माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी महाराष्ट्र शासनाचा नवीन उपक्रम | Majha Ek Divas Majhya Balirajasathi

 

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक नवीन उपक्रम हा राबविण्यात येत आहे. राज्य शासनाने “माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी” Majha Ek Divas Majhya Balirajasathi हा उपक्रम राबविण्याचे ठरवले आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण Majha Ek Divas Majhya Balirajasathi हा उपक्रम नेमका काय आहे? आणि हा उपक्रम कधी चालू होणार आहे याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.Scheme for farmer majha ek divas majhya balirajasathi

 

माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी महाराष्ट्र शासनाचा नवीन उपक्रम | Majha Ek Divas Majhya Balirajasathi
माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी महाराष्ट्र शासनाचा नवीन उपक्रम | Majha Ek Divas Majhya Balirajasathi

“माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी” हा उपक्रम काय आहे?

महाराष्ट्र शासनाच्या वतीने “माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी” Majha Ek Divas Majhya Balirajasathi हा उपक्रम आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये राबवण्याकरिता 25 ऑगस्ट 2022 रोजी एक परिपत्रक काढले आहे. त्यामुळे या पोस्टमध्ये आता आपण हा महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवण्यात येणारा उपक्रम कशाप्रकारे राबवण्यात येणार आहे? या उपक्रमाचा शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार आहे. याविषयी सविस्तर माहिती जाणून घेत आहोत.

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपण पाहत आहोत की दरवर्षी शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर होत असतात. आपला महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्हे हे आत्महत्याग्रस्त म्हणून त्यांचे नाव समोर आलेले आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी शेती करताना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करत असतात परिणामी त्यांना आत्महत्या करावी लागते. आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक प्रकारच्या शासकीय योजना ह्या राबविण्यात येत असतात. त्याचप्रमाणे केंद्र सरकार सुद्धा अनेक प्रकारच्या योजना राबवत असतात. परंतु गावाकडील शेतकऱ्यांना या योजना विषयी पुरेशी माहिती नसल्यामुळे ते शेतकरी या योजनांचा फायदा घेऊ शकत नाहीत. त्याचप्रमाणे कृषी अधिकारी असतील पंचायत समितीचे अधिकारी असतील त्याचप्रमाणे विविध योजनांची अधिकारी यांच्याशी शेतकऱ्यांचा कुठलाही संपर्क येत नाही त्यामुळे अशा योजना शेतकऱ्यांना माहिती होत नाही. Scheme for farmer majha ek divas majhya balirajasathi

 


हे नक्की वाचा:- कर्ज माफिचे 50 हजार रुपये अनुदान हवे असल्यास, हे काम नक्की करा.

शेतकऱ्यांना शेतीच्या नवनवीन तंत्रज्ञानाविषयी माहिती उपलब्ध होत नाहीत. ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे शासनाच्या विविध योजना असतील, शेती विषयातील नवनवीन तंत्रज्ञान असेल तसेच इतरही शेती विषयक माहिती विविध योजना यांच्या विषयी माहिती शेतकऱ्यांना त्यांच्या गावांमध्ये उपलब्ध व्हावी याकरिता हा उपक्रम राबविण्यात येत आहे. माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी (Majha Ek Divas Majhya Balirajasathi) या उपक्रमाअंतर्गत आता शेतकरी बांधवांना या विषयी माहिती देण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने परिपत्रक काढून हा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे.Scheme for farmer
Scheme for farmer Maharashtra

माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी (Majha Ek Divas Majhya Balirajasathi) हा उपक्रम कधी राबविण्यात येणार आहे?

महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या हितार्थ राबविण्यात येणारा हा एक महत्त्वपूर्ण असा उपक्रम असून, या उपक्रमाची सुरुवात 1 सप्टेंबर 2022 पासून होणार आहे. आणि हा उपक्रम 30 नंबर 2022 पर्यंत आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येणार आहे.Scheme for farmer Maharashtra

या उपक्रमात कोणाचा सहभाग असणार?

“माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी” Majha Ek Divas Majhya Balirajasathi या उपक्रमामध्ये सहभागी होणारे अधिकारी खालील प्रमाणे आहेत.

राज्यस्तरावरील अधिकारी:-

कृषी आयुक्त, प्रधान सचिव, कृषी संचालक, कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, कृषी विद्यापीठांचे विभाग प्रमुख इत्यादी.

विभाग स्तरावरील अधिकारी:-

विभागीय कृषी सहसंचालक, विभागीय आयुक्त, कृषी उपसंचालक, प्रकल्प संचालक आत्मा आणि इतर जिल्हास्तरीय अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी, जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांमध्ये जिल्हाधिकारी आणि प्रकल्प संचालक आत्मा इत्यादींचा समावेश आहे.

हे नक्की वाचा:- जमिनीची मोजणी करा आता घरबसल्या ऑनलाईन

तालुकास्तरीय अधिकारी:-

तहसीलदार, नायब तहसीलदार, इतर तालुकास्तरीय अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व इतर अधिकारी.

लोकप्रतिनिधी:-

महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये त्या भागातील आमदार तसेच खासदार आणि इतर लोकप्रतिनिधी स्वेच्छेने सहभागी होऊ शकतात.

माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रम महाराष्ट्र:-

महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या majha ek divas majhya balirajasathi उपक्रमामध्ये जे अधिकारी समाविष्ट आहेत ते अधिकारी यांना महिन्यातून तीन दिवस गावांना भेटी द्यायच्या आहेत. त्याचप्रमाणे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि ग्रामविकास विभागाच्या व इतर विभागाच्या अधिकाऱ्यांना महिन्यातून एक दिवस गावांना भेटी द्यायच्या आहे. या उपक्रमांतर्गत गावांची निवड ही दुर्गम डोंगराळ भाग तसेच कोरडवाहू व आदिवासी सामाजिक क्षेत्र असणाऱ्या गावांची निवड करावी. या उपक्रमाअंतर्गत गावाची निवड ही संबंधित अधिकारी पदाधिकारी यांचे मुख्यालय ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणापासून दूर करावी. जे अधिकारी  अधिनस्त आहेत, त्यांना त्यांच्या गावाची निवड करून द्यावी. या उपक्रमांतर्गत आत्महत्याग्रस्त विभागांमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी आणि नैराश्य समजून घेतल्या जातील. त्याचप्रमाणे या उपक्रमांतर्गत सविस्तर अहवाल देखील सादर करण्यात येईल. shetkari yojana maharashtra 2022

हे नक्की वाचा:- वन्य प्राण्यांनी तुमच्यावर किंवा तुमच्या जनावरांवर हल्ला केला, असे मिळवा 20 लाख रुपये!

या उपक्रमासंदर्भात शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अश्या प्रकारे आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रम संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येणार आहे. ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा. अश्याच महत्वपूर्ण पोस्ट करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.

Leave a Comment