याचे व्याज दर ज्या बँकेने कर्ज दिले त्या बँकेच्या नियमानुसार राहणार आहे. आणि उर्वरित 20 % कर्ज रक्कम ही महामंडळ देणार आहे. त्यावर महा मंडळ 6 टक्के व्याज आकारण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत 5 लाख रुपये पर्यंत कर्ज मिळू शकते. 5% इतका हिस्सा हा लाभार्थ्याचा सहभाग असणार आहे. 5% रक्कम लाभार्थ्याला उभारावे लागेल. या योजने अंतर्गत 5 लाख रुपये पर्यंत मिळणाऱ्या कर्जाची परतफेड ही 60 हप्त्यात करता येणार आहे.

2. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना:-

ओबीसी कर्ज योजना(Obc Loan Scheme Maharashtra 2023) अंतर्गत राबविण्यात येत असलेली वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना ही बँकेमार्फत राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत लाभ घेण्याकरिता  ओबीसी महामंडळाच्या संगणक प्रणालीवर नाव नोंदणी करायची आहे. या योजने अंतर्गत जर लाभ घ्यायचा असेल तर लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न हे 8 लाख रुपयाच्या मर्यादेत असावे लागते. या योजने अंतर्गत एकूण 10 लाख रुपये पर्यत कर्ज मिळणार आहे. व्याजाची परतावा रक्कम ही महामंडळ परत करणार आहे. ही रक्कम  लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या बँक अकाउंट मध्ये जमा करण्यात येणार आहे. बँकेच्या नियमानुसार कर्ज परतफेड कालावधी आणि व्याज मर्यादा असणार आहे.

3. गट कर्ज व्याज परतावा योजना:-

ओबीसी कर्ज योजना (Obc Loan Scheme Maharashtra) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या गट कर्ज व्याज परतावा योजना ही बँकेमार्फत राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत अर्ज करणाऱ्या गटातील अर्जदाराचे वय 18 ते 45 वर्षे असावे लागते. या योजने अंतर्गत लाभ घेण्याकरिता महामंडळाच्या संकेतस्थळावर नाव नोंदणी कराविच लागते. या योजने अंतर्गत कर्जाची रक्कम ही 10 लाख ते 50 लाख रुपये पर्यंत मिळणार आहे. या योजने अंतर्गत लाभ घेण्याकरिता लाभार्थ्यांनी यापूर्वी महामंडळाचा योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

हे नक्की वाचा:- व्यवसाय उद्योगासाठी कर्ज अर्ज सुरू

4. शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना:-

ओबीसी कर्ज योजना(Obc Loan Scheme)अंतर्गत राबविण्यात येणारी ही शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना बँकेमार्फत राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत लाभ घेण्याकरिता महामंडळाच्या संकेतस्थळावर नाव नोंदणी कराविच लागते. या योजने अंतर्गत कर्ज(Obc Karj Yojana) हे देशांतर्गत व परदेशी उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपये ते 20 लाख रुपये पर्यंत देण्यात येत आहे. या करिता अर्जदार विद्यार्थ्यांचे वय 17 वे 30 वर्षे असावे लागते. तसेच त्या विद्यार्थ्यांचे एकूण वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे 8 लाख रुपये या मर्यादे पर्यंत असावे लागते. तसेच अर्ज दर विद्यार्थ्याला 12 वी परीक्षेत किमान 60 टक्के गुण असावे लागते.

 

ओबीसी कर्ज योजना अर्ज प्रक्रिया:-

ज्या व्यक्तींना महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत ओबीसी कर्ज योजना योजना(Obc Loan Scheme) अंतर्गत लाभ घ्यायचा आहे, त्यांनी ओबीसी महामंडळाच्या  वेबसाईट वर ऑनलाईन अर्ज करायचे आहे. अर्ज हे ऑनलाईन असल्यामुळे जास्तीत जास्त ओबीसी बांधवांनी अर्ज करायचे आहे. या योजने संबंधित अधिक माहिती करिता महा मंडळाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधू शकतात.

ओबीसी महामंडळ ऑनलाईन अर्ज वेबसाईट:-

ओबीसी कर्ज योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या वेबसाईट वर ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

OBC महामंडळ वेबसाईट

वरील महामंडळाच्या वेबसाईटवर आपण ऑनलाइन पद्धतीने ओबीसी कर्ज योजना अंतर्गत अर्ज करू शकतो. ओबीसी बांधवांविषयीची ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा. अशाच महत्वपूर्ण माहिती करता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.

Leave a Comment