रहिवासी दाखला ऑनलाईन कसा काढायचा?How to Get Resident Certificate Online Maharashtra?

रहिवासी दाखला ऑनलाईन कसा काढायचा?How to Get Resident Certificate Online Maharashtra? How to apply for Resident Certificate online रहिवासी दाखला ऑनलाईन कसा काढायचा

 

आजच्या या पोस्टमध्ये आपण रहिवासी दाखला ऑनलाईन कसा काढायचा? How to Get Resident Certificate Online Maharashtra? या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. रहिवासी दाखला हे एक रहिवास दाखविणारे महत्वपूर्ण असे कागदपत्रं आहे. त्याच प्रमाणे रहिवासी दाखला हा आपल्याला बऱ्याच शासकीय योजनाचा लाभ, त्याच प्रमाणे इतर शासकीय व निमशासकीय कामांसाठी आवश्यक पडतो. त्यामुळे रहिवासी दाखला(residence certificate maharashtra) हा ऑनलाइन कसा काढायचा? हे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहेत. रहिवासी दाखला ऑनलाईन कसा काढायचा?(How to get Resident Certificate online? या संबंधित विस्तृत माहिती करिता ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा.

रहिवासी दाखला च्या आधारे रहिवासी दाखला(Resident Certificate) धारक व्यक्ती हा कोणत्या गावातील तसेच कोणत्या राज्याचा रहिवासी आहे, हे माहिती करून घेण्यासाठी रहिवासी दाखला हा बऱ्याच ठिकाणी मागण्यात येत असतो. रहिवासी दाखला हे रहिवासी दर्शवणारे प्रमाणपत्र आहे.

 

रहिवासी दाखला आवश्यकता काय?

रहिवासी दाखला(Resident Certificate) आपल्याला लायसेन्स, नोकरी, संपत्ती, व्यवसाय नोदणी इ.साठी याची आवश्यकता असते. रहिवासी दाखला हा राज्य त्या राज्यात राहत असणाऱ्या रहिवासी यानाच देत असते. त्यामुळे एक व्यक्ती एकापेक्षा जास्त राज्यात रहिवासी दाखवू शकत नाही. म्हणजेच एक व्यक्ती एकाच ठिकाणी रहिवासी दाखला काढू शकतो.

हे नक्की वाचा:- फेरफार ऑनलाइन कसा काढायचा ? संपूर्ण माहिती

अनेक शासकीय कामांकरिता नोकर भरती मध्ये अर्ज करण्याकरिता राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट सर्टिफिकेट हे मागण्यात येत असते. आणि ही कागदपत्रे आपण आपले सरकार सेवा केंद्र किंवा सेतू केंद्र मध्ये जाऊन सहजरित्या काढू शकतो. त्याचबरोबर आपल्याला बऱ्याच ठिकाणी रहिवासी प्रमाणपत्र हे सुद्धा मागण्यात येत असते. त्यामुळे आता आपण रहिवासी दाखला(residence certificate maharashtra) घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने कसा काढायचा याविषयी माहिती जाणून घेत आहोत.

रहिवासी दाखला असा काढा ऑनलाईन?

रहिवासी दाखला(residence certificate in marathi) घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने काढण्याकरिता खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करावी.

रहिवासी दाखल(residence certificate maharashtra) हा ऑनलाईन पद्धतीने काढण्याकरिता सर्वात प्रथम तुमच्या मोबाईल मध्ये किंवा डेस्कटॉप मध्ये गुगल क्रोम किंवा तुम्ही जे ब्राउझर वापरत असाल ते ओपन करा. आता त्यामध्ये तुम्हाला ‘आपले सरकारची’ खाली दिलेली वेबसाईट ओपन करायची आहे.

https://aaplesarkar.mahaonline.gov.in

आता या ठिकाणी तुम्हाला आपले सरकारच्या वेबसाईटवर सर्वप्रथम नोंदणी करायची आहे, तुम्ही या ठिकाणी नागरिक नोंदणी करू शकतात. नवीन यूजर ह्या पर्यायावर क्लिक करा. आणि त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर वापरून तुम्ही नोंदणी करून घ्या.

महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार सरकार पोर्टलवर नोंदणी कशी करायची याविषयी माहिती आपण मागील लेखांमध्ये पाहिलेली आहे? जर तो लेख वाचायचा असेल तर इथे क्लिक करा.

आता तुम्ही यशस्वीरित्या आपले सरकार पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वर एक युजरनेम आणि पासवर्ड हा मिळालेला असेल. आता तुम्हाला लॉगिन करायचे आहे. लॉगिन करण्याकरिता सर्वप्रथम तुमचा युजरनेम आणि पासवर्ड टाका त्याचप्रमाणे तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका आणि खाली दिसत असलेल्या कॅपच्या कोड हा जशाला तसा त्या रकान्यांमध्ये प्रविष्ट करा.  आणि लॉगिन बटणावर क्लिक करा. आता तुम्ही आपले सरकार पोर्टलवर नागरिक लॉगिन केलेले आहे.

हे नक्की वाचा:- कोणताही शासकीय दाखला काढण्याकरिता लागणारे आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण माहिती

आता तुमच्या समोर एक नवीन डॅशबोर्ड हा ओपन झालेला आहे. आता तुम्ही तुमच्या भाषेला बदलू शकतात तुम्हाला इंग्लिश किंवा मराठी हा पर्याय दिसेल त्यापैकी तुम्हाला जी भाषा हवी असेल ती निवडून घ्या.

आता तुमच्यासमोर आपले सरकार मधील  शासनाच्या मार्फत पूर्ण देणाऱ्या सर्व ऑनलाईन सुविधा  सेवा दिसत असेल, आता तुम्हाला या ठिकाणी महसूल विभाग हा पर्याय निवडायचा आहे. आता तुम्हाला उपविभाग निवडायचा आहे त्यामध्ये तुम्ही महसूल सेवा हा पर्याय निवडा. आता उपविभाग निवडल्यानंतर तुम्हाला उपविभागा अंतर्गत सर्व सेवांची यादी दिसत असेल. त्यामध्ये तुम्हाला “तात्पुरता रहिवास प्रमाणपत्र” (residence certificate in marathi)हा पर्याय शोधून त्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर पुढे जा या पर्यायावर क्लिक करा. आता तुमच्यासमोर तात्पुरत्या रहिवासी प्रमाणपत्र साठी आवश्यक असणारी कागदपत्रांचे पेज ओपन होईल.

रहिवासी प्रमाणपत्र ऑनलाईन काढण्याकरिता आवश्यक कागदपत्रे:-

रहिवासी प्रमाणपत्र हे(Documents for residence certificate Maharashtra) ऑनलाईन पद्धतीने काढण्याकरिता आपल्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

1. ओळखीचा पुरावा- आधार कार्ड, मतदान कार्ड, रोजगार हमी योजना जॉब कार्ड, अर्जदाराचा फोटो, आर एस बी वाय कार्ड (किमान -1)
2. पत्त्याचा पुरावा- भाडे पावती, विज बिल, आधार कार्ड, पाणीपट्टी कर पावती, मालमत्ता कर पावती, सातबारा किंवा आठ अ उतारा(किमान -1)
3. इतर दस्तऐवज-शिधापत्रिका, विज देयक, विवाहाचा दाखला, दूरध्वनी देयक, मालमत्ता नोंदणी उतारा, पाणीपट्टी पावती (किमान -1)
4. वयाचा पुरावा-जन्म प्रमाणपत्र, शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र, सेवा पुस्तिका, (किमान -1)
5. रहिवासाचा पुरावा- तुम्ही ज्या गावच्या रहिवासी प्रमाणपत्र मिळतात त्या गावच्या तलाठी यांनी दिलेला रहिवासी असल्याबाबतचा दाखला, रहिवासी असल्याबाबत ग्रामसेवकांनी किंवा बिल कलेक्टर यांनी दिलेल्या दाखला(किमान -1)

रहिवासी दाखला ऑनलाईन काढण्याकरिता अनिवार्य कागदपत्रे (सर्व अनिवार्य)

1) इतर

2) स्वघोष्णापत्र

वर दर्शवलेली सर्व आवश्यक कागदपत्रे पाहून घ्यावी त्यानंतर पुढे जा या पर्यायावर क्लिक करा. आता तुमच्यासमोर रहिवासी दाखला (residence certificate maharashtra online)आहे पेज ओपन झालेले असेल त्यामध्ये तुम्हाला अर्जामध्ये आवश्यक ती माहिती भरायची आहे.

प्रमाणपत्राचे नाव या ऑप्शन मध्ये तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र हे सिलेक्ट करायचे आहे. अर्जदाराच्या वैयक्तिक तपशील मध्ये तुम्हाला अर्जदाराचे पूर्ण नाव, अर्जदाराच्या वडिलांचे नाव, अर्जदाराची जन्मतारीख इत्यादी माहिती भरायची आहे. अर्जदाराचा निवासाचा तपशील मध्ये तुम्हाला अर्जदार राहत असलेल्या ठिकाणचा पत्ता टाकायचा आहे. लाभार्थ्याशी नाते या पर्यायांमध्ये तुम्हाला जो लाभार्थी आहे त्याला भरतीची माहिती टाकायची आहे. आता तुम्हाला लाभार्थ्याची शैक्षणिक माहिती ही प्रविष्ट करायची आहे. जर अर्जदार इतर राज्यातून महाराष्ट्र राज्यात स्थलांतरित झालेला असेल तर त्या ठिकाणी आहे किंवा नाही यापैकी योग्य पर्याय क्लिक करायचे आहे. अर्जदार हा अन्य जिल्ह्यामध्ये शासकीय योजनेचा लाभार्थी आहे का? यामध्ये तुम्हाला जर असेल तर हो किंवा नाही हे निवडायचे आहे आणि जर असेल तर त्या ठिकाणचा तपशील टाकायचा आहे.

आता तुम्हाला रहिवासी दाखला(Resident Certificate) हा कोणत्या कारणासाठी पाहिजे याचे सविस्तरपणे विवरण करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला करण्याचा तपशील हा वाचून घ्यायचा आहे आणि ‘मला मंजूर’ या पर्यायावर ती तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि ‘समावेश करा’ यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. आता तुम्हाला तुमचा अर्ज नंबर हा मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला फोटो आणि आवश्यक डॉक्युमेंट हे अपलोड करायचे आहे. आता तुम्हाला रहिवासी दाखल्याचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करण्याकरिता पैसे भरायचे आहे त्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करू शकता. त्यामध्ये तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, फोन पे, गुगल पे, पेटीएम याचा वापर करून ऑनलाईन पैसे भरू शकतात. तुम्ही पैसे भरल्यानंतर तुमचा अर्ज हा अधिकाऱ्यांकडे ट्रान्सफर करण्यात येईल. त्यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी झाल्यानंतर सात दिवसांमध्ये तुम्हाला रहिवासी दाखला हा मिळेल.

अशाप्रकारे आपण घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने रहिवासी दाखला मिळण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून घरबसल्या रहिवासी दाखला मिळवू शकतो. जर ही माहिती तुम्हाला महत्वपूर्ण वाटली असेल तर इतरांना शेअर करा. अशाच महत्वपूर्ण पोस्ट करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.

Leave a Comment